एक्स्प्लोर

Relationship Tips: जोडीदारानं WhatsApp Chat लॉक करणं ब्रेकअपसाठी मोठं कारण? कपल्ससाठी धोक्याची घंटा! रिलेशनशिप तज्ज्ञ म्हणतात...

Relationship Tips: व्हॉट्सॲपवर चॅट लॉक करण्याचे हे फीचर सुरक्षिततेसाठी अत्यंत फायदेशीर आहे, मात्र त्याचा वैयक्तिक संबंधांवर काही परिणाम होईल का? 

Relationship Tips: आजच्या युगात WhatsApp Chat सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाते. याचे अनेक फायदेही, तितकेच तोटेही आहेत. आजकाल प्रत्येकाच्या फोनमध्ये व्हॉट्सॲप आहे. या ऑनलाइन चॅटिंग प्लॅटफॉर्मने जगाला तंत्रज्ञान आणि कनेक्टिव्हिटीमध्ये खूप मदत केली आहे. व्हॉट्सॲपवर चॅट लॉक करण्याचे जे फीचर आहे, ते सुरक्षिततेसाठी फायदेशीर आहे, पण त्याचा संबंधांवर काही परिणाम होईल का? जाणून घ्या

ऑनलाइन प्लॅटफॉर्ममुळे नात्यात तडा?

आधुनिक आणि तांत्रिक जगात, व्हॉट्सॲप हे एक सार्वजनिक व्यासपीठ आहे ज्याने लोकांना खूप मदत केली आहे. आजकाल प्रत्येकाच्या फोनमध्ये व्हॉट्सॲप आहे. कदाचित या ॲपशिवाय काम करणे कठीण आहे. व्हॉट्सॲपच्या मदतीने नातेही घट्ट झाले आहे, जर दोन पार्टनर कॉलवर एकमेकांशी बोलू शकत नसतील तर या चॅटिंग ॲपच्या मदतीने ते 24 तास एकमेकांशी कनेक्ट राहतात. परंतु काही प्रकरणांमध्ये, अशा ऑनलाइन प्लॅटफॉर्ममुळे नातेसंबंधांमध्ये तडा गेल्याच्या बातम्या आल्या आहेत. व्हॉट्सॲपवर एक नवीन सेफ्टी लॉक फीचर लॉन्च करण्यात आले आहे, या फीचरमुळे नातेही बिघडू शकते का? जाणून घ्या..

काय आहे व्हॉट्सॲप लॉक फीचर?

या नवीन फीचरच्या मदतीने लोक त्यांच्या खाजगी चॅट लॉक करतात. आम्हाला आमच्या कोणत्याही चॅट सुरक्षित करायच्या असतील किंवा वैयक्तिक चॅट कोणी उघडून पाहू नये असे वाटत असेल, तर लॉक फीचर तुम्हाला या सर्व प्रकारे मदत करते.

हे फीचर कपल्ससाठी डोकेदुखी?

टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, रिलेशनशिप काउंसलर रुची रूह म्हणतात की हे करणे प्रत्येक जोडीदाराची स्वतःची निवड असू शकते परंतु आवश्यक नाही की त्यामागील कथा खरी आणि चांगली असेल. ती म्हणते, जर दोन लोकांमधील नाते मजबूत आणि विश्वासार्ह असेल तर त्यांना घाबरू नये की त्यांचा पार्टनर त्यांच्यापासून काही लपवत आहे की नाही. यातील दुसरी बाजू अशी आहे की, जर विश्वास असेल तर तुम्ही लॉक केलेल्या चॅट देखील वाचू शकता किंवा तुमच्या पार्टनरला बिनदिक्कत विचारू शकता. मात्र, रिलेशनशिप एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की जर चॅट लॉक असेल तर हे देखील सूचित करते की तुमच्या पार्टनरने तुमच्यापासून काही लपवले आहे का?

आपल्या जोडीदाराशी याबद्दल कसे बोलावे?

  • हा एक संवेदनशील विषय आहे, त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी त्याबद्दल बोलताना आरोप करणारा टोन वापरणे टाळा.
  • जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत या विषयावर बोलाल तेव्हा अशी वेळ निवडा, जेव्हा तुम्ही दोघेही इतर कोणत्याही गोष्टीत व्यस्त नसाल आणि चांगला मूडमध्ये असाल.
  • संभाषण सुरू करण्यासाठी, तुम्ही थेट प्रश्न विचारू शकतास परंतु वेगळ्या स्वरात, जसे की – माझ्या लक्षात आले आहे की तुम्ही तुमचे काही
  • WhatsApp चॅट लॉक केले आहेत, त्यामुळे आपण यावर काही बोलले पाहिजे का? तुमच्या शब्दांनी हे दाखवले पाहिजे की तुम्हाला त्यांची आणि तुमच्या नात्याची काळजी आहे.
  • जर तुमचा जोडीदार याबद्दल बोलण्यास सहमत असेल तर तुम्हाला तुमची सर्व उत्तरे लवकरच मिळतील. 
  • त्यांनी तुमची विनंती नाकारली, तर तुम्ही यावर प्रतिक्रिया देण्यापासून परावृत्त केले पाहिजे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra NCP Candidate List Sharad Pawar Rashtrawadi Congress : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध महामुकाबला!
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध महामुकाबला!
बाप विरुद्ध लेक, काका V/s पुतण्या, शरद पवारांची 45 उमेदवारांची यादी; घड्याळाला तुतारीचं मोठं आव्हान
बाप विरुद्ध लेक, काका V/s पुतण्या, शरद पवारांची 45 उमेदवारांची यादी; घड्याळाला तुतारीचं मोठं आव्हान
Sudhir Salvi : 'मी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करणार', 'मातोश्री'च्या निर्णयानंतर सुधीर साळवींची एबीपी माझाला प्रतिक्रिया
'मी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करणार', 'मातोश्री'च्या निर्णयानंतर सुधीर साळवींची एबीपी माझाला प्रतिक्रिया
Zeeshan Siddique : 'बाबा मला रोज तुमची आठवण येते' म्हणत झिशान सिद्दीकींची बाबा सिद्दीकींसाठी भावूक पोस्ट, पाच वर्षांपूर्वीचा फोटो पोस्ट
वडिलांसोबतचा फोटो पोस्ट, झिशान सिद्दिकी म्हणाले, बाबा मला रोज तुमची आठवण येते...  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jayant Patil Declared NCP Candidate :बारामतीतून युगेंद्र पवारांना उमदेवारी,पहिल्या यादीत कुणाची नावं1 Min 1 Constituency | Vidhan Sabha | 1 मिनिट 1 मतदारसंघ | कोणाची बाजी? | 24 OCT 2024Jitendra Awhad vs Najib Mulla Special Report : Kalwa Mumbra मतदारसंघात NCP vs NCPAaditya Thackeray Worli : वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra NCP Candidate List Sharad Pawar Rashtrawadi Congress : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध महामुकाबला!
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध महामुकाबला!
बाप विरुद्ध लेक, काका V/s पुतण्या, शरद पवारांची 45 उमेदवारांची यादी; घड्याळाला तुतारीचं मोठं आव्हान
बाप विरुद्ध लेक, काका V/s पुतण्या, शरद पवारांची 45 उमेदवारांची यादी; घड्याळाला तुतारीचं मोठं आव्हान
Sudhir Salvi : 'मी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करणार', 'मातोश्री'च्या निर्णयानंतर सुधीर साळवींची एबीपी माझाला प्रतिक्रिया
'मी एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करणार', 'मातोश्री'च्या निर्णयानंतर सुधीर साळवींची एबीपी माझाला प्रतिक्रिया
Zeeshan Siddique : 'बाबा मला रोज तुमची आठवण येते' म्हणत झिशान सिद्दीकींची बाबा सिद्दीकींसाठी भावूक पोस्ट, पाच वर्षांपूर्वीचा फोटो पोस्ट
वडिलांसोबतचा फोटो पोस्ट, झिशान सिद्दिकी म्हणाले, बाबा मला रोज तुमची आठवण येते...  
श्रद्धा की निष्ठा... सुधीर साळवींना उमेदवारी नाकारली; लालबागच्या राजाचरणीची 'ती' चिठ्ठी पुन्हा चर्चेत
श्रद्धा की निष्ठा... सुधीर साळवींना उमेदवारी नाकारली; लालबागच्या राजाचरणीची 'ती' चिठ्ठी पुन्हा चर्चेत
मोठी बातमी! समीर भुजबळांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा, नांदगावमधून सुहास कांदेंच्या विरोधात निवडणूक लढवणार
मोठी बातमी! समीर भुजबळांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा, नांदगावमधून सुहास कांदेंच्या विरोधात निवडणूक लढवणार
Washington Sundar : टीम इंडिया संकटात असताना तीन वर्षांनी संघात परतला, पण थेट धमाकाच करून टाकला! तमिळ जाळ्यात न्यूझीलंडची 'धुळदाण'
वाॅशिंग्टन सुंदर : टीम इंडिया संकटात असताना तीन वर्षांनी संघात परतला, पण थेट धमाकाच करून टाकला! तमिळ जाळ्यात न्यूझीलंडची 'धुळदाण'
Mahayuti Seat Sharing : महायुतीत जागांची अदलाबदली होणार, अजित पवारांसाठी भाजप-सेना जागा सोडण्याची शक्यता, नवी दिल्लीत जागावाटपावर खलबतं
महायुतीच्या जागावाटपासाठी नवी दिल्लीत बैठकांचं सत्र, राष्ट्रवादीसाठी भाजप-सेना जागा सोडणार, सूत्रांची माहिती
Embed widget