Travel : लंकेतून परतल्यानंतर बजरंगबली आजही अयोध्येच्या 'या' गुहेत वास्तव्यास? हनुमान जयंतीनिमित्त 'या' ठिकाणाबद्दल जाणून घ्या
Travel : अयोध्येत असे आणखी एक मंदिर आहे, या मंदिरात अनेक रहस्ये आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. हनुमान जयंतीनिमित्त 'या' ठिकाणाबद्दल जाणून घ्या
Travel : अयोध्येत (Ayodhya) रामललाची स्थापना झाल्यापासून भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. श्रीरामाचे (Lord Ram) दर्शन घेण्यासाठी सर्वजण अयोध्येला जात आहेत. रामनवमी नंतर आता हनुमान जयंती 23 एप्रिल म्हणजेच मंगळवारी आहे. अशात अयोध्येत तुम्ही जात असाल तर श्री रामाच्या दर्शनासोबतच जवळच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट देण्याचा विचार अवश्य करा. तुम्हाला माहिती आहे का? की अयोध्येला अनेक मुर्ती, सुमारे 8000 मठ आणि मंदिरं आहेत. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध हनुमानजींचे मंदिर आहे. ज्याला हनुमानगढ़ी म्हणतात. हनुमानजी आजही येथे राहतात अशी भाविकांची धारणा आहे. त्यामुळे या मंदिरात गेल्याशिवाय रामललाचे दर्शन अपूर्ण आहे. असे म्हटले जाते. या मंदिरात अनेक रहस्ये आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. हनुमानगढ़ी इतके प्रसिद्ध का आहे? या मंदिराचे रहस्य काय आहे? जाणून घ्या...
लंकेतून परतल्यानंतर श्रीरामांसह अनेक वानर योद्धेही अयोध्येत
तुम्हीही अयोध्येला जात असाल तर एकदा हनुमानगढ़ी मंदिरात जरूर भेट द्यायला हवी. पौराणिक मान्यतेनुसार, लंकेतून परतल्यानंतर श्रीरामांसह अनेक वानर योद्धेही अयोध्येत आले. ज्यामध्ये सर्वात लाडके संदेशवाहक बजरंगबली देखील सामील होते. देवी सीतेच्या शोधापासून ते रावणाशी युद्धाच्या शेवटच्या क्षणापर्यंत हनुमानजींनी श्रीरामांना साथ दिली.
अयोध्येत आल्यावर भाविक आधी हनुमानजींचे दर्शन का घेतात?
हनुमानजीचे हे मंदिर अयोध्या शहराच्या मध्यभागी बांधलेले आहे. हे मंदिर राजद्वारासमोर एका उंच टेकडीवर आहे. अयोध्येतील शरयू नदीच्या उजव्या तीरावर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी भाविकांना 76 पायऱ्या चढाव्या लागतात. या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे तुम्हाला हनुमान चालीसा आणि चौपाई भिंतींवर लिहिलेले आढळतील. हे मंदिर श्रीरामाने हनुमानजींना सुपूर्द केले होते, असे अनेक मान्यतांमध्ये सांगितले जाते. मंदिर देताना ते म्हणाले की, कोणताही भक्त अयोध्येत आल्यावर त्याला सर्वात आधी हनुमानजींचे दर्शन घेईल.
हनुमानगढीचा इतिहास
असे मानले जाते की, हे मंदिर 18 व्या शतकाच्या सुरुवातीला बांधले गेले होते. हे मंदिर स्वामी अभयरामदासजींच्या सूचनेनुसार सिराज-उद-दौला यांनी बांधले होते. नवाबाच्या मुलाला एक आजार होता, त्यातून आराम मिळावा असा नवस केला होता, म्हणून त्याने हे मंदिर बांधले. मंदिर बांधल्यानंतर त्यांना आजारातून आराम मिळाला. असे मानले जाते की आजही हनुमानजी या मंदिरात वास्तव्य करून त्याची देखभाल करतात.
हनुमानगढ़ी मंदिरात कसे जायचे?
हनुमान गढी मंदिरात जाण्यासाठी अयोध्या आणि फैजाबाद रेल्वे स्टेशनवरून यावे लागेल.
याशिवाय गोरखपूर, प्रयागराज आणि वाराणसी विमानतळावरूनही पोहोचता येते.
अयोध्या रेल्वे स्थानकापासून 1 किमी अंतरावर आहे.
विमानाने- लखनौ आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सर्वात जवळचे विमानतळ आहे.
वेळ- हनुमानगढी पहाटे 5 वाजेपासून भाविकांसाठी खुली.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>
Hidden Gem Travel : कोकण किनारपट्टीतील एक लपलेलं रत्न! 'कर्दे' - एक प्राचीन, शांत समुद्रकिनारा; सर्व काही जाणून घ्या..