एक्स्प्लोर

Skin Care: चेहऱ्यावर साचलेली घाण काढण्यासाठी दह्यात मिसळा 'ही' गोष्ट; चेहरा उजळेल

Skin Care Tips: दह्यापासून बनवलेल्या फेसपॅकने तुम्ही घरच्या घरी त्वचेची काळजी घेऊ शकता. दह्याचे फेस पॅक तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक देईल. कसा बनवायचा फेस पॅक? जाणून घ्या.

Curd Face Pack: चेहऱ्याचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. स्किन केअर रूटीनमध्ये फेस पॅकपासून (Face Pack) ते फेस स्क्रबपर्यंत (Face Scrub) सर्व गोष्टींचा समावेश करणे खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे त्वचेवरची घाण निघून जाते. त्वचेवरच्या मृत पेशी (Dead Skin Cells) काढून टाकल्याने चेहऱ्यावर चमक येते, त्यासाठी बहुतांश महिला बाजारातील उत्पादनं निवडतात, जी खूप महागही असतात आणि त्यात अनेक केमिकल्स (Chemicals) देखील असतात, ज्यामुळे भविष्यात त्वचेला हानी पोहोचू शकते.

त्वचेची काळजी घेण्यासाठी आम्ही तुम्हाला एक किफायतशीर आणि घरगुती उपाय सांगणार आहोत. दह्यापासून बनवलेल्या फेसपॅकने तुम्ही घरच्या घरी त्वचेची काळजी घेऊ शकता. दह्याचा फेस पॅक तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक देईल. जाणून घेऊया, दह्याचा फेस पॅक कसा तयार करायचा आणि दह्यात काय मिक्स करून लावल्यास चांगले परिणाम मिळतील.

दही आणि टोमॅटो फेस पॅक

चेहऱ्यावरील घाण काढण्यासाठी तुम्ही दही आणि टोमॅटोचा फेस पॅक लावू शकता. या दोन्ही गोष्टी त्वचेवर जबरदस्त ग्लो आणण्याचे काम देखील करतात. टोमॅटोपासून त्वचेला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन बी मिळते, त्यामुळे टॅनिंगची समस्या दूर होते. हा फेस पॅक चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करतो. या फेसपॅकमुळे सनबर्नची समस्या दूर होते, चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होतात. दुसरीकडे दही त्वचेला हायड्रेट ठेवते आणि त्यात टॅनिंग कमी करण्याची क्षमता देखील असते. या दोन्हीच्या मिश्रणाने त्वचेशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.

पॅक कसा बनवायचा?

दही आणि टोमॅटोचा फेस पॅक बनवण्यासाठी एका टोमॅटोची मिक्सरमध्ये पेस्ट बनवून त्यात दोन चमचे दही मिसळा. आपला चेहरा धुवा आणि स्वच्छ कापडाने कोरडा करा. त्यानंतर, हा पॅक संपूर्ण चेहरा आणि मानेवर चांगला लावा. 15 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यानंतर चेहऱ्यावर तुमचे मॉइश्चरायझर लावा. फेस पॅक लावल्यानंतर काही तास चेहऱ्यावर साबण वापरणे टाळा.

दही आणि मध फेस पॅक

दही आणि मधाचा पॅक देखील तुमच्या चेहऱ्यावर तेज आणू शकतो. हा पॅक लावल्याने मुरुमांची समस्या दूर होते. दह्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि लॅक्टिक अॅसिड असते, जे मुरुमांशी लढण्यास मदत करते. दुसरीकडे, मधामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे त्वचेचा लालसरपणा आणि सूज दूर करण्याचे काम करतात. दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असते जे त्वचेला टोनिंग करण्यास मदत करते. दही आणि मधाचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने त्वचा गोरी आणि डागरहित दिसते. याशिवाय बारीक रेषा आणि सुरकुत्यांची समस्याही कमी होते.

फेस पॅक कसा बनवायचा?

दही आणि मधाचा फेस पॅक बनवण्यासाठी दोन चमचे दही एक चमचा मधात मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. या फेस पॅकच्या नियमित वापराने तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.

हेही वाचा:

Summer Tips: सनस्क्रीन खरोखर सूर्यापासून तुमचे संरक्षण करते का? जर होय तर ते कसे? जाणून घ्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
Embed widget