एक्स्प्लोर

Relationship Tips : 'जा बाई सासुरा..ओलांडून उंबरा..!' नव्या नवरीसाठी 4 लाखमोलाच्या टिप्स, वैवाहिक आयुष्य होईल सुखी!

Relationship Tips : जर तुमचंही नवं लग्न झालं असेल तर या 4 टिप्स नक्की फॉलो करा, वैवाहिक आयुष्य छान होईल.

Relationship Tips : रोज रोज कसरत तारेवरची..होणार सून मी त्या घरची... हे प्रसिद्ध मालिकेचे शीर्षक गीत आपल्या सर्वांनाच माहित आहे. याच प्रमाणे लग्नाआधी प्रत्येक मुलीच्या मनात हाच प्रश्न असतो की, सासरी कसं होणार? ती तिच्या भावी पतीसोबत आनंदी जीवन जगू शकेल का? घरातील लोक त्याला समजून घेतील की नाही? फक्त मुलीच नाही.. पण असे प्रश्न मुलांनाही सतावतात, बरं का.. साधारणपणे आपलं लग्न जुळलं आहे, या भावनेने एकीकडे आनंद तर असतो, पण दुसरीकडे मनात प्रश्नांचे काहूर माजलेले असते. विविध प्रश्न मनाला आणखी अस्वस्थ करतात. त्यामुळे लग्नाआधी काही गोष्टींची अंमलबजावणी करणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात तुम्हाला सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घेता येईल. प्रश्न असा आहे की यावर मात कशी करता येईल? या संदर्भात काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. त्या फॉलो केल्यास वैवाहिक आयुष्य चांगले जाण्यास मदत होईल

जास्त अपेक्षा ठेवू नका

जर तुमचं नुकतच नवीन लग्न झालंय तर जाणून घ्या.. येथे नातेसंबंधात एकमेकांकडून मोठ्या अपेक्षा असतात. तज्ज्ञांच्या मते, अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही. परंतु, जास्त अपेक्षा ठेवणे दोन्ही जोडीदारांसाठी चुकीचे असू शकते. तुम्हाला हे समजून घ्यायचे आहे की, नवीन लग्नात दुसऱ्या जोडीदारावर जास्त अपेक्षांचे ओझे असू नये. अपेक्षा जास्त ठेवल्याने सहसा जोडीदारांमध्ये मतभेद होतात, जे सुरुवातीच्या दिवसात कमी दिसून येतात, परंतु जसजसा वेळ जातो तसतसे मतभेद तणावात बदलतात.

संभाषणात स्पष्ट व्हा

महिलांची एक मोठी समस्या ही आहे की, त्या त्यांचे विचार त्यांच्या पार्टनरसोबत शेअर करत नाहीत. काही न बोलता त्यांच्या जोडीदाराने समजून घ्यावे अशी त्यांची अपेक्षा असते. पण, आपण हे समजून घेतले पाहिजे की कोणाचेही शब्द काहीही न बोलता समजून घेणे सोपे नाही. त्यामुळे अशा अपेक्षा ठेवणे म्हणजे वैवाहिक जीवन बिघडवण्यासारखे आहे. जर तुम्ही नवीन विवाहित असाल तर सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुमच्या जोडीदाराशी संवाद साधताना स्पष्ट राहा. तुमच्या मनात जे आहे ते उघडपणे व्यक्त करा. त्यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी आपोआप कमी होतील.

समोरच्या व्यक्तीचे ऐका

अनेक वेळा असे घडते की, एक जोडीदार दुसऱ्या जोडीदारावर खूप वरचढ ठरतो. एक जोडीदार त्याच्या मनात जे काही आहे ते दुसऱ्या जोडीदारासोबत शेअर करत असतो. पण, दुसरा जोडीदार काही बोलतच नाही. असे असणे आवश्यक नाही. आपले मन व्यक्त करत असताना समोरच्याचे ऐकणे आवश्यक आहे. तो काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे ते समजून घ्या. गोष्टी दुतर्फा असल्यास, अनेक संभाव्य समस्या टाळल्या जातात.

एकत्र समस्या सोडवा

तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तुम्ही दिवसाचे 24 तास एखाद्यासोबत राहता तेव्हा कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर मतभेद होतातच. कधी कधी मतभेद हे परस्पर कलहाचे कारण बनतात. कधी कधी एखादी छोटी गोष्टही मोठ्या समस्येत बदलतात. तुमचे लग्न नवीन असो वा जुने... दोन्ही परिस्थितींमध्ये, हे महत्वाचे आहे की तुम्ही तुमची समस्या सोडवल्याशिवाय सोडू नका. प्रश्न कोणताही असो, त्यावर चर्चा करून समस्येवर तोडगा काढा. अशा प्रकारे टिप्स फॉलो केल्यास, नात्यात काहीही चुकीचे होणार नाही आणि नवीन विवाहित जीवन सुंदर होईल.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Relationship Tips : तुम्हालाही सतत जोडीदार गमावण्याची भीती वाटते? रिलेशनशिपमध्ये असुरक्षित वाटते? तज्ज्ञांकडून कारणे जाणून घ्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासRaj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget