Dev Diwali 2023 : देव दिवाळी कधी आहे? भगवान विष्णू, देवी लक्ष्मीला करा प्रसन्न! धन वृद्धीसाठी 'हे' विशेष काम करा, शुभ मुहूर्त पाहा
Dev Diwali 2023 : देव दिवाळीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा विधीपूर्वक केली जाते. या दिवशी काही विशेष उपाय केल्यास आर्थिक लाभ होतो.
Dev Diwali 2023 : कार्तिक पौर्णिमा (Kartik Pournima) हा कार्तिक महिन्याचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी देव दिवाळीही साजरी केली जाते. विशेषतः वाराणसीमध्ये देव दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. या दिवशी काशीचे 84 घाट दिव्यांनी सजवले जातात. यावेळी 26 नोव्हेंबरला देव दिवाळी साजरी होणार आहे.
देव दिवाळी साजरी करण्याचा शुभ मुहूर्त
यावेळी 26 नोव्हेंबरला देव दिवाळी साजरी होणार आहे. देव दिवाळी साजरी करण्याचा शुभ मुहूर्त रविवार, 26 नोव्हेंबर 2023 च्या संध्याकाळी 5:08 मिनिटांपासून 7:47 मिनिटांपर्यंत, म्हणजेच प्रदोष काळात आहे.
पौराणिक कथा काय?
पौराणिक कथेनुसार, या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुर राक्षसाचा वध करून देवांना स्वर्ग मिळवून दिला. या आनंदात देवतांनी या दिवशी दिवाळी साजरी केली. दुसऱ्या मान्यतेनुसार भगवान विष्णूने या दिवशी मत्स्य अवतार घेतला होता. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. या दिवशी काही विशेष उपाय केल्याने आर्थिक लाभ होतो.
देव दिवाळीला हे उपाय अवश्य करावे
देव दिवाळीच्या दिवशी घरात तुळशीचे रोप लावावे.
या दिवशी भगवान विष्णूच्या फोटोवर किंवा मूर्तीवर 11 तुळशीची पाने अर्पण करावी.
असे मानले जाते की, या उपायाचा अवलंब केल्याने घरात कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही, धनाची वृद्धी होते
देव दिवाळीच्या दिवशी 11 तुळशीची पाने पिठाच्या डब्ब्यात ठेवून बाजूला ठेवावीत. असे केल्याने घरात शुभ बदल दिसून येतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते.
देव दिवाळी, एकादशी, अनंत चतुर्दशी, देवशयनी, देव उठनी, दिवाळी, खरमास, पुरुषोत्तम महिना, तीर्थक्षेत्र, सण इत्यादी विशेष प्रसंगी विष्णु सहस्रनामाचे पठण केल्याने सर्व बाधा नष्ट होतात.
देव दिवाळीच्या दिवशी तुळशीला पिवळ्या रंगाचे कापड बांधतात. मान्यतेनुसार या दिवशी हा उपाय केल्याने व्यवसायात प्रगती होते आणि नोकरीत बढतीही होते.
देव दिवाळीच्या दिवशी घरोघरी भगवान सत्यनारायणाची कथा सांगावी. या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा ऐकल्याने सर्व संकटांचा नाश होतो आणि जीवनात आनंद येतो.
देव दिवाळीच्या दिवशी गंगा स्नान करून दिवे दान करावेत. या दिवशी दिवा दान केल्याने दहा यज्ञांच्या बरोबरीचे फळ मिळते असे मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :