एक्स्प्लोर

Travel : 'इथे' मोकळ्या आभाळाखाली जणू भगवान शिव विराजमान! सूर्याची किरणं थेट शिवलिंगावर पडतात, एक चमत्कारिक मंदिर

Travel : मोकळ्या आभाळाखाली देवाची विशाल मूर्ती पाहून तुम्हाला असे वाटेल की देव स्वतः पृथ्वीवर अवतरले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी हे अनोखे दृश्य आणखीनच खास दिसते. 

Travel : धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शिव हे या जगताचे आदियोगी, प्रथम योगी, आदि गुरू, प्रथम गुरू आहेत. हिंदू धर्मात भगवान शिवाला मानणारा मोठा भक्तसमुदाय देश-विदेशात पाहायला मिळतो. भारतात तसेच परदेशात भगवान शिवाची अनेक मंदिरं आहेत. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही चमत्कारिक मंदिरांबद्दल सांगणार आहोत. जिथे मोकळ्या आभाळाखाली जणू भगवान शिव विराजमान असल्यासारखे वाटते. जिथे सूर्याची किरणं थेट शिवलिंगावर पडतात, जाणून घ्या..


Travel : 'इथे' मोकळ्या आभाळाखाली जणू भगवान शिव विराजमान! सूर्याची किरणं थेट शिवलिंगावर पडतात, एक चमत्कारिक मंदिर

इथे सूर्याची किरणे थेट शिवलिंगावर पडतात..!


मोकळ्या आभाळाखाली देवाची विशाल मूर्ती पाहून तुम्हाला असे वाटेल की देव स्वतः पृथ्वीवर अवतरले आहे. जर तुम्ही बंगळुरूमध्ये कुठेतरी एक दिवसाच्या पिकनिकचा प्लॅन करत असाल, तर तुम्ही येथे दर्शनासाठी जरूर जावे. गवी गंगाधरेश्वर मंदिर हे बंगळूरमध्ये आहे, या मंदिराचे वैशिष्ट्य सूर्यप्रकाशाशी संबंधित आहे. गविपुरम, बंगलोर येथे असलेल्या प्राचीन गुहा मंदिरात एक मनोरंजक दृश्य पाहण्यासाठी लोक दररोज येतात. येथे सूर्याची किरणे थेट नंदीच्या मूर्तीच्या शिंगांमधून पार जाऊन आणि थेट लिंगावर पडतात. मकर संक्रांतीच्या दिवशी हे अनोखे दृश्य आणखीनच खास दिसते. हे बंगळुरूचे प्रसिद्ध मंदिर मानले जाते.

भेट देण्याची वेळ : तुम्ही सकाळी 6 ते 11 आणि संध्याकाळी 5:30 ते 8:30 दरम्यान दर्शनासाठी जाऊ शकता.
फुटवेअर स्टँडसाठी तुम्हाला सुमारे 15 रुपये मोजावे लागतील.
स्थान- सर्वात जवळचे विमानतळ केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ 40 किमी अंतरावर आहे.
मंदिर बंगळूर शहरापासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावर आहे आणि रस्त्याने फक्त 20 मिनिटे लागतात.


Travel : 'इथे' मोकळ्या आभाळाखाली जणू भगवान शिव विराजमान! सूर्याची किरणं थेट शिवलिंगावर पडतात, एक चमत्कारिक मंदिर

शिवोहम शिव मंदिर

पांढऱ्या संगमरवरी कोरलेली भगवान भोलेनाथाची मोठी मूर्ती पाहण्यासाठी लोक दूरवरून येतात. भगवान शिवाची मुर्ती 65 फूट उंच आहे. या मंदिराचे काम 1995 मध्ये पूर्ण झाले. येथे तुम्हाला 32 फूट उंचीची गणेशमूर्तीही दिसेल. याशिवाय तुम्हाला येथे 25 फूट उंच शिवलिंगही पाहायला मिळेल. तुम्हाला अनेक भव्य मूर्ती एकत्र पाहायच्या असतील तर तुम्ही इथे जाऊ शकता. हे मंदिर 24 तास खुले असते.

स्थान- 97, एचएएल ओल्ड एअरपोर्ट रोड, रामगिरी, बेंगळुरू

 


Travel : 'इथे' मोकळ्या आभाळाखाली जणू भगवान शिव विराजमान! सूर्याची किरणं थेट शिवलिंगावर पडतात, एक चमत्कारिक मंदिर
मुक्तीनाथेश्वर मंदिर

हे मंदिर इ.स. 110 मध्ये चोलांनी बांधले असे मानले जाते. दक्षिण भारत आणि इतर जवळपासच्या देशांतील तमिळ चोलांचा शासक चोल समाज हा प्राचीन भारतातील एक राजवंश होता. येथे मंदिरात तुम्हाला काही सुंदर कोरीवकाम आणि शिलालेख दिसतील, जे मंदिराचा इतिहास सांगतात. जर तुम्हाला बंगळुरूमधील पौराणिक शिवमंदिराला भेट द्यायची असेल तर येथे नक्की जा....


इथल्या प्रसिद्ध मंदिरांनाही भेट द्या

भारतातील बंगळुरूमध्ये तुम्हाला अनेक सुंदर मंदिरांना भेट देण्याची संधी मिळेल. ही सर्व मंदिरे त्यांची वास्तुकला, हस्तकला आणि सुंदर चित्रांसाठी प्रसिद्ध आहेत. या मंदिरांचा शतकानुशतके जुना इतिहास आणि भगवान भोलेनाथांची स्थिती समजून घेण्यासाठी तुम्ही या मंदिरांना भेट देण्याची योजना करू शकता. भारताची आयटी राजधानी म्हणून ओळखले जाणारे, बेंगळुरू हे फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. तुम्ही दूरवरून इथे भेट देण्यासाठी येत असाल, तर तुम्ही इथल्या प्रसिद्ध मंदिरांनाही भेट द्यावी. शहरात 1,000 हून अधिक मंदिरे आणि प्रार्थनास्थळे आहेत, परंतु अशी काही मंदिरे आहेत जी तुम्हाला थक्क करून सोडतील.

 

 

हेही वाचा>>>

Travel : काय सांगता! चक्क जमीनीच्या आतून वाहते 'ही' अनोखी नदी? रामायणाशी संबंधित रहस्य, नेमकं सत्य काय? 

 

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Embed widget