Travel : कमी खर्च...सोबत जोडीदार..आठवणीतील ट्रीप...क्या बात है! भारतीय रेल्वेचे 'हे' पॅकेज पाहा, हॉटेल्स ते प्रवासापर्यंत सर्व काही...
Travel : कमी बजेटमध्ये भारतीय रेल्वेच्या पॅकेजसह प्रवास करणे खूप सोपे आहे. यामध्ये तुमच्या खाण्यापिण्यापासून ते चांगल्या हॉटेल्स आणि प्रवासापर्यंतच्या सर्व खर्चाचा समावेश होतो.
Travel : सुख म्हणजे तरी नेमकं काय असतं.. कमी खर्चात जोडीदारासोबत बाहेर पिकनिक प्लॅन करणं.. सोबत एकांतात वेळ घालवणं.. खरंच अशा एका अविस्मरणीय ट्रीपवर जायला कोणाला नाही आवडणार? जर तुम्हालाही तुमच्या जोडीदारासोबत एकांतात वेळ घालवायचा असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत दूर कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करू शकता. भारतीय रेल्वेच्या पॅकेजमधून प्रवास करणे सोपे आहे. कारण तुम्हाला तुमच्या प्रवासाचे नियोजन करण्याची गरज नाही. तुम्हाला कुठे प्रवास करायचा आहे आणि हॉटेल कसे असेल याची सर्व तयारी, सर्व गोष्टी भारतीय रेल्वेच्या पॅकेजमध्ये समाविष्ट आहेत. तुम्ही भारतीय रेल्वे पॅकेजद्वारे भारताच्या कोणत्याही भागात प्रवास करण्याची योजना करू शकता. जाणून घ्या सविस्तर
शिमला टूर पॅकेज
या पॅकेजसाठी तुम्ही दर शुक्रवारी तिकीट बुक करू शकता.
हे टूर पॅकेज चंदीगडपासून सुरू होत आहे.
पॅकेज फी - प्रति व्यक्ती पॅकेज फी 14,550 रुपये आहे.
पॅकेजमध्ये सर्व सुविधांचा समावेश आहे.
या पॅकेजमध्ये तुम्हाला शिमल्यातील प्रसिद्ध ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल.
यासाठी तुम्ही भारतीय रेल्वेच्या या वेबसाईटला भेट देऊ शकता - https://www.irctctourism.com/
गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि श्रीनगर टूर पॅकेज
पॅकेज फी- 32,200 रुपये प्रति व्यक्ती.
हे पॅकेज 20 एप्रिलपासून सुरू होत आहे. तुम्ही फ्लाइटमधून प्रवास करू शकाल.
हे टूर पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांसाठी आहे.
या पॅकेजमध्ये फ्लाइट तिकीट आणि हॉटेलसह सर्व सुविधांचा समावेश आहे.
पॅकेजमध्ये तुम्हाला गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि श्रीनगरला एकत्र भेट देण्याची संधी मिळेल.
यासाठी तुम्ही भारतीय रेल्वेच्या या वेबसाईटला भेट देऊ शकता - https://www.irctctourism.com/
अमृतसर, चंदीगड, धर्मशाला आणि शिमला टूर पॅकेज
या टूर पॅकेजद्वारे तुम्ही दररोज प्रवास करू शकता.
हे टूर पॅकेज 6 रात्री आणि 7 दिवसांसाठी आहे.
पॅकेज फी - दोन लोकांसोबत प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी 26760 रुपये आहे.
यासाठी तुम्ही भारतीय रेल्वेच्या या वेबसाईटला भेट देऊ शकता - https://www.irctctourism.com/
महेश्वर, मांडू, ओंकारेश्वर आणि उज्जैन टूर पॅकेज
हे पॅकेज इंदूरपासून सुरू होत आहे.
तुम्ही दर बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी या पॅकेजसह भेट देऊ शकता.
हे 2 रात्री आणि 3 दिवसांचे टूर पॅकेज आहे.
2 लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 10190 रुपये आहे.
पॅकेजमध्ये कॅबद्वारे प्रवास खर्च, हॉटेल आणि जेवणाचा खर्च समाविष्ट आहे.
यासाठी तुम्ही भारतीय रेल्वेच्या या वेबसाईटला भेट देऊ शकता - https://www.irctctourism.com/
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>