(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Relationship Tips : सोशल मीडियामुळे तुमचं नातं कमकुवत होतंय? 'या' चुका लगेचच दुरुस्त करा, अन्यथा नातं टिकवणं कठीण होईल
Relationship Tips : सोशल मीडियाच्या या जगात एक निरोगी नाते टिकवणे खूप अवघड आहे. आज आम्ही तुम्हाला सोशल मीडियाशी संबंधित अशा काही चुकांबद्दल सांगणार आहोत
Relationship Tips : प्रेमाचं (Love) नातं हे केवळ विश्वासाच्या आधारे उभं असतं, त्यात पण जोडीदाराच्या (Relationship) काही चुकांमुळे तसेच गैरसमजुतीमुळे नात्यावर नकारात्मक परिणाम होतो, आणि ते हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर येतं. याचं एक कारण म्हणजे सोशल मीडियावर (Social Media) जोडीदाराकडून झालेल्या चुका देखील मानलं जातंय. सोशल मीडियाच्या जगात एक निरोगी नाते टिकवणे खूप अवघड आहे. आज आम्ही तुम्हाला सोशल मीडियाशी संबंधित अशा काही चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या नात्यात काही ना काही अडचणी निर्माण होत आहे. या चुकांकडे लक्ष देऊन तुम्ही त्या दुरुस्त करू शकता.
नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम
सोशल मीडियावर आपण जे काही पोस्ट करतो. ते क्षणात अवघ्या जगाला समजतं, तसेच जर ती पोस्ट कुणाला आवडली तर व्हायरल देखील होते, यामध्ये प्रायव्हसी नावाची गोष्ट नसते. मात्र तुम्हाला माहित आहे का? सोशल मीडियावरील वाढत्या रुचीमुळे लोकांच्या नातेसंबंधांवरही त्याचा नकारात्मक परिणाम होत आहे. यामुळेच आज आम्ही तुम्हाला सोशल मीडियावर केलेल्या अशा काही चुकांबद्दल सांगणार आहोत. जोडीदाराच्या काही चुकांमुळे तुमचे चांगले नाते बिघडू शकते. त्याचा तुमच्या नातेसंबंधांवर विशेषतः लग्नासारख्या नाजूक नात्यावरही नकारात्मक परिणाम होतो. या चुकांबद्दल जाणून घेऊया
शेअरिंग
तुमच्या जोडीदाराच्या परवानगीशिवाय तुमच्या नातेसंबंध आणि वैयक्तिक आयुष्याविषयीच्या गोष्टी सोशल मीडियावर सतत शेअर केल्याने तुमच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मान्य आहे की, तुम्हाला हे सर्व सोशल मीडियावर शेअर करायला आवडेल, पण समोरच्या व्यक्तीच्या आवडीनिवडीही महत्त्वाच्या असतात. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या गोपनीयतेचा आदर करणे महत्त्वाचे आहे. तसेच, मर्यादेत राहून सोशल मीडियावर काहीही शेअर करा.
वाद सार्वजनिक करणे
सोशल मीडियावर तुमचे परस्पर वाद सर्वांसमोर आणणे, तुमच्या नात्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. यातूनच तुमच्या नात्याचे कटू सत्य समाजासमोर येईल. तसेच, सोशल मीडियावर परस्पर विवाद शेअर करून लोक तुमचा न्याय करतात. अशा परिस्थितीत परस्पर वाद खाजगीत सोडवणे गरजेचे आहे.
तुलना करणे
सोशल मीडियावर इतर जोडप्यांना पाहणे आणि त्यांच्याशी तुमच्या नात्याची तुलना करणे हे तुमच्या नात्यासाठी अजिबात चांगले नाही. अनेक वेळा सोशल मीडियावर आपण जे काही पाहतो त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नसतो. तुम्हाला त्या फोटोचा किंवा पोस्टचा एकच पैलू दिसतो पण दुसऱ्या पैलूबद्दल सर्वांनाच माहिती नसते.
ऑफलाइन संभाषणांकडे दुर्लक्ष करणे
अनेक लोक आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवण्यापेक्षा सोशल मीडियावर किंवा फोनवर जास्त वेळ घालवतात. यामुळे तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये हळूहळू अंतर येऊ लागते. सोशल मीडियावर वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत जास्त वेळ घालवणे महत्त्वाचे आहे.
फ्लर्ट करणे
सोशल मीडियावर इतरांसोबत फ्लर्ट करणे आणि एखाद्याच्या पोस्टमध्ये रोमँटिक स्वारस्य दाखवणे याचा तुमच्या नातेसंबंधावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे तुमच्या जोडीदाराचा तुमच्यावरील विश्वास उडू शकतो. अशा स्थितीत तुमचं नातं वाचवण्यासाठी तुमचं नातं बिघडू शकतं असं काही करू नका.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या इतर बातम्या :