Skin Care Tips : चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणण्यासाठी गुळाचा 'असा' करा वापर; या 3 पद्धतींनी घरच्या घरी बनवा सोपा फेस पॅक
Skin Care Tips : गुळात अनेक पौष्टिक गुणधर्मही आढळतात. गूळ खाण्यासाठीही फार स्वादिष्ट आहे.
Skin Care Tips : गूळ (Jaggery) आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. गुळात अनेक पौष्टिक गुणधर्मही आढळतात. गूळ खाण्यासाठीही फार स्वादिष्ट आहे. यामध्ये लोह, पोटॅशियम, जस्त, तांबे आणि इतर अनेक पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी आवश्यक आहेत. परंतु गुळाच्या वापरामुळे त्वचेशी (Skin Care Tips) संबंधित अनेक समस्या दूर होतात याबाबत अनेकांना कल्पना नाहीये. हे चेहऱ्यावरील डाग आणि वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. चला तर मग जाणून घेऊयात गुळाचा फेस पॅक कोणकोणत्या पद्धतींना बनवता येऊ शकतो.
गूळ आणि लिंबाचा फेस पॅक
हा फेसपॅक बनवण्यासाठी एका भांड्यात एक चमचा गूळ पावडर घ्या. त्यात लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद घाला. आता या मिश्रणाची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा. चेहरा कोरडा झाल्यानंतर, पाण्याने धुवा. या फेसपॅकचा नियमित वापर केल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात.
गूळ आणि टोमॅटो
मुरुमांच्या समस्येने तुम्ही हैराण असाल तर तुम्ही हा फेस पॅक वापरून पाहू शकता. हा फेस पॅक करण्यासाठी गूळ पावडरमध्ये टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण चांगले फेटून घ्या. हा पॅक चेहऱ्यावर लावा, काही वेळाने चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
गूळ आणि गुलाब पाण्याचा फेस पॅक
गुळात ग्लायकोलिक अॅसिड आढळते. हे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा दूर करण्यास मदत करते. हा फेस पॅक बनवण्यासाठी एक चमचा गूळ पावडर घ्या, त्यात गुलाब पाणी मिसळा. आता हा पॅक चेहऱ्यावर लावा, सुमारे 15-20 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता.
मध आणि गुळाचा फेस पॅक
मध हे नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. मधाच्या वापराने तुमची त्वचा सुधारण्यास मदत होते. मधाचा फेस पॅक तयार करण्यासाठी एका छोट्या भांड्यात मध आणि गूळ एकत्र करून घट्ट पेस्ट बनवा. आणि ती चेहऱ्यावर लावा. थोड्या वेळाने चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :