Rose Day 2025 Wishes In Marathi: 'तूच माझ्या आयुष्यातील गुलाब!' 'रोझ डे' निमित्त खास शुभेच्छा संदेश प्रियजनांना पाठवा, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहा!
Rose Day 2025 Wishes In Marathi: जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासाठी 'रोझ डे' अधिक सुंदर बनवायचा असेल, तर या सुंदर शुभेच्छा तुम्ही तुमच्या प्रियजनांना देऊ शकता..

Rose Day 2025 Wishes In Marathi: 7 फेब्रुवारी म्हणजेच आजपासून व्हॅलेंटाइन वीक सुरू होत आहे, या आठवड्यतील पहिला दिवस हा रोझ डे म्हणून साजरा केला जातो. जर तुम्ही जोडीदारापासून दूर राहत असाल, आणि तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचवाच्या असतील, तर तुम्ही त्यांना अप्रतिम संदेशांद्वारे शुभेच्छा देऊ शकता. हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत. कारण तुमच्या प्रियजनांना या शुभेच्छा खूप आवडतील. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासाठी यंदाचा रोझ डे अधिक सुंदर बनवायचा असेल, तर या शुभेच्छांसोबत त्यांना काही गिफ्ट किंवा सरप्राईज द्यायला विसरू नका. अशा वेळी, त्यांना सुंदर शुभेच्छा संदेश पाठवल्याने त्यांचा दिवस चांगला जाईल आणि त्यांना खूप आनंदही होईल.
माझ्या गुलाबाच्या फुला, काय सांगू तुला,
आठवण येते मला पण इलाज नाही त्याला
कारण प्रेम म्हणतात याला
Happy Rose Day!!
--------------------------------------------------------------
प्रेम, इश्क, मोहब्बत म्हणजे काय मला माहीत नाही
मला फक्त इतकंच माहीत आहे
तुझा चेहरा आहे
जो गुलाबासारखा नाजूक आहे.
हॅप्पी रोझ डे!
----------------------------------------------------------------
मी देवाकडे मागितले फूल
पण देवाने मला
तुझ्यासारखे गुलाब आयुष्यात दिले
हॅप्पी रोज डे!
----------------------------------------------------------------
लाल रंग प्रेमाचा,
पिवळा आहे मैत्रीचा,
पांढऱ्यातून मिळते शांती
गुलाबी आहे कृतज्ञतेचा…
म्हणूनच आज मी तुला सर्व रंगाची फुल देत आहे.
हॅप्पी रोझ डे!
----------------------------------------------------------------
मैत्री आणि प्रेमात एक छोटसं अंतर असतं
मैत्री गुलाबाचं फुल आहे
तर प्रेम त्या गुलाबाचा सुगंध असतं.
हॅप्पी रोझ डे!
-------------------------------------------------------------------
या जगात दोन गोष्टी मोजता येत नाहीत
माझे तुझ्यावरचे प्रेम आणि लाल गुलाबांचे सौंदर्य
रोझ डे च्या तुला मनःपूर्वक शुभेच्छा!
-------------------------------------------------------------------
मला प्रेमात हरायचं अथवा जिंकायचं नाही,
फक्त तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे.
हॅप्पी रोझ डे!
-----------------------------------------------------------------------
गुलाबाचं फुल आज माझ्या प्रिय पत्नीला
जी मला तिच्या तळहातावरच्या फोडोप्रमाणे जपते.
हॅप्पी रोझ डे!
--------------------------------------------------------------------------
आपले प्रेम हे गुलाबासारखे आहे
अलवार फुलणारे.
रोझ डे च्या तुला मनःपूर्वक शुभेच्छा!
------------------------------------------------------------------------
जसं गुलाब गुलाबाच्या रोपाशिवाय जगू शकत नाही,
तसंच मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत
हॅप्पी रोझ डे!
-------------------------------------------------------------------------------
तू कविता असशील
तर मला शब्द व्हायचं आहे,
तुला मिळवायचं नाही,
आयुष्यभर तुझं व्हायचं आहे.
हॅप्पी रोझ डे!
--------------------------------------------------------------------------
माझ्या वेडेपणाला काहीच मर्यादा नाही
मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही
मी गुलाब आहे तुझ्या बागेतला
माझ्यासाठी तुझ्याशिवाय या जगात कुणीच नाही.
हॅप्पी रोझ डे!
---------------------------------------------------------------------------
तुझे प्रेम गुलाबाच्या सुगंधासारखे आहे
जेव्हा मी उदास असतो
तेव्हा ते मला रिफ्रेश करते
माझ्या आयुष्यातील प्रेमाला हॅप्पी रोझ डे!
------------------------------------------------------------------------------
जेव्हा जेव्हा मी गुलाबाचं फुल पाहिन
माझ्या डोळ्यासमोर तुझाच चेहरा समोर येईल.
रोझ डे च्या तुला मनःपूर्वक शुभेच्छा!
----------------------------------------------------------------------------------
गुलाबाच्या फुलाला गुलाब कसं देऊ
तूच आहेच श्वास माझा
तुझ्याशिवाय कसं जगू
हॅप्पी रोझ डे!
-------------------------------------------------------------
तू माझ्या आयुष्याचा गुलाब आहेस!
हॅप्पी रोझ डे..!
हेही वाचा>>>
Rose Day: आज रोझ डे! प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाचंच फूल का दिलं जातं? कारण जाणून व्हाल थक्क! अनेकांना माहीत नाही
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )























