एक्स्प्लोर

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला काळ्या रंगाचेच कपडे का परिधान करतात? वाचा यामागचं पौराणिक महत्त्व

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला आवर्जून काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. पण, मकर संक्रांतीला काळ्या रंगाचेच कपडे का घालतात याबाबत फार कमी लोकांना माहिती आहे.

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीचा (Makar Sankranti 2024) सण अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. 15 जानेवारीला संपूर्ण भारतात हा सण साजरा केला जाणार आहे. नवीन वर्षातील पहिलाच सण असल्यामुळे सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच हा सण अगदी मोठ्या उत्सहात साजरा करतात. मकर संक्रांतीला आवर्जून काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. पण, मकर संक्रांतीला काळ्या रंगाचेच कपडे का परिधान केले जातात? या दिवशी काळ्या रंगाचं नेमकं महत्त्व काय? हे फार क्वचितच लोकांना माहीत आहे. यासाठीच आज या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.    

मकर संक्रांतीचा सण हिंदू धर्मात विशेष मानला जातो. देशभरात मकर संक्रात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. हा सण जरी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत असले तरी यामध्ये एक गोष्ट सामान्य आहे ती म्हणजा काळ्या रंगाचे कपडे. नवविवाहीत वधू असेल तर तिला काळ्या रंगाची साडी आणि हलव्याचे दागिने भेट म्हणून दिले जातात. 

मकर संक्रातीला काळ्या रंगाचे कपड का परिधान करतात? 

पुराणातील अशी एक कथा सांगितली जाते की, सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावलीने काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं होतं. तर, मकर संक्रांती हा हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस असतो. अशा वेळी जास्त उष्णता शोषून घेणारे काळ्या रंगाचे कपडे या दिवशी परिधान केले जातात. हे यामागचं वैज्ञानिक कारण आहे. कारण काळ्या रंगाच्या कपड्यात जास्त ऊब असते. त्यामुळे संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. मकर संक्रांतीला तिळाचं देखील महत्त्व यासाठीच आहे कारण तीळ हे उष्ण असतात. शरीराला उष्णता मिळावी आणि शरीर उष्ण राहावं यासाठी संक्रांतील तिळगुळ वाटले जातात. 

मकर संक्रांतीचं महत्त्व 

या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्य हा धनू राशीतून शनिचा पुत्र मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून या दिवसानंतर दिवस हा मोठा आणि रात्र लहान होते. सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने या दिनाला ‘मकर संक्रांती’ असे म्हणतात. एक राशीला सोडून दुसर्‍या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेस संक्रांती म्हणतात. यासाठी मकरसंक्रांतीला काळा रंग आवर्जून परिधान केला जातो.

महत्त्वाच्या बातम्या : 

Makar sankranti 2024 : हिवाळ्यात गरम पदार्थांचं सेवन फायदेशीर तितकंच धोक्याचं; शरीरावर कोणते परिणाम होतात?

महत्त्वाच्या बातम्या

Mangalagaur 2026: आजपासून मंगळागौरला सुरूवात.. पूजेसाठी फक्त 'ही' वेळ टाळा! शुभ मुहूर्त कोणता? सोपी पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा... 
आजपासून मंगळागौरला सुरूवात.. पूजेसाठी फक्त 'ही' वेळ टाळा! शुभ मुहूर्त कोणता? सोपी पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा... 
Hindu Religion: ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
Shravan 2026: सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
Nag Panchami 2026: नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget