(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Skin Care Tips : सनस्क्रीनशी संबंधित 'या' गैरसमजांमुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं; आजच हे बदल करा
Skin Care Tips : सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन वापरणे महत्त्वाचे आहे.
Skin Care Tips : त्वचा तजेलदार आणि निरोगी ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर, स्क्रब, टोनर, क्लिनर अशा अनेक प्रोडक्टचा वापर केला जातो. सनस्क्रीनचा वापर हा त्वचेच्या निगा राखण्याच्या दिनचर्येतील एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. कारण सनस्क्रीन तुमच्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवते. त्यामुळे उन्हात बाहेर जाण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटे सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. जेणेकरून ते त्वचेत व्यवस्थित शोषले जाईल, असे सांगितले जाते. सध्या आम्ही सनस्क्रीनशी संबंधित गैरसमजांबद्दल जाणून घेऊयात, ज्यावर मुली सहज विश्वास ठेवतात आणि यामुळे अनेक वेळा त्वचेचं नुकसान होते.
अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन वापरणे महत्त्वाचे आहे. ते योग्यरित्या लावणे देखील तितकेच महत्वाचे आहे. चुकीच्या पद्धतीने सनस्क्रीन वापरणे फायदेशीर तर आहेच, पण त्यामुळे त्वचेला नुकसानही होते.
डार्क त्वचेच्या लोकांसाठी सनस्क्रीन आवश्यक नाही
डार्क त्वचेच्या लोकांना सनस्क्रीनची गरज नसते असा लोकांचा सहसा विश्वास असतो. पण हा फक्त एक गैरसमज आहे. सनस्क्रीन तुमच्या त्वचेला नुकसान होण्यापासून वाचवते. त्यामुळे प्रत्येकाला, त्यांचा रंग कोणताही असो, सनस्क्रीनची गरज असते.
SPF 50 असेल तर पुन्हा पुन्हा लावायची गरज आहे?
कोणताही सनस्क्रीन किती फायदा देईल हे त्याच्या SPF ग्रेडवर अवलंबून असते. SPF 50 सनस्क्रीन लावल्यानंतर पुन्हा पुन्हा लावण्याची गरज नाही, असे अनेकांचे मत आहे, पण तसे नाही. ठराविक कालावधीनंतर पुन्हा सनस्क्रीन लावू शकता.
थंड वातावरणात सनस्क्रीनची गरज नसते
लोकांना असे वाटते की, जेव्हा सूर्यप्रकाश पडत नाही तेव्हा थंड हवामानात सनस्क्रीनची आवश्यकता नसते. मात्र, हा गैरसमज आहे. कारण थंड वातावरणातही अतिनील किरण तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे प्रत्येक ऋतूमध्ये सनस्क्रीन वापरणे चांगले आहे.
सनस्क्रीन लावल्याने त्वचेला टॅनिंग होत नाही
जर तुम्ही सनस्क्रीन लावलं आणि तुम्हाला वाटत असेल की त्यामुळे तुमच्या त्वचेवर टॅनिंग होणार नाही, तर तो फक्त गैरसमज आहे. हे त्वचेचे अतिनील किरणांपासून संरक्षण करते, परंतु टॅनिंगपासून पूर्णपणे संरक्षण करू शकत नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :