Amavasya 2023 : शनिवारच्या अमावस्येला विशेष महत्त्व, पूर्वजांसोबतच शनिदेवाचीही होईल कृपा! 'हे' काम करा
Amavasya 2023 : यंदाची सर्वपित्री अमावस्या 14 ऑक्टोबरला आहे. हा दिवस शनिवार असल्याने ती शनिश्चरी अमावस्या मानली जाईल. या दिवशी सूर्यग्रहणही होत आहे.
Amavasya 2023 : हिंदू धर्मात शनिश्चरी अमावस्येला (Shani Amavasya 2023) विशेष महत्त्व आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा, व्रत आणि विधी केले जाते. शनिदेवाची (Shani Dev) कृपा प्राप्त करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. पितृ पक्षातील (Pitru Paksha 2023) अमावस्या तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. याला सर्वपित्री अमावस्या असेही म्हणतात. या तिथीला श्राद्ध आणि तर्पण केल्याने पितृदोष किंवा कालसर्प दोष यांसारख्या समस्यांपासून मुक्ती मिळते. यावेळी शनिश्चरी अमावस्या उद्या म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी आहे.
शनी अमावस्येचा शुभ मुहूर्त
पंचागानुसार, ते 13 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 09:50 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 14 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 11:24 वाजता संपेल. या दिवशी शुभ मुहूर्तावर पूजा केल्याने पितरांची तसेच शनिदेवाची कृपा प्राप्त होते.
सकाळची वेळ - 07.47 सकाळी - 12.14 दुपारी
ब्रह्म मुहूर्त - 04.41 सकाळी - 05.31 सकाळी
अमृत काल - सकाळी 09.51 ते 11.35 पर्यंत
अमावास्येला तर्पण करण्यासाठी 3 शुभ वेळ
कुतुप मुहूर्त - सकाळी 11:44 ते दुपारी 12:30 पर्यंत
रोहीण मुहूर्त - दुपारी 12:30 ते 01:16
दुपारची वेळ - दुपारी 01:16 ते दुपारी 03:35 पर्यंत
शनिश्चरी अमावस्येला 'हे' काम करा
ज्या लोकांवर शनीची साडेसाती आणि ढैय्या चालू आहे, त्यांनी शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी तर्पण, पिंड दान आणि पिंपळाची पूजा अवश्य करावी. यामुळे शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो.
शनि अमावस्येच्या दिवशी सूर्योदयापूर्वी पवित्र नदीत स्नान करावे.
यानंतर तांब्याच्या भांड्यात पवित्र पाण्याने सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे.
मुहूर्तानुसार श्राद्ध विधी करा. यानंतर पिंपळाच्या झाडावर तुपाचा दिवा लावावा. मग आपल्या पूर्वजांचे ध्यान करा.
शनि अमावस्येच्या दिवशी शनिदेवाला मोहरीचे तेल आणि काळे तीळ अर्पण करणे खूप शुभ मानले जाते.
यानंतर 108 वेळा ओम शं शनैश्चराय नमः मंत्राचा जप करावा. असे मानले जाते की यामुळे शनीची साडेसाती आणि ढैय्याचा अशुभ प्रभाव कमी होतो.
या दिवशी शनिदेवाची यथासांग पूजा करावी आणि शनि चालिसाचे पठण करावे.
शनि चालिसाचे पठण केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो.
या दिवशी व्रत पाळणे आणि अन्न, वस्त्र, पैसा किंवा इतर आवश्यक वस्तू गरीब, गरजूंना दान केल्याने पितर आणि शनिदेव प्रसन्न होतात.
या दिवशी शक्य तितके पुण्य कार्य करावे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :
Shani Dev : शनीच्या प्रकोपापासून मुक्ती देणारे 'हे' खास स्तोत्र! राजा दशरथाने लिहिलेले स्तोत्र जाणून घ्या