एक्स्प्लोर

Relationship Tips : काय सांगता! नात्यात प्रेम वाढवण्यासाठी जोडीदाराशी 'हे' खोटं बिनधास्त बोला? नातं आणखी घट्ट होईल

Relationship Tips : काही असत्य गोष्टी अशा असतात, ज्या सत्यापेक्षा जास्त प्रभावी असतात. हे तुमच्या नात्यात गोडवा आणण्याचे आणि प्रेम वाढवण्याचे काम करतात. 

Relationship Tips : खोटं बोलणं हे वाईट आहे, असं आपण नेहमी ऐकत आलो. पण जिथे कोणाचं भलं होत असेल तिथे खोटं बोलंल तर ते वाईट ठरत नाही, तसं पाहायला गेलं तर, कोणत्याही नात्याचा पाया हा सत्यावर आधारित असतो, पण काही असत्य गोष्टी अशा असतात, ज्या सत्यापेक्षा जास्त प्रभावी असतात. हे तुमच्या नात्यात गोडवा आणण्याचे आणि प्रेम वाढवण्याचे काम करतात. त्यासाठीच नात्यात खोटे बोलणे केव्हा योग्य आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे, आज आपण अशाच खोट्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल.

'हे' खोटे तुमचे नाते खराब करणार नाहीत

खोटे बोलल्याने कोणतेही नाते पत्त्याच्या घरासारखे कोसळते. ही तुमच्या जोडीदाराची फसवणूक मानली जाते. यामुळे तुमचे नातं कायमचं संपुष्टात येऊ शकतं, परंतु जर आम्ही तुम्हाला सांगितले की, अशा काही खोट्या गोष्टी आहेत, ज्या तुमच्या पार्टनरला न डगमगता सांगू शकता. आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की, हे खोटे तुमचे नाते खराब करणार नाहीत, तर ते अधिक मजबूत करतील. पण अट अशी आहे की, नात्यात खोटं कधी बोलायचे हे तुम्हाला कळले पाहिजे. तुमच्या जोडीदाराशा प्रकारचे खोटे बोलण्याने तुमच्या नात्याचे नुकसान होणार नाही आणि तुमचे नाते अधिक घट्ट होण्यास मदत होऊ शकते. जाणून घ्या...

'कामात असतानाही तुझी आठवण येते'

कामाच्या तणावात एखाद्याची सतत आठवण ठेवणे शक्य नसते. हे साहजिक असते की, तुम्ही कामात किंवा मित्रांमध्ये व्यस्त असाल, पण तुम्हाला तुमच्या जोडीदाराची आठवण येते, असे सांगितल्याने तुमच्या जोडीदाराच्या चेहऱ्यावर हसू येऊ शकते. असे केल्याने तुमच्या जोडीदाराचे तुमच्यावरचे प्रेम आणखी वाढेल आणि त्यांना चांगले वाटेल.

'तुझे मित्र खूप चांगले आहेत'

तुमच्या जोडीदाराचे सगळे मित्र तुम्हाला आवडतीलच असे नाही. असे काही लोक असू शकतात ज्यांच्यासोबत तुम्हाला आवडत नसावं किंवा जे तुम्हाला काहीसे खोटे वाटू शकतात, परंतु हे तुमच्या पार्टनरला सांगण्याची गरज नाही. तुम्ही त्यांना सांगू शकता की 'तुझे मित्र खूप चांगले आहेत' त्याचप्रमाणे, आपल्या जोडीदाराच्या नातेवाईकांबद्दल सर्व काही सांगण्याची आवश्यकता नाही.

'Wow..मला हे गिफ्ट खूप आवडले'

जर तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी भेटवस्तू आणली असेल आणि तुम्हाला ती भेट आवडली नसेल, तरीही तुम्ही त्याची प्रशंसा करू शकता किंवा तुम्हाला ती भेट खूप आवडली, असे म्हणू शकता. यामुळे तुमच्या पार्टनरला वाईट वाटणार नाही आणि तो आनंदी राहील.

'तुझ्या हाताला किती चव आहे'

जर तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी काही खास चव नसलेले अन्न शिजवले असेल, तर त्यांना सत्य सांगण्याऐवजी त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करा. यामुळे त्यांना आनंद होईल आणि तुम्ही त्यांचे कौतुक कराल असे त्यांना वाटेल.

'किती विनोदी आहेस तू'

तुमच्या जोडीदाराने एखादा विनोद सांगितला आहे किंवा तुम्हाला हसवण्यासाठी किंवा तुमचा मूड सुधारण्यासाठी एखादा प्लॅन बनवला असेल, जरी तुम्हाला खूप आनंद होत नसला किंवा हसता येत नाही. पण तुमच्या जोडीदाराचे मन ठेवण्यासाठी तुम्ही थोडा वेळ हसू  शकता. हे खोटे बोलण्यात काही नुकसान नाही.

पूर्वीच्या प्रेमप्रकरणांबद्दल चुकूनही सांगू नका

तुम्ही तुमच्या जोडीदारापासून काहीही लपवू नये, पण तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या नातेसंबंधांबद्दल सांगण्याची गरज नाही. यामुळे भविष्यात तुमच्यात भांडणे होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या जोडीदाराला तुमच्या पूर्वीच्या प्रेमप्रकरणांबद्दल सांगू नका.

हेही वाचा>>>

Relationship Tips : तुमच्या आधीच्या रिलेशनमध्ये झालेल्या 'या' चुका पुन्हा करू नका, अन्यथा पुन्हा नात्यात येईल कटुता

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget