Relationship Tips : सासू-सूनेतील संघर्ष चांगल्या कुटुंबात फूट पाडू शकतो, घरात शांतता, आनंद हवाय? या 5 टिप्सच्या मदतीने नातं जपा
Relationship Tips : सासू-सुनांनी एकमेकांमध्ये दोष न शोधता, काही टिप्स फॉलो करून निर्जीव नात्यातही प्रेमाचे रंग भरू शकता. जाणून घ्या..
Relationship Tips : एकत्र कुटुंबाची व्याख्या वेगळीच असते, एकमेकांचे मतभेद, एकमेकांची मर्जी, सर्वांचे म्हणणे गृहित धरणे या सर्व गोष्टी ज्याने सांभाळल्या, तोच खरा सुखी व्यक्ती. असं म्हणतात ना, घरातली स्त्री या कुटुंबाचा प्रमुख पाया असते. कारण तिने या गोष्टी सांभाळून घेतल्या, तर एकत्र कुटुंब विभक्त होण्यापासून वाचवू शकते. सुखी आणि दीर्घ वैवाहिक जीवनासाठी केवळ पती-पत्नीच नाही तर सासू-सासरे आणि सून यांच्यातील समन्वय खूप महत्त्वाचा आहे. सासू-सुनेच्या नात्यात संघर्ष येताच घराची ताटातूट सुरू होते. जर तुम्हालाही या नात्यात प्रेमाचे रंग जोडायचे असतील तर तुम्ही येथे नमूद केलेल्या या गोष्टींची काळजी घेऊ शकता.
सासू-सूनेचे नाते जितके गोड, तितके वैवाहिक जीवन चांगले!
सासू-सून यांच्यातील वाद चांगल्या घराचा पायाच हादरवून टाकतात. नाते जितके गोड असेल तितके वैवाहिक जीवन चांगले जाते. अशात, एकमेकांमध्ये दोष न शोधता, सासू-सुना काही टिप्स फॉलो करून निर्जीव नात्यातही प्रेमाचे रंग भरू शकता. एकत्र कुटुंब असेल, तर सून पतीपेक्षा जास्त वेळ सासूसोबत घालवते असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. अशा स्थितीत सासू-सुनेचे नाते सुधारले तर नवरा तणावमुक्त राहतोच, शिवाय दोघेही एकमेकांसोबत सुख-दु:ख वाटून आनंदी जीवन जगू शकतात. हा लेख सासू आणि सून या दोघांसाठी खूप खास असणार आहे, कारण आम्ही तुमच्या दोघांसाठी अशाच काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण निर्माण करू शकता.
तुलना टाळा
सासू आणि सुनेला एकमेकांची तुलना करण्याची सवय असते. यामुळे चांगले नाते बिघडू शकते. सासूने स्वतःच्या सुनेची शेजारच्या सुनेशी तुलना केली किंवा सून स्वत:ची तुलना दुसऱ्याच्या सुनेशी करून तिला टोमणे मारते, तर ते समोरच्याला त्रासदायक ठरते. त्यांना तुमच्या मनात महत्त्व नाही असे वाटते. त्यामुळे तुलना करणे सोडा.
एकमेकांचा आदर करा
एकमेकांच्या आदराची काळजी घ्या. प्रयत्न करा की तुमची बोलण्याची पद्धत अशी असावी की त्यामुळे समोरच्याचे मन दुखावले जाणार नाही. प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवर एकमेकांना टोमणे मारल्याने संपूर्ण घरातील वातावरण बिघडते आणि या गोष्टींचा मुलांवरही वाईट परिणाम होतो.
गैरसमज नकोत
नात्यात निर्माण होणाऱ्या गैरसमजांकडे दुर्लक्ष करणं किंवा त्याबद्दल मतं तयार करणं अजिबात योग्य नाही. अशा परिस्थितीत दोघांनीही मन दुखावणाऱ्या मुद्द्यांवर मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे. बोलण्याची पद्धतही चांगली आणि प्रेमळ असावी, त्यामुळे तुम्हाला जे हवे आहे ते बोलण्याऐवजी समोरच्याचे ऐकण्याचीही सवय लावा.
एकमेकांचे कौतुक करा
बाहेरच्या व्यक्तीसमोर एकमेकांचे कौतुक करण्याचा प्रयत्न करा. होय, यामुळे नात्यातील प्रेम आणि विश्वास वाढतो. जसे की, माझ्या सासूशिवाय मला घरी राहावेसे वाटत नाही, आई असते तेव्हा प्रत्येक काम पटकन होते, माझ्या सासूबाई मला माझे माहेर आठवू देत नाहीत, इत्यादी. . तसंच सासू म्हणू शकते की, सून मला क्षणभरही एकटी सोडत नाही, सून नसेल तर सगळं घर पडून जाईल.
एकत्र वेळ घालवा
एकमेकांसोबत खरेदीला जा, प्रवास करा आणि मजा करा. यामुळे तुमच्या नात्यात प्रेम आणि आपुलकी तर वाढेलच पण गैरसमजांनाही जागा राहणार नाही. अशाप्रकारे, तुम्ही या नात्याचे रुपांतर आई-मुलीच्या किंवा मैत्रिणीच्या नात्यात करू शकता.
हेही वाचा>>>
Relationship Tips : जोडीदाराला नेहमीच महागडं गिफ्ट, शॉपिंगची गरज नसते, एकदा 'या' गोष्टी सुद्धा करून पाहा, प्रेम आणखी वाढेल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )