(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shravan Travel : श्रावणात भगवान शंकराच्या दर्शनाचं सौभाग्य..अन् भारतीय रेल्वेची सुवर्णसंधी! IRCTC चे टूर पॅकेजेस एकदा पाहाच..
Shravan Travel : श्रावण महिन्यात विशेषत: भगवान शिवाच्या दर्शनाला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की मंदिरात भेट दिल्याने आत्म:शांती आणि मन शुद्ध होते.
Shravan Travel : श्रावण महिना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथांच्या पूजेला आणि दर्शनाला खूप महत्त्व आहे. कारण भगवान शंकरांना श्रावण महिना खूप प्रिय आहे, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे अनेक लोक श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी बाबांच्या दर्शनासाठी कोणत्याही ऐतिहासिक मंदिरात जातात. श्रावणात भगवान शंकरांच्या ऐतिहासिक मंदिरांना भेट देण्याची तुमचीही इच्छा असेल तर भारतीय रेल्वे तुम्हाला सुवर्णसंधी देत आहे. आज आम्ही तुम्हाला उज्जैन ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन टूर पॅकेज आणि अनेक ऐतिहासिक मंदिर दर्शन पॅकेजबद्दल माहिती देणार आहोत. जाणून घ्या...
श्रावण महिन्यात तुम्हालाही अनेक ज्योतिर्लिंगे एकत्र पाहायची असतील तर...
श्रावण महिन्यात प्रत्येकाला देशातील अनेक ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेऊन भगवान भोलेनाथाचे दर्शन घ्यायचे असते. कारण श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथाचे दर्शन घेतल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे. तुम्हालाही श्रावण महिन्यात अनेक ज्योतिर्लिंगे एकत्र पाहायची असतील, तर IRCTC तुमच्यासाठी एक पॅकेज घेऊन आले आहे. या पॅकेजद्वारे तुम्ही महाकालेश्वर, ओंकारेश्वर, नागेश्वर, सोमनाथ यासह अनेक ज्योतिर्लिंगांना भेट देऊ शकता. हे टूर पॅकेज किती दिवस असणार आहे? प्रवाशांचे भाडे काय असेल? या पॅकेजची तिकिटे कशी काढायची ते जाणून घ्या..
महाकालेश्वर-ओंकारेश्वर टूर पॅकेज
हे टूर पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांसाठी आहे. येथे तुम्हाला अनेक मंदिरांना भेट देण्याची संधी मिळेल.
तुम्ही दर शुक्रवारी पॅकेजसाठी तिकीट बुक करू शकता.
पॅकेज फी - दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी रु 25000 आहे.
मुलांसाठी पॅकेज फी 17300 रुपये आहे.
पॅकेज फीमध्ये हॉटेल, तिकीट, प्रेक्षणीय स्थळी बस आणि 5 दिवसांसाठी नाश्त्याची सुविधा समाविष्ट असेल.
हे भारतातील प्रसिद्ध मंदिर मानले जाते.
हरिद्वार टूर पॅकेज
तुम्ही भारतीय रेल्वेच्या टूर पॅकेजने प्रवास केल्यास, हरिद्वारसह तुम्हाला डेहराडून, मसुरी आणि ऋषिकेश येथेही नेले जाईल.
हे पॅकेज 2 ऑगस्टपासून सुरू होत आहे.
पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांसाठी आहे.
पॅकेज फी - दोन लोकांसोबत प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी रु 27810 आहे.
मुलांसाठी पॅकेज फी 13795 रुपये आहे.
पॅकेजमध्ये तुम्हाला हॉटेलमधून प्रवास करण्यासाठी बसची सुविधा मिळेल.
द्वारका-सोमनाथ टूर पॅकेज
या पॅकेजसाठी तुम्ही दर शुक्रवारी तिकीट बुक करू शकता.
पॅकेजमध्ये सोमनाथ दर्शनासोबत तुम्हाला द्वारकेचेही दर्शन दिले जाईल.
या पॅकेजमध्ये ट्रेन आणि बसने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.
पॅकेज फी - दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रति व्यक्ती पॅकेज फी रु 25000 आहे.
मुलांसाठी पॅकेज फी 17300 रुपये आहे.
हेही वाचा>>>
Travel : आश्चर्यच..! ज्या शिवलिंगांचा 3 वेळा बदलतो रंग, 900 वर्षांहून अधिक जुनं भारतातील एक रहस्यमय शिवमंदिर, सर्वकाही जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )