Travel : 'अरेच्चा..माहितच नव्हतं! पुण्यात इतकी निसर्गरम्य अन् निवांत ठिकाणं?' परफेक्ट डेट, हनिमूनसाठी Best ऑप्शन
Travel : जोडीदाराला खूश करायचंय किंवा लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला सरप्राईझ देण्याचा विचार करत असाल तर पुण्यातील या ठिकाणांना नक्की भेट द्या.
Travel : देशासह महाराष्ट्र सध्या रणरणत्या उन्हाने तापलाय. अशात दोन क्षण निवांत कुटुंब किंवा जोडीदारासोबत घालवण्यासाठी पर्यटक अनेक ठिकाणांचा शोध घेत आहेत. पण सध्या सुट्टीचा सीझन असल्याने जिकडे तिकडे गर्दीच गर्दी दिसून येतेय. पण आज आम्ही तुम्हाला पुण्यातील अशा काही ठिकाणांबद्दल सांगत आहोत, जिथे गेल्यावर तुम्हाला सुखद गारवा, निसर्गरम्य वातावरण आणि आपल्या प्रियजनांसोबत निवांत क्षण घालवण्याची संधी मिळेल. जोडीदाराला सरप्राईझ देण्याचा विचार करत असाल तर परफेक्ट डेट, हनिमूनसाठी Best ऑप्शन असून पुण्यातील या ठिकाणांना नक्की भेट द्या.
जर लग्नाचा वाढदिवस संस्मरणीय करायचा असेल तर...
जर तुम्ही तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या जोडीदारासोबत कँडल लाईट डिनरची योजना आखत असाल तर या प्लॅनमध्ये थोडा बदल करा. प्रत्येक जोडप्याला लग्नाचा पहिला वाढदिवस अविस्मरणीय बनवायचा असतो. लग्नानंतरचा पहिला वाढदिवस प्रत्येक जोडप्यासाठी खास असतो. कारण नवीन नात्याला सुरुवात होऊन एक वर्ष उलटून गेलेले असते. हा दिवस आणखी खास बनवण्यासाठी तुम्ही पुण्यात चांगली जागा शोधत असाल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत निवांत क्षण घालवू शकता.
पवना तलाव - कॅम्पिंग प्रेमींसाठी ठिकाण सर्वोत्तम
तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत पवना तलावावर निवांत क्षण घालवू शकता. कॅम्पिंग प्रेमींसाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे. दररोज चार भिंतींच्या आत झोपण्याऐवजी, एक रात्र ताऱ्यांखाली घालवावी. हा दिवस तुम्ही कधीही विसरणार नाही. जर तुम्हाला कॅम्पिंग करायचे नसेल तर तुम्ही फक्त फिरायला जाऊ शकता. पुण्यातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी हे एक आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात.
पवना तलाव येथे कॅम्पिंगची किंमत- जर तुम्हाला एक रात्र तंबूत राहायचे असेल तर त्याची किंमत प्रति व्यक्ती 1199 रुपये आहे.
वेळ : तुम्ही येथे दुपारी 4 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 11 पर्यंत राहू शकता.
पॅकेज फीमध्ये तंबू, अन्न आणि अॅक्टीव्हिटीजचा समाविष्ट आहेत.
मुळशी धरण - सर्वोत्तम रोमँटिक ठिकाण
धरणाचे खळखळणारे पाणी, आल्हाददायक हवामान आणि हिरवीगार हिरवळ यापेक्षा चांगले काय असू शकते. हे ठिकाण पुण्यातील सर्वात शांत ठिकाणांपैकी एक आहे, जिथे लोक निवांत वेळ घालवण्यासाठी येतात. हे ठिकाण पिकनिक स्पॉटसारखे आहे.जिथे तुम्ही हिरव्यागार गवतावर कापड पसरून आराम करू शकता. पाण्यावर भिरभिरणारा वारा जेव्हा गालाला स्पर्श करतो, तेव्हा खूप आनंददायी अनुभूती मिळते. संध्याकाळी हे दृश्य आणखीनच सुंदर असते. पुण्यातील हे सर्वोत्तम रोमँटिक ठिकाण मानले जाते.
ठिकाण- मुळा नदी, तालुका मुळशी, पुणे
रुफटॉप डायनिंग
जोडीदाराला सरप्राईज द्यायचं असेल तसेच तुम्हाला चांगल्या ठिकाणी जेवायला जायचे असेल तर रुफटॉप रेस्टॉरंट तुमच्या यादीत ठेवा. कारण इथून तुम्हाला सुंदर नजारासोबतच थंड हवेचा आनंद लुटता येईल. दिवसभर भटकंती केल्यानंतर, अशा चांगल्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही तुमच्या संध्याकाळचा आनंद घेऊ शकता. पुण्यात तुम्हाला अनेक रूफटॉप रेस्टॉरंट्स सापडतील.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>
Travel : खंडाळा, लोणावळाच काय..महाराष्ट्रातील 'ही' ठिकाणं सुद्धा भारी! पर्यटकांची मिळतेय पहिली पसंती, कौतुक करावं तितकं कमीच..