Travel : खंडाळा, लोणावळाच काय..महाराष्ट्रातील 'ही' ठिकाणं सुद्धा भारी! पर्यटकांची मिळतेय पहिली पसंती, कौतुक करावं तितकं कमीच..
Travel : आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील एका अशा ठिकाणाविषयी सांगणार आहोत. ही अप्रतिम ठिकाणं पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे
Travel : उन्हाळ्याची सुट्टी पडली की महाराष्ट्रातील लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर व्यतिरिक्त पाचगणी, माथेरान आणि इगतपुरी हिल स्टेशन सारखी ठिकाणे पाहण्यासाठी हजारो पर्यटक दररोज भेट देतात. महाराष्ट्रात अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत जिथे भेट देणं म्हणजे एक वेगळीच मजा असते. आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील एका अशा ठिकाणाविषयी सांगणार आहोत. ही अप्रतिम ठिकाणं पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे, जाणून घ्या..
महाराष्ट्रातील या ठिकाणांना पर्यटकांची मिळतेय पहिली पसंती
महाराष्ट्रातील काही ठिकाणच्या सौंदर्याचे कौतुक करायला शब्द कमी पडतात. असंच एक पर्यटन स्थळ आहे, जिथे गेल्यानंतर तुम्हाला एक निवांत, सुखाची अनुभूती मिळेल. महाराष्ट्रातील पालघर हे देखील एखाद्या सुंदर ठिकाणापेक्षा कमी नाही. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले पालघर हे एक जणू नंदनवनच आहे. या शहराचे सौंदर्य पाहण्यासाठी हजारो पर्यटक येतात. या लेखात आम्ही तुम्हाला पालघरमधील अशाच काही सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, ज्यांना भेट दिल्यानंतर तुम्ही महाराष्ट्रातील इतर ठिकाणांना विसराल...
केळवा बीच - देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण!
पालघरमध्ये भेट द्यायची म्हटलं आणि सर्वोत्तम ठिकाणांचा विचार केला तर, केळवा बीचचा उल्लेख नक्कीच केला जातो. धकाधकीचे जीवन आणि शहराच्या गजबजाटापासून दूर असलेला हा समुद्रकिनारा देशी-विदेशी पर्यटकांना खूप आकर्षित करतो. शहरातील व्यस्त जीवनापासून दूर राहून तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत निवांत क्षण घालवायचे असतील तर हे एक उत्तम ठिकाण आहे. अनेक जोडपी इथे क्वालिटी टाइम घालवण्यासाठी येतात. येथे तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्ताचे अद्भुत दृश्य देखील पाहू शकता. तसेच मजेदार वॉटर स्पोर्ट्सचा आनंद देखील घेऊ शकता.
शिरगाव किल्ला - निवांत क्षण घालवण्यासाठी एक उत्तम ठिकाण
शिरगाव किल्ला हा केवळ पालघरमधीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे. असे म्हणतात की, हा किल्ला एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे निवासस्थान होता. पालघर शहरापासून काही अंतरावर असलेला हा किल्ला जीवनाच्या धावपळीपासून दूर निवांत क्षण घालवण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. या गडाच्या आजूबाजूची हिरवळही तुमचे मन प्रसन्न करू शकते. मात्र, शिरगाव किल्ल्याचा काही भाग केवळ अवशेष म्हणून उभा आहे.
जय विलास पॅलेस
जर तुम्ही महाराष्ट्राच्या किंवा पालघरच्या गजबजाटापासून दूर शांततेच्या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल, तर जय विलास पॅलेस हे एक उत्तम ठिकाण आहे. जय विलास हा महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाच्या रांगेत असलेला एक ऐतिहासिक राजवाडा आहे. जय विलास पॅलेसला जवाहर राजवाडा पॅलेस असेही म्हणतात. जय विलास पॅलेस हा महाराष्ट्राच्या चैतन्यशील सांस्कृतिक वारशासाठी ओळखला जातो.
अर्नाळा बीच
पालघरपासून हाकेच्या अंतरावर असलेले अर्नाळा हे अतिशय सुंदर आणि मनमोहक किनारपट्टीचे गाव आहे. समुद्रकिनारी वसलेले हे गाव पर्यटकांना खूप आकर्षित करते. अर्नाळ गावाचे सौंदर्य वाढवण्यासाठी इथला समुद्रकिनाराही काही कमी नाही. अर्नाळा समुद्रकिनारा त्याच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. पांढरी वाळू आणि निळ्या पाण्याच्या किनाऱ्यावर तुम्ही निवांत वेळ घालवू शकता. इथला सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यास विसरू नका.
पालघरला कसे जायचे?
पालघरला जाणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्ही रस्ते, हवाई मार्गाने किंवा ट्रेननेही पोहोचू शकता.
विमानाने - पालघरला जाण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ छत्रपती शिवाजी विमानतळ आहे. येथून पालघर सुमारे 70 किमी आहे.
रेल्वेने- तुम्ही देशाच्या कोणत्याही भागातून पालघर रेल्वे स्थानकावर पोहोचून शहरात पोहचू शकता. पालघरला नियमित गाड्या येतात.
रस्त्याने- पालघर हे महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक शहराशी जोडलेले आहे. महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक शहरातून बस किंवा कारने पोहोचता येते.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>
Travel : आता गोवा ट्रीप होईल Success! उन्हाळ्यात गोव्यातील 'ही' 6 लपलेली ठिकाणं फिराल; तर इथल्या निसर्गाच्या प्रेमात पडाल