एक्स्प्लोर

Relationship Tips : नात्यात Personal Space ला महत्त्व देणं महत्त्वाचं का आहे?  Me Time घेण्याचे फायदे जाणून घ्या 

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये एकमेकांच्या इच्छेची जास्त काळजी घेणं अधिक गरजेचं आहे. नात्यात त्याचे महत्त्व समजून घेणे खूप महत्वाचे आहे.

Relationship Tips : अनेकवेळा आपण कौटुंबिक जबाबदाऱ्या, कामाच्या व्यापात इतके गुंतले जातो की, स्वत:ला वेळ द्यायला विसरतो, अशात जर जोडीदाराने प्रेमाचे किंवा काळजीचे दोन शब्द जरी बोलले तरी बरं वाटतं, पण काही नात्यात अनेकवेळा एकमेकांच्या इच्छेची काळजी घेतली जात नाही, ज्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर होताना दिसतो. त्यामुळेच नात्यात Personal Space ला महत्त्व देणं महत्त्वाचं का आहे?  Me Time का घेतला पाहिजे? याचे महत्त्व समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. 

स्वत:ला वेळ द्या

कोणतेही नातं टिकवण्यासाठी प्रेम आणि काळजी घेणाऱ्या जोडीदाराची अत्यंत गरज असते, नात्यात जोडीदाराचा स्वभाव ही सर्वात महत्त्वाची गोष्ट मानली जाते, ज्यामुळे व्यक्ती दीर्घकाळ नात्यात आनंदी राहू शकते, पण एक महत्त्वाची गोष्ट ज्याबद्दल आपण बोलत नाही आणि तिला जास्त महत्त्वही देत ​​नाही. ती म्हणजे स्वत:ला वेळ देणे ही आहे. ज्याला आपण पर्सनल स्पेस म्हणतो. तुम्हाला माहित आहे की? याच्या अभावामुळे नातेसंबंधही तुटू शकतात.

पर्सनल स्पेसचे महत्त्व जाणून घ्या

पर्सनल स्पेस ही नात्यात इतकी महत्त्वाची गोष्ट आहे, ती जर नसेल तर नात्यात गुदमरल्यासारखी भावना निर्माण होते. जरी तुम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत असाल, एकमेकांच्या इच्छेची स्वतःपेक्षा जास्त काळजी घेतली पाहिजे, पण जर तुम्ही एकमेकांना वैयक्तिक जागा दिली नाही तर त्यामुळे नात्यात कटुता येऊ शकते आणि हेच वेगळे होण्याचे कारण असू शकते. बऱ्याच वेळा लोक पर्सनल स्पेसला एकाकीपणाशी आणि नातेसंबंधांमधील तणावाशी जोडू लागतात, परंतु असे अजिबात होत नाही. पर्सनल स्पेस, ज्याला मी टाईम देखील म्हणतात, हे एक अल्पकाळासाठी एक स्वातंत्र्य आहे, जे हृदय आणि मनाला चार्ज करते, तसेच आपण प्रत्येक गोष्टीत आपले सर्वोत्तम देण्यास सक्षम करते, म्हणून नातेसंबंधात त्याचे महत्त्व समजून घेणे खूप महत्वाचे आहे.

आत्मविश्वास वाढतो

अनेक वेळा जोडीदार जेव्हा पर्सनल स्पेसबद्दल बोलतात तेव्हा त्यांना राग येऊ लागतो. यामुळे दुसऱ्या जोडीदाराला संदेश जातो की, तुमचा त्याच्यावर विश्वास नाही आणि नातेसंबंध नीट चालवण्यासाठी विश्वास ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरला पर्सनल स्पेस देता, तेव्हा तुमचा त्याच्यावर विश्वास असल्याचा संदेशही त्यातून मिळतो, जो तुमच्या नात्यात इंधन म्हणून काम करतो.

नाते मजबूत होते

पर्सनल स्पेस दिल्याने परस्पर संबंध मजबूत होतात. पर्सनल स्पेस दरम्यान माणसाला अनेक गोष्टींचा विचार करायलाही वेळ मिळतो. ज्यात नात्यांचाही समावेश होतो. जोडीदाराला असे वाटते की आपण त्याच्या/तिच्या आनंदाबद्दल चिंतित आहात आणि ही भावना परस्पर संबंध अधिक दृढ होण्यास मदत करते.

आनंदी जगा

चांगल्या नातेसंबंधासाठी, दोन्ही जोडीदारांनी आनंदी असणे खूप महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही एकमेकांना इतकं स्वातंत्र्य देता की ते त्यांच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकतील, त्यांचे छंद पूर्ण करू शकतील, तेव्हा त्यांचे मन प्रसन्न राहते. त्यानंतर तुम्ही नातेसंबंधात 100% देण्याचा प्रयत्न करू शकता. त्यामुळे हे लक्षात फक्त आनंदी व्यक्तीच इतरांना आनंदी ठेवू शकते.

हेही वाचा>>>

Relationship Tips : जोडीदाराला नेहमीच महागडं गिफ्ट, शॉपिंगची गरज नसते, एकदा 'या' गोष्टी सुद्धा करून पाहा, प्रेम आणखी वाढेल

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shahajibapu Patil on Ekanath Shinde : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, शहाजीबापूंचं वक्तव्यABP Majha Headlines : 8 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 10 October 2024 : 07 PM : ABP MajhaNair Hospital Case : डीनची बदली, विरोधकांची टीका; सुळे, पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Embed widget