Skin Care Tips : सुंदर आणि तजेलदार त्वचेसाठी 'या' काळ्या बिया गुणकारी; इतरही फायदे जाणून आश्चर्यचकित व्हाल
Skin Care Tips : आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्याला पचनाच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
Skin Care Tips : तुळशी ही एक अशी औषधी वनस्पती आहे जी जवळपास प्रत्येक घरात आढळते. भारतीय संस्कृतीत तुळशीला खूप महत्त्व आहे. धार्मिकतेबरोबरच तुळशीचे अनेक आरोग्यदायीही फायदे आहेत. तुळशीची पाने, फुले आणि बिया या सर्वांचाच कोणत्या ना कोणत्या प्रकारे वापर केला जातो. तसेच, तुळशीच्या बिया (Basil Seeds) देखील आपल्या आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर आहेत. असे असले तरी फार कमी लोकांना याबद्दल माहिती आहे. या ठिकाणी आपण त्वचेबरोबरच तुळशीचे आरोग्यदायी फायदे नेमके कोणते आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
तणाव कमी करण्यास उपयुक्त
तुळशीच्या बियांमध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील तणाव हार्मोन्स कमी करतात. यामुळे आपले मन शांत आणि तणावमुक्त राहते. त्यामुळे तुम्हीही तणावाने त्रस्त असाल तर तुळशीच्या बियांचे सेवन सुरू करा.
पचनाच्या समस्या दूर होतात
आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्याला पचनाच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोट फुगणे इ. समस्यांवर मात करण्यासाठी तुळशीच्या बिया फार उपयुक्त ठरतता. खरंतर, तुळशीच्या बियांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. हे फायबर आपली पचनसंस्था सुरक्षित ठेवते.
वजन कमी करण्यास मदत
तुळशीच्या बियांमध्ये असलेल्या फायबरमुळे पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे तुमची भूक कमी होते. याशिवाय ते तुमची पचनसंस्थाही निरोगी ठेवण्यास उपयुक्त आहेत. अशा प्रकारे, वजन नियंत्रित करण्यास फार गुणकारी आहेत.
त्वचेसाठी फायदेशीर
तुळशीच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. हे दोन्ही आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. व्हिटॅमिन ई त्वचेला सॉफ्ट आणि तजेलदार बनवते तर अँटिऑक्सिडंट्स बाह्य घटकांमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करतात. म्हणूनच, जर तुम्हाला तुमची त्वचा निरोगी, चमकदार आणि सुंदर ठेवायची असेल, तर दररोज तुळशीच्या बियांचे सेवन सुरू करा. तुळशीच्या बियांचा जर तुम्ही अशा प्रकारे वापर केला तर तुम्हाला फायदेच फायदे मिळतीत. सुंदर आणि तजेलदार त्वचेबरोबरच तुम्हाला अनेक फायदे देखील मिळतील. त्यामुळे आजपासूनच या बिया वापरा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :