Diwali 2023 : धनत्रयोदशीला सोनं खरेदी करताय? तर, 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा; फसवणूक होणार नाही
Diwali 2023 : दिवाळीत सोनं खरेदी करणं हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं.
Diwali 2023 : आनंदाचा, उत्साहाचा आणि प्रकाशाचा असा दिवाळी (Diwali 2023) सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. अशातच सर्वांची दिवाळी खरेदीसाठी लगबग बाजारात पाहायला मिळतेय. दिवाळी सुरु होते ती धनत्रयोदशीपासून (Dhanatrayodashi). या दिवशी विविध धातूंची, सोन्याची (Gold) खरेदी करणं शुभ मानलं जातं. सोनं खरेदी करणं हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं. त्यामुळे तुम्हाला देखील यंदाच्या दिवाळीला सोनं खरेदी करायचं असेल तर सोनं खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. या सदंर्भातच काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात.
धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याच्या टिप्स
सोन्याची शुद्धता तपासा (Purity) :
सोनं खरेदी करताना सर्वात महत्त्वाची सोन्याची शुद्धता सर्वात आधी तपासणं गरजेचं आहे. सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजली जाते. 24 कॅरेट सोनं शुद्ध असतं, पण ते टिकाऊ बनवण्यासाठी इतर धातूंमध्ये मिसळले जाते. बहुतेक दागिने 22 कॅरेटचे असतात. सोनं खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला 24 कॅरेट सोनं घ्यायचं आहे की दागिने घ्यायचे आहेत ते आधी ठरवा. तुम्ही खरेदी करत असलेल्या सोन्याच्या शुद्धतेची खात्री करा. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स BIS हॉलमार्क हे शुद्धतेचे विश्वसनीय सूचक आहे.
योग्या किंमत तपासा
जसंजसे सणासुदीचे दिवस जवळ येत चालले आहेत तसतसे बाजारात सोन्याचे दरही कमी-जास्त होतात. अशा वेळी सोनं खरेदी करण्यापूर्वी त्याचा दर तपासणं गरजेचं आहे. यामुळे तुमचे अतिरिक्त पैसे वाचतील.
खरेदीचं योग्य स्वरूप निवडा
खरंदतर सोनं दागिने, नाणी, बिस्कीट्स, धातू अशा विविध स्वरूपात बाजारात उपलब्ध असतात. अशा वेळी तुम्हाला सोनं कोणत्या फॉर्ममध्ये खरेदी करायचं आहे हे ठरवा. कारण, सोन्याच्या प्रत्येक धातूची, स्वरूपाची किंमत वेगवेगळी असते आणि ती सतत बदलत असते.
खरेदीनंतर बिल नक्की करा
सोने खरेदी करण्यासाठी नेहमी योग्य बिल किंवा पावती घेण्याचा आग्रह धरा. हा पुरावा हमी, विमा आणि पुनर्विक्रीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. बिलामध्ये वजन, शुद्धता आणि मेकिंग चार्जेस यांसारख्या गोष्टींचा समावेश करावा. तुमच्या गुंतवणुकीचे संरक्षण करण्यासाठी सोन्याचा विमा घेण्याचा विचार करा. अनेक विमा कंपन्या विशेषतः दागिने आणि मौल्यवान धातूंसाठी डिझाईन केलेल्या पॉलिसी ऑफर करतात.
रिटर्न पॉलिसी समजून घ्या
सोनं खरेदी करण्यापूर्वी, गोल्ड रिटर्न पॉलिसीची चौकशी करा. तुमचे सोने त्यांना परत विकण्याच्या अटी आणि शर्ती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. याच्या मदतीने तुम्ही खरेदी केलेलं सोनं गरज वाटल्यास पुन्हा विकू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :