Travel : आश्चर्यच..! ज्या शिवलिंगांचा 3 वेळा बदलतो रंग, 900 वर्षांहून अधिक जुनं भारतातील एक रहस्यमय शिवमंदिर, सर्वकाही जाणून घ्या
Travel : आज सोमवारी भारतातील एका रहस्यमय शिवमंदिराबद्दल जाणून घ्या. ज्या मंदिरात शिवलिंगाचा दिवसातून तीन वेळा रंग बदलतो. मंदिराचा इतिहास आणि भाविकांच्या श्रद्धेबाबत जाणून घ्या..
Travel : भारतात अशी अनेक चमत्कारी मंदिर आहेत. जिथले रहस्य जाणून अनेकांच्या भुवया उंचावतात. त्यापैकी भारतात असे एक भगवान भोलेनाथाचे मंदिर आहे, ज्याबद्दल असे म्हटले जाते की, या शिवलिंगाचा रंग दिवसातून तीन वेळा बदलतो. या शिवमंदिराबाबत लोकांच्या श्रद्धेशी निगडीत अनेक रहस्ये आहेत. जाणून घेऊया मंदिराचा इतिहास आणि भाविकांच्या श्रद्धेबाबत...
900 वर्षांहून अधिक जुने मंदिर
आज भगवान भोलेनाथाला समर्पित असा सोमवार आहे, उत्तर भारतीयांच्या पंचांगानुसार आजपासून श्रावणाला सुरूवात झाली आहे, तर मराठी पंचागानुसार अवघ्या काही दिवसांवर श्रावण येऊन ठेपलाय. या महादेव मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी मोठ्या जत्रेचे आयोजन केले जाते. आम्ही ज्या मंदिराबद्दल सांगत आहोत, ते मंदिर आग्र्यात आहे, जवळपास 900 वर्षांहून अधिक जुने राजेश्वर महादेव मंदिर आहे. लोकांच्या श्रद्धेशी निगडीत अनेक रहस्ये आहेत. या मंदिरात बसवलेले शिवलिंग दिवसातून तीन वेळा रंग बदलते. असे मानले जाते की राजेश्वर महादेव मंदिरात असलेले शिवलिंग स्वयंप्रतिष्ठापित आहे, जे प्रत्येक भक्ताच्या मनोकामना पूर्ण करते. जाणून घेऊया..
शिवलिंगाचा रंग दिवसातून तीन वेळा बदलतो
हे मंदिर आपल्या खास वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे. मंदिरातील शिवलिंग दिवसातून तीन वेळा रंग बदलते. सकाळी मंगला आरती करताना शिवलिंग पांढऱ्या रंगाचे दिसते. यानंतर दुपारच्या आरतीच्या वेळी बाबा महादेवाचे शिवलिंग फिकट निळे होते. शिवलिंगावर तीन बोटे उमटतात. म्हणजे ते नीलकंठासारखे शिवलिंग बनते. संध्याकाळच्या आरतीच्या वेळी शिवलिंग फिकट गुलाबी रंगाचे होते. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी मंदिरात शिवभक्तांची गर्दी होते. सोमवारी दिवसभर भाविक शिवाचा जलाभिषेक करतात. रात्री 12 वाजता शयन आरती केल्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद केले जातात.
ताजमहालच्या आधी बांधलेले मंदिर..!
मंदिर ट्रस्टच्या उपसचिवांनी सांगितले की, आग्रा येथील शम्साबाद रोडवर राजेश्वर महादेव मंदिर आहे, जे ताजमहालच्या आधी बांधले गेले होते. हे शिवमंदिर 900 वर्षांहून अधिक जुने आहे. वेळोवेळी सुशोभीकरणामुळे या मंदिराचे स्वरूप बदलत राहिले, परंतु आजही या मंदिरावर लोकांची श्रद्धा पूर्वीसारखीच आहे. येथे वर्षभर भाविक पूजेसाठी येत असतात. श्रावण महिन्यातील दर सोमवारी मंदिरात भाविकांची गर्दी असते. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी मंदिरात मोठी यात्रा भरते.
अशी झाली शिवलिंगाची स्थापना
मंदिर ट्रस्टचे उपसचिव सांगतात की, भरतपूरचा राजा खेडा येथील एका सावकाराने हे मंदिर बांधले होते. मंदिरातील शिवलिंगाच्या स्थापनेसाठी सावकार मध्य प्रदेशात गेले आणि त्यांनी नर्मदा नदीतून बैलगाडीत शिवलिंग आणले. सावकार इथे आले, तेव्हा मंदिराजवळ एक विहीर होती. रात्रीच्या वेळी विश्रांतीसाठी लोक येथे थांबतात. सावकारही आपल्या साथीदारांसह येथेच थांबला. रात्री भगवान शिव सावकाराच्या स्वप्नात आले. म्हणाले, माझ्या शिवलिंगाची इथे स्थापना करा. मात्र असे असूनही सावकार या गोष्टीला राजी नव्हते. तो शिवलिंग घेऊन दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करू लागला. यावेळी बैलगाडीत दोन बैल होते, कामगार ढकलत होते. असे असतानाही बैलगाडी हलली नाही. यानंतर बैलगाडीत आणखी दोन बैल जोडले गेले, तरीही फरक पडला नाही. सावकाराला शिवलिंगही हलवता आले नाही. यानंतर बैलगाडीतून खाली उतरल्यानंतर येथेच शिवलिंगाची स्थापना झाली. यानंतर सेठ निघून गेला.
मनोकामना पूर्ण होते, भाविकांची श्रद्धा
येथे येणारे भक्त सांगतात की, बाबा महादेव प्रत्येक भक्ताच्या मनोकामना पूर्ण करतात. त्यांचे दु:ख दूर होते. त्यामुळे दर सोमवारी येथे भाविकांची गर्दी असते. इथे आल्यावर एक वेगळीच ऊर्जा मिळते. प्रत्येक समस्येवर उपाय असतो. अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हेही वाचा>>>
Shravan Travel : शंभो शंकरा! श्रावणात घ्यायचंय महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगांचं दर्शन? सर्वकाही जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )