Travel: भारतीय रेल्वेकडून क्रूझने प्रवास करायची संधी! कसं बुक कराल 'क्रूझ टूर पॅकेज'? परवडणाऱ्या लक्झरी सुविधा जाणून घ्या...
Travel: भारतीय रेल्वे क्रूझ टूर पॅकेजमध्ये परवडणाऱ्या दरात लक्झरी सुविधा दिल्या जातात. पॅकेजमध्ये प्रवास, निवास, जेवण आणि जहाजावरील मनोरंजन सुविधा उपलब्ध आहेत.
Travel: निळाशार समुद्र, लाटांवर तरंगणारे मोठे जहाज.. जहाजात धम्माल, मस्ती, एक आरामदायी अनुभव.. आपल्यापैकी अनेकांची इच्छा असते, एकदा तरी क्रूझने प्रवास करावा, पण अनेकांना या क्रूझचे तिकीट कसे बूक करावे हे माहित नसते, पण आता भारतीय रेल्वे IRCTC कडून प्रवाशांना खासगी कंपन्यांकडून खास क्रूझ टूर पॅकेज सुविधाही देण्यात येत आहे. भारतीय रेल्वे क्रूझ टूर पॅकेजमध्ये परवडणाऱ्या दरात लक्झरी सुविधा दिल्या जातात. पॅकेजमध्ये प्रवास, निवास, जेवण आणि जहाजावरील मनोरंजन सुविधा उपलब्ध आहेत. जाणून घ्या..
IRCTC चे 'क्रूझ टूर पॅकेज'
लोकांना जेव्हा फिरायला जायचं असेल तर ते टूर पॅकेज बूक करतात, कारण यामुळे प्रवास करणे स्वस्त होते. कारण, ते ग्रुप बुकिंगवर कमी किमतीत सुविधा देतात. भारतीय रेल्वे प्रवाशांना खासगी कंपन्यांकडून पॅकेज सुविधाही देत आहे. भारतीय रेल्वेने दिलेल्या सामान्य पॅकेजबद्दलच अनेकांना माहिती आहे. भारतीय रेल्वेच्या क्रूझ टूर पॅकेजबद्दल त्यांना माहिती नाही. असे लोक आज क्रूझ टूर पॅकेजची तपशीलवार माहिती वाचू शकतात. भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर, तुम्हाला टूर पॅकेजमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा आणि बजेटबद्दल तपशीलवार माहिती वाचायला मिळेल. तिकीट बुक करण्यापूर्वी सर्वकाही काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून प्रवासादरम्यान तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये.
क्रूझ टूर पॅकेजमध्ये परवडणाऱ्या लक्झरी सुविधा!
भारतीय रेल्वे आपल्या क्रूझ टूर पॅकेजमध्ये परवडणाऱ्या दरात लक्झरी सुविधा देते. पॅकेजमध्ये प्रवास, निवास, जेवण आणि जहाजावरील मनोरंजन सुविधा उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला क्रूझ टूर पॅकेज बुक करण्याची पद्धत आणि त्यामध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांबद्दल सांगणार आहोत.
क्रूझ टूर पॅकेज कसे बुक करावे?
- यासाठी सर्वप्रथम तुम्हाला भारतीय रेल्वेची अधिकृत वेबसाईट, irctctourism.com ही Google वर सर्च करावी लागेल.
- भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर क्लिक केल्यानंतर, सर्वप्रथम तुम्हाला स्थानानुसार वेगवेगळ्या पॅकेजची नावे दिसतील.
- तिथे तुम्हाला हॉटेल, फ्लाइट, पॅकेज आणि क्रूझ सारख्या तिकीट बुकिंगचे आयकॉन देखील दिसतील.
- तुम्हाला क्रूझ टूर पॅकेज बुक करायचे आहे, त्यामुळे क्रूझ पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर, तुमच्यासमोर दोन प्रकारचे पॅकेज पर्याय उघडतील,
- ज्यामध्ये तुम्हाला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय टूर पॅकेज बुक करण्याचा पर्याय दिसेल.
- IRCTC टूर पॅकेजमध्ये उपलब्ध सुविधा वाचून तिकीट बुक करा.
- तुम्हाला डोमेस्टिक रिव्हर क्रूझच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- येथे वेगवेगळ्या ठिकाणांहून धावणारी क्रूझ पॅकेजेस तुमच्यासमोर दिसतील.
- लक्षात ठेवा की टूर पॅकेज बुक करण्यापूर्वी, तुम्हाला चौकशी फॉर्म भरावा लागेल.
- चौकशी फॉर्म भरण्यापूर्वी, तपशील पाहा, पर्यायावर जा आणि पॅकेजमध्ये उपलब्ध वैशिष्ट्ये वाचा.
भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून एक मेल येईल...
यामध्ये तुम्हाला ईमेल आयडी, तुमचे नाव, नंबर, किती लोक प्रवास करणार आहेत आणि मुलेही तुमच्यासोबत जाणार आहेत की नाही अशी माहिती द्यावी लागेल. सर्व तपशील दिल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून एक मेल येईल. या मेलमध्ये तुम्हाला संदर्भ क्रमांक मिळेल. मिळेल. यानंतर तुम्हाला भारतीय रेल्वेकडून कॉल येईल. त्यानंतर तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून टूर पॅकेज बुक करू शकाल.
हेही वाचा>>>
New Year पार्टीसाठी गोव्याला जायचंय? साऊथ गोव्यातील 'ही' ठिकाणं, जी कमी लोकांना माहित, एकदा भेट द्याल तर टेन्शन विसराल!
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )