Relationship Tips : डेटिंगच्या सुरुवातीलाच लोक 'या' चुका करतात, परिणामी 'ते' सिंगल राहतात, नातं पुढे न्यायचंय तर 'या' टिप्स फॉलो करा
Relationship Tips : काही लोक डेटिंगच्या सुरुवातीलाच 'अशा' काही चुका करतात. ज्यामुळे त्यांचे नाते सुरू होण्यापूर्वीच संपुष्टात येते. जाणून घ्या..
Relationship Tips : अनेकदा प्रेमाच्या नात्याची सुरूवात ही डेटिंग (Dating) पासून सुरू होत असल्याचं आपण पाहतो. पण डेटिंग ही एक अशा प्रक्रिया आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या समोरच्या व्यक्तीला समजून घेता आणि त्यांच्या सवयी जाणून घेऊन तुमचे नाते पुढे नेता. पण काही लोक उत्साहाच्या भरात किंवा इतर कारणांमुळे डेटिंगच्या सुरुवातीलाच काही चुका करतात. ज्यामुळे त्यांचे नाते सुरू होण्यापूर्वीच संपुष्टात येते.
प्रेमळ जोडीदारच नाही, तर आदर्श जोडीदारही हवाय
आताच्या फास्ट जीवनशैलीचा परिणाम तसा लोकांच्या नात्यावरही दिसून येतोय. या धावपळीच्या जीवनात, जोडप्यांमधील प्रणय देखील बराच कमी झाला आहे, किंवा रोमान्सची कल्पना पूर्णपणे बदलली आहे. आता लोकांना फक्त प्रेमळ जोडीदाराचीच गरज नाही तर प्रत्येक बाबतीत परिपूर्ण असा आदर्श जोडीदारही हवा आहे. जेव्हा एखादं नवीन नवीन नातं सुरू होतं तेव्हा लोक खूप उत्सुक आणि चिंताग्रस्त असतात. ही अशी वेळ असते जेव्हा तुम्ही तुमच्या समोरच्या व्यक्तीला आणि त्याच्या सवयी समजून घेण्याचा प्रयत्न करत असता. किंबहुना ही अशी वेळ आहे, जेव्हा तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये एक मजबूत नातं तयार होत असतं. पण या सुरुवातीच्या काळात लोक काही चुका करतात, ज्यामुळे नात्यातली ओढ संपते. त्यामुळे तुम्हालाही डेटिंगचा आनंद घ्यायचा असेल आणि रोमान्स वाढवायचा असेल तर काही चुका करणे टाळा. जाणून घ्या कोणत्या चुका आहेत त्या...
अधिक विचार
डेटिंगच्या सुरुवातीच्या काळात, लोक त्यांच्या मनात अनेक गोष्टींचा विचार करू लागतात, यामुळे तुम्ही कुठेतरी चिंतेचे शिकार बनू लागता. अनेक वेळा लोक एकमेकांना नकळत भविष्याची योजना आखू लागतात. त्यामुळे सुरुवातीलाच अशी चूक करू नका.
शारीरिक संबंध
डेटिंगच्या अगदी सुरुवातीच्या काळात शारीरिक संबंध ठेवणे हे तुमच्या नात्यासाठी चांगले मानले जात नाही. यामुळे तुम्ही शारीरिकदृष्ट्या पुढे जाता, पण तुमच्या दोघांमधील भावनिक संबंध तुटतो. अनेक वेळा या कारणामुळे काही दिवसातच लोकांचे नाते तुटते.
जोडीदाराची सतत चौकशी
रिलेशनमध्ये असताना आपल्या जोडीदाराची चौकशी करणे अगदी सामान्य आहे, परंतु अनेकदा लोक डेटिंगच्या अगदी सुरुवातीस असे वागणे सुरू करतात. यामुळे समोरच्याला असे वाटते की तुमचा त्यांच्यावर विश्वास नाही. असे केल्याने तुमचे नाते सुरुवातीलाच तुटू शकते.
अपेक्षांचं ओझं
डेटिंगच्या अगदी सुरुवातीला कोणीही तुमचा पार्टनर बनत नाही. डेटिंग ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे तुम्ही एखाद्या व्यक्तीला समजून घेता आणि नंतर तुम्ही भागीदार बनता. अशा परिस्थितीत, सुरुवातीच्या टप्प्यातच व्यक्तीकडून खूप अपेक्षा ठेवणे आणि त्या पूर्ण करण्यासाठी तिच्यावर दबाव आणणे हे तुमच्या डेटिंगसाठी धोकादायक ठरू शकते.
मेसेजचा भडिमार
डेटिंग करताना एकमेकांशी रोज बोलणं खूप गरजेचं आहे, पण गरजेपेक्षा जास्त मेसेज किंवा फोन केल्याने समोरची व्यक्तीही तुमच्यावर नाराज होऊ शकते. बऱ्याच वेळा, जास्त मेसेजिंगमुळे तुमचे खरे कनेक्शन कमकुवत होऊ लागते. अशा परिस्थितीत खूप मेसेज पाठवण्यापेक्षा समोरासमोर बसून बोलणे गरजेचे आहे.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>