Shani Dev : शनिदेवाची मूर्ती घरात ठेवणे का शुभ मानले जात नाही? यामागील श्रद्धा, पौराणिक कथा जाणून घ्या
Shani Dev : शनिवारी शनिदेवाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते, परंतु शनिदेवाच्या उपासनेशी संबंधित काही खास नियम आहेत. जाणून घ्या
Shani Dev : शनिवारी न्यायाची देवता शनिदेवाची पूजा केली जाते. ज्यांच्यावर शनिदेव प्रसन्न होतात त्यांना त्यांच्या कामात कधीही अडथळे येत नाहीत. जर कुंडलीत शनि शुभ स्थितीत असेल तर व्यक्तीचे कोणतेही काम सहज होते. शनीची अशुभ स्थिती प्रत्येक कामात अडथळा आणते. शनिवारी शनिदेवाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते परंतु शनिदेवाच्या उपासनेशी संबंधित काही खास नियम आहेत.
शनिदेवाची मूर्ती घरात ठेवणे का शुभ मानले जात नाही?
लोक सहसा सर्व देवी-देवतांच्या मूर्ती पूजेसाठी घरात ठेवतात, परंतु शनिदेवाची मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जात नाही. जाणून घेऊया शनिदेवाची मूर्ती घरातील पूजास्थानी ठेवणे शुभ का मानले जात नाही.
शनिदेवाशी संबंधित श्रद्धा
धार्मिक मान्यतेनुसार शनिदेवाची मूर्ती कधीही घरात ठेवू नये. यामागे एक पौराणिक कथा आहे. या कथेनुसार शनिदेवाला शाप दिला होता की, तो ज्याच्याकडे पाहील त्याचे वाईट होईल. शनिदेवाची दृष्टी थेट घरातील सदस्यांवर पडू नये, म्हणून त्यांची मूर्ती घरातील मंदिरात न ठेवण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही जरी मंदिरात शनिदेवाची पूजा करत असाल, तर त्यांच्या समोर कधीही थेट उभे राहणार नाही याची विशेष काळजी घ्या. तसेच शनिदेवाच्या डोळ्यात डोकावून पाहू नका.
शनिपूजेच्या वेळी ही चूक करू नका
असे मानले जाते की शनिदेवाच्या मूर्तीसमोर उभे राहून कधीही त्यांची पूजा करू नये कारण यामुळे वाईट दृष्टीचा सामना होतो. ज्यामुळे शनीची वाईट नजर तुमच्यावर येते, आणि तुमच्या त्रासात वाढ होते. शनिदेवाची पूजा नेहमी मूर्तीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला उभी राहून करावी. जवळच्या मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करावी. पिंपळाच्या झाडाखाली दीप प्रज्वलित केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि भक्तांवर आपला आशीर्वाद देतात.
शनिदेव कोणाला कठोर शिक्षा देतात?
ज्योतिषशास्त्रीय ग्रंथांमध्ये, शनिला कर्मफळ देणारा आणि कलियुगाचा दंडाधिकारी देखील म्हटले आहे. शनि कष्टाचा कारक आहे. त्यांची हालचाल सर्वात मंद आहे, म्हणूनच राशींवर त्यांचा प्रभाव सुमारे अडीच वर्षे टिकतो. कुंडलीतील शनीची साडेसाती, ढैय्या आणि महादशा या काळात शनि व्यक्तीवर सर्वात जास्त प्रभाव टाकतात. प्रश्न असा येतो की शनि कोणत्या लोकांना सर्वात जास्त शिक्षा देतात? जे लोक नेहमी इतरांचे नुकसान करण्यास उत्सुक असतात त्यांना शनि अधिक त्रास देतात. जे दुर्बल घटकातील लोकांना त्रास देतात आणि त्यांचे हक्क हिरावून घेतात. अशा लोकांना शनि नक्कीच कठोर शिक्षा देतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Dev : 2024 मध्ये शनि बनवणार विशेष 'राजयोग'! 3 राशी ठरणार भाग्यशाली, आर्थिक लाभ, करिअर प्रगती, सुखी वैवाहिक जीवन जाणून घ्या