Teddy Day 2023 : प्रेमीयुगुलांसाठी खास आहे 'टेडी-डे', आपल्या जोडीदाराला 'असं' करा इम्प्रेस
Teddy Day 2023 : 10 फेब्रुवारी हा दिवस टेडी-डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमीयुगल एकमेकांना गिफ्ट म्हणून टेडीबिअर देतात.
Teddy Day 2023 : प्रेम करणाऱ्या लोकांसाठी सर्वात आवडता असा व्हॅलेंटाईन वीक सध्या सुरु आहे. आज या वीकमधील चौथा दिवस आहे. व्हॅलेंटाईन वीकमध्ये रोज डे, प्रपोज डे आणि चॉकलेट डे नंतर टेडी डे साजरा केला जातो. 10 फेब्रुवारी हा दिवस टेडी-डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमीयुगल एकमेकांना गिफ्ट म्हणून टेडीबिअर देतात. खासकरुन मुली आणि लहान मुलांचा लाडका असलेला टेडी आज जास्त खास असतो. कारण आज प्रेमी आपल्या प्रेयसीला टेडीबिअर गिफ्ट करतो. बाजारात देखील वेगवेगळ्या प्रकारचे टेडी सध्या विक्रीसाठी आले असून टेडीची मोठी उलाढाल प्रत्येक वर्षी होत असते.
टेडी-डे ला अधिक खास बनवण्यासाठी तसेच तुम्ही आपल्या पार्टनरला खूश करण्यासाठी टेडीनं आपल्या घराला सजवू शकता. बाजारात अनेक रंगांचे टेडी उपलब्ध आहेत. यात लाल, गुलाबी आणि पांढऱ्या रंगांचे टेडी सर्वात आवडते असतात. लाल रंग प्रेमाचं प्रतिक मानला जातो, त्यामुळे लाल रंगाचा टेडी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला देऊ शकता. तर गुलाबी रंग खासकरुन मुलींना खूप आवडतो, त्यामुळे गुलाबी रंगाचा टेडी देखील तुम्ही भेट करु शकता.
टेडीची सुरूवात अमेरिकेतून झाली
आजच्या काळात टेडीबियर अगदी सहजपणे हाताळला जातो. लहान मुलांपासून ते तरूण वयातील मुलींना टेडीबियर फार आवडतात. पण, याची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहित आहे का? तर, टेडी बिअरची सुरूवात अमेरिकेतून सुरू झाली. जेव्हा मिसीसिपी आणि लुझियानातील सीमा वाद समोर आला होता. त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष थेयोडोर रुझवेल्ट होते. रूझवेल्ट हे अमेरिकेचे 26 वे अध्यक्ष होते. रुझवेल्ट एक राजकारणी होतेच त्याचबरोबर ते एक चांगले लेखक देखील होते. मिसिसिपी आणि लुझियानातील वाद मिटविण्यासाठी रुझवेल्ट मिसिसिपीच्या भेटीला गेले होते. समस्या समजून घेण्यासाठी त्यांनी मोकळ्या वेळात मिसिसिपी जंगलाला भेट दिली. या वेळी त्यांनी झाडाला बांधलेल्या जखमी अस्वलाला पाहिले. या अस्वलाला कोणीतरी बांधले होते. अस्वल तळमळत होता. रुझवेल्टने अस्वलाला सोडले पण त्याला गोळी घालण्याचा आदेश दिला. जेणेकरून त्याला त्रासातून आराम मिळू शकेल. अमेरिकेत या घटनेची सर्वत्र चर्चा होती. या घटनेशी संबंधित एक व्यंगचित्र एका नामांकित वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले. हे व्यंगचित्र व्यंगचित्रकार बेरीमन यांनी बनविलेले अस्वल लोकांना आवडले. अमेरिकेच्या टॉय स्टोअरचे मालक मॉरिस मिचटॉम अस्वलच्या व्यंगचित्रातून इतके प्रभावित झाले. त्यांनी या अस्वलाचा आकार असलेले एक खेळणे तयार केले. त्याचे नाव रुझवेल्ट असे ठेवले गेले. कारण रुझवेल्ट यांचे टोपणनाव 'टेडी' होते. राष्ट्रपतींकडून त्यांच्या नावावर हे खेळण्याचे नाव ठेवण्याची परवानगी मिळाल्यानंतर ते बाजारात आणले गेले. लोकांना ते इतके आवडले की त्याची विक्री लगेच झाली. तेव्हापासून हे नाव लोकप्रिय झाले आहे. जगातील पहिले टेडी बिअर अजूनही इंग्लंडच्या पीटरफिल्डमध्ये सुरक्षित ठेवले आहे.