Relationship Tips : 'सर्वांनांच तुम्ही आनंदी नाही ठेवू शकत.. समजून घ्या..!' 'ही' सवय मानसिक आरोग्यासाठी घातक?
Relationship Tips : तुम्हाला माहित आहे का की इतरांना आनंदी ठेवण्याची सवय तुम्हाला मानसिक समस्यांनाही बळी पडू शकते. यातून बाहेर पडण्याचे मार्ग जाणून घ्या..
Relationship Tips : काही लोक असे असतात, ज्यांचा संपूर्ण दिवस इतरांना खूश ठेवण्यात जातो. दुसऱ्यांना काय हवंय, नकोय हे पाहण्यातच त्यांचा दिवस जातो. दुसऱ्यांची गरज भागवता भागवता नेमकी ही लोक स्वत:कडे लक्ष द्यायलाच विसरतात. त्यांना हे कळतच नाही की, शारीरिक आरोग्याकडे लक्ष देण्याइतकेच मानसिक आरोग्याकडे लक्ष देणंही तितकच महत्त्वाचं आहे. त्याकडे दुर्लक्ष करून निरोगी राहणे शक्य नाही. राग आणि तणाव हे मानसिक आरोग्याचे शत्रू आहेत, परंतु तुम्हाला माहित आहे का की इतरांना आनंदी ठेवण्याची सवयीमुळे तुम्ही मानसिक समस्यांनाही बळी पडू शकता. आज आपण याविषयी तसेच यातून बाहेर पडण्याचे मार्ग जाणून घेणार आहोत.
इतरांना आनंदी ठेवण्याची सवय तुम्हाला मानसिक समस्यांनाही बळी पडू शकते.
इतरांना आनंदी करण्यात गुंतलेली माणसं सामान्यपणे तुम्हाला घर, शेजारी आणि ऑफिस सगळीकडे सापडतील. लोकांना खूश करण्याचा उद्देश इतरांना दुखवण्याचा नसला तरी काही बाबतीत स्वतःचा स्वार्थही त्यामागे दडलेला असतो.
लहानपणीची एखादी घटना, भावनिक दुखापत, कामं लवकर पूर्ण करण्याचा हट्ट अशा अनेक गोष्टी यासाठी जबाबदार धरल्या जाऊ शकतात. बरं, कारण काहीही असू दे, या सवयीने तुम्ही इतरांना आनंदी करता, पण स्वतःला खूप त्रास करू घेता. यामुळे येणारा ताण आणि राग तुम्हाला मानसिक आजारी बनवू शकतो, ही एक मोठी समस्या आहे. जर तुम्हाला तुमच्या या सवयीमुळे त्रास होत असेल आणि त्यातून बाहेर पडायचे असेल तर येथे दिलेले उपाय तुम्हाला मदत करू शकतात.
नाही म्हणायला शिका
लोकांना आनंद देणारे लोक इतरांना वाईट वाटू नये, म्हणून नाही म्हणायला खूप संकोच करतात, परंतु तुम्हाला नाही म्हणायला शिकावे लागेल, तरच तुम्ही या सवयीतून बाहेर पडू शकाल. यात काही शंका नाही की हे अवघड असेल पण तुम्हाला तुमच्या मानसिक आरोग्याचा विचार करावा लागेल. ज्याची सुरुवात या गोष्टीपासून करावी लागेल.
आधी स्वतःचा विचार करा
इतरांच्या आधी स्वतःचा विचार करा. या अज्ञानापोटी तुम्ही लोकांचे सुखी केव्हा होतात ते कळतही नाही. तुमच्या गरजा, उद्दिष्टे आणि कल्याण यांना प्राधान्य द्या. याचा अर्थ तुम्ही स्वार्थी आहात असा अजिबात होत नाही, पण स्वत:ला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत ठेवून तुम्ही इतरांना चांगल्या प्रकारे मदत करू शकता.
तुमची मर्यादा ठरवा
इतरांना खूश करण्यासाठी जर तुम्हाला आतून राग येत असेल आणि ते काम इच्छा नसतानाही करत असाल, तर तुमचंच नुकसान होत असेल, तर त्यावर उपाय म्हणजे तुमची मर्यादा ठरवणं. तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त असे काहीही करू नका, ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल.
सर्वांना आनंदी ठेवणे शक्य नाही
हे समजून घ्या. तुमच्या आणि समोरच्या व्यक्तीच्या गरजा वेगळ्या असू शकतात, जर तुम्ही तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष करून समोरच्या व्यक्तीला प्राधान्य दिले तर कदाचित त्याला आनंद होईल, पण तुम्ही दुःखी असाल तर त्याला काही अर्थ नाही. शेवटी तुम्ही तुमच्या आनंदाशी तडजोड करत आहात. स्वतःची काळजी घेणे सर्वात महत्वाचे आहे.
हेही वाचा>>>
Health : मंडळींनो.. सतत हॉटेलचं खाणं चांगलच पडेल महागात! आतड्यांवरील परिणाम जाणून घ्याल, तर आताच सोडाल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )