एक्स्प्लोर

Janmashtami 2023 : जन्माष्टमीच्या दिवशी अनावधानानेही 'या' चुका करुन नका, अन्यथा होऊ शकतं नुकसान

Krishna Janmashtami 2023 : श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करताना काही गोष्टी करणं टाळायला हवं. अन्यथा तुम्हाला नुकसान भोगावं लागेल.

Janmashtami 2023 : आज श्रीकृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami 2023) आहे. भगवान विष्णूने भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्री कृष्णाच्या रुपात आठवा अवतार घेतला असं सांगितलं जातं. त्यामुळेच दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. भगवान श्रीकृष्णाचा जन्म म्हणून कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. धार्मिक मान्यता आणि धर्मग्रंथानुसार श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला होता. यामुळेच कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री श्रीकृष्णाची पूजा करण्याची पद्धत आहे.

जन्माष्टमीच्या दिवशी 'या' चुका करुन नका

श्रीकृष्णाचे भक्त फक्त भारतातच नाहीत, तर संपूर्ण जगात आहे. अवघ्या जगभरात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. उपवास आणि पूजा करुन भगवान विष्णूचा आशिर्वाद आणि कृपादृष्टी मिळवण्यासाठी भक्तगण प्रयत्न करतात. पण, या दिवशी काही गोष्टींचं भान राखायला हवं. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी काही गोष्टी चुकूनही करुन नका, नाहीतर तुम्हाला याचा त्रास सहन करावा लागेल.

जन्माष्टमी साजरी करताना काही गोष्टी करणं टाळायला हवं. अन्यथा तुम्हाला नुकसान भोगावं लागेल.

  • चुकूनही तुळशीची पानं तोडू नका. या दिवशी कृष्ण पूजेसाठी तुळशीची पानं हवी असल्यास ती आदल्या दिवशीच तोडून घ्यावीत. जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नयेत. कोणतेही झाड तोडू नका.
  • गोमातेचा अपमान करु नका. गाय किंवा वासराला कोणत्याही प्रकारे त्रास देऊ नका. श्रीकृष्णाला गोमाता अतिशय प्रिय आहे, त्यामुळे या दिवशी गोमातेचा अपमान होईल असं काम करु नका.
  • मांस, दारु यांचं सेवन करु नका किंवा घरात आणू नका. या दिवशी जेवणात लसूण आणि कांदा यांचा वापर करणं टाळा.
  • कुणाचाही अनादर करु नका. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी धनी किंवा गरीब कोणत्याही व्यक्तीचा अपमान केल्यास भगवान विष्णूंचा कोप होईल.
  • तांदूळ किंवा भाताचं सेवन करु नका. जन्माष्टमीच्या दिवशी उपवास असेल किंवा नसेल तरी तांदूळ किंवा भाताचं सेवन करणं टाळा.
  • पूजेला बसताना काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करु नका. या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करणं शुभ मानलं जातं.
  • उपवास असेल तर तो रात्री 12 वाजेनंतरच सोडावा.
  • ब्रम्हचार्याचं पालन करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Janmashtami 2023 : यंदा कृष्ण जन्माष्टमी 6 की 7 सप्टेंबरला? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त, आणि महत्त्व

महत्त्वाच्या बातम्या

Pandharpur: वारकऱ्यांसाठी आनंदवार्ता! आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात तब्बल 12 लाख बुंदी लाडू प्रसाद तयार, FDA कडून तपासणी पूर्ण
वारकऱ्यांसाठी आनंदवार्ता! आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात तब्बल 12 लाख बुंदी लाडू प्रसाद तयार, FDA कडून तपासणी पूर्ण
Lord Shiv: तांबे..पितळ..चांदी..स्टील की इतर..शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी कोणते धातू वापरणे शुभ? 'ही' भांडी टाळावीत? शिवपुराण, शास्त्रात म्हटलंय...
तांबे..पितळ..चांदी..स्टील की इतर..शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी कोणते धातू वापरणे शुभ? 'ही' भांडी टाळावीत? शिवपुराण, शास्त्रात म्हटलंय...
Shravan 2026: भगवान शंकरांच्या पूजेत 3 पानांच्या बेलपत्रालाच महत्त्व का आहे? शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करण्यामागील श्रद्धा काय आहे?
भगवान शंकरांच्या पूजेत 3 पानांच्या बेलपत्रालाच महत्त्व का आहे? शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करण्यामागील श्रद्धा काय आहे?
Shiv Puran: कलियुगात माणसाचा स्वभाव कसा बदलत जाईल? कलियुगाचा अंत व्हायला किती वेळ शिल्लक? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल
कलियुगात माणसाचा स्वभाव कसा बदलत जाईल? कलियुगाचा अंत व्हायला किती वेळ शिल्लक? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
Embed widget