Year Ender 2023 : 2023 मध्ये भारतीय देवा चरणी लीन; 'या' मंदिरात केली चिक्कार गर्दी, तुम्ही 'या' मंदिरात गेलाय का?
2023 या वर्षात भारतातील काही मंदिरांमध्ये भाविकांनी तर प्रचंड गर्दी केली होती. त्या मंदिराचे रिल्स फोटो आणि व्हिडीओदेखील सोशल मीडियावर शेअऱ केले होते. या टॉप मंदिरांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Year Ender 2023 : भारत हा धर्मनिरपेक्ष देश असला तरी येथे हिंदू समाजातील (Year Ender 2023) लोक सर्वाधिक दिसतात, त्यामुळे पवित्र हिंदू मंदिरेही येथे सर्वाधिक दिसतात. येथे लहानांपासून मोठ्या (Indian famous Temple) मंदिरापर्यंत सर्वत्र भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतील. यावर्षी सर्वाधिक भेट देणाऱ्या मंदिरांबद्दल बोलायचे झाले तर भारतातील काही मंदिरांमध्ये भाविकांनी तर प्रचंड गर्दी केली होती. त्या मंदिराचे रिल्स फोटो आणि व्हिडीओदेखील सोशल मीडियावर शेअऱ केले होते. 2023 च्या या टॉप मंदिरांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
केदारनाथ मंदिर
केदारनाथ मंदिर केवळ धार्मिक पर्यटकांमध्येच प्रसिद्ध नाही, तर इतर निसर्गप्रेमींमध्येही प्रसिद्ध आहे. हे मंदिर भव्य हिमालयाच्या कुशीत वसलेले आहे आणि हिवाळ्यात संपूर्ण प्रदेश बर्फाने झाकलेला असतो. त्यामुळे अर्धा वर्ष ते बंदच असतं. हे मंदिर भगवान शंकरासाठी बांधण्यात आले असून महाभारतातील पांडवांनी हे मंदिर बांधले असल्याचा दावा केला जातो. तेथे जाण्यासाठी भाविकांना 14 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार करावे लागतं.
वैष्णोदेवी मंदिर
वैष्णोदेवी मंदिर जगभरातील हिंदू धर्माच्या लोकांमध्ये प्रसिद्ध आणि अत्यंत पवित्र आहे. हे मंदिर केवळ धार्मिक एकात्मतेसाठी प्रसिद्ध नाही, तर कटऱ्याचा मार्गही मोहक सुंदर आहे. लाखो भाविक येथे माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी येतात आणि मंदिराच्या सभोवतालच्या बर्फाच्छादित डोंगरांचा आनंद घेतात.
जगन्नाथ मंदिर
जगन्नाथ मंदिर ओडिशा राज्यातील पुरी येथे आहे आणि हे अनेक कारणांमुळे संपूर्ण जगातील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. रथयात्रा प्रसिद्ध आहे. हा सण इतका प्रसिद्ध आहे की, तो पाहण्यासाठी जगभरातून लोक पुरीत जमतात. जगन्नाथ मंदिर भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे आणि जर आपण तेथे गेलात तर आपल्याला मंदिराची भव्यता अनुभवायला मिळेल.
अमरनाथ गुहा
अमरनाथ गुहा जम्मू-काश्मीर राज्यात असून ती 500 वर्षांहून अधिक जुनी आहे. हे मंदिर 3900 मीटर उंचीवर आहे आणि त्यामुळे हिवाळ्यात येथे जाता येत नाही कारण बर्फवृष्टीमुळे मंदिराकडे जाण्याचा मार्ग बंद असतो. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे आणि विशेष म्हणजे हे मंदिर मानवनिर्मित नाही. बर्फापासून बनवलेली ही एक नैसर्गिक गुहा आहे, जिथे बर्फाच्या लिंगाची पूजा केली जाते. जगभरातून लाखो प्रवासी या गुहेत पायी प्रवास करुन येतात आणि इथपर्यंत पोहोचणे देखील खूप चॅलेंजिंग असते.
इतर महत्वाची बातमी-