Relationship Tips : अपार प्रेम असूनही, 'या' चुका नात्यात ब्रेकअप करू शकतात, वेळीच सुधारा, दोष दूर करा
Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये काही दोष वेळीच दूर केले नाहीत तर ते नातं फार काळ टिकत नाही. जाणून घेऊया अशा चुका ज्या ब्रेकअपचे कारण बनतात.
Relationship Tips : प्रेमाचं नातं म्हटलं की जोडीदारांमध्ये छोटे-मोठे वाद आलेच, कधी-कधी एकमेकांबद्दलच्या अपेक्षची पूर्तता न झाल्याने वाद होतात, तर जोडीदाराच्या काही गोष्टी पटत नाही तेव्हा देखील वाद होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये राहणं हे जितकं आनंदाचं असतं. तितकंच आव्हानात्नकही आहेत. हे दोष वेळीच दूर केले नाहीत तर ते नातं फार काळ टिकत नाही. अशात, जर तुम्हाला छोट्या चुकांमुळे ब्रेकअपला सामोरं जावे लागणार नसेल, तर जाणून घेऊया अशा चुका ज्या ब्रेकअपचे कारण बनतात.
ब्रेकअप होण्याचे सर्वात मोठे कारण
ब्रेकअप करणे सोपे नाही. प्रेमाचं नातं संपुष्टात येणं ही सर्वात कठीण गोष्ट असते, तर या परिस्थितीतून जाणाऱ्या जोडप्यांसाठी हा खूप कठीण अनुभव असतो. ब्रेकअप होण्यामागे अनेक कारणे असली तरी सर्वात मोठे कारण म्हणजे एकमेकांवरचा विश्वास नसणे आणि एकमेकांना नीट समजून न घेणे. काही प्रकरणांमध्ये ब्रेकअप हाच एकमेव मार्ग असतो, परंतु परस्पर समन्वयाच्या अभावामुळे आणि अविश्वासामुळे ब्रेकअप होत असेल तर तो टाळता देखील येतो. जाणून घेऊया अशा गोष्टींबद्दल ज्या कोणत्याही नात्याला ब्रेकअपच्या उंबरठ्यावर आणू शकतात.
एकमेकांना बदलण्याची इच्छा
आपल्या जोडीदारात त्याच्या आवडीचे सर्व गुण असावेत असे या व्यक्तीला वाटते जे अगदी स्वाभाविक आहे. पण खऱ्या आयुष्यात हे शक्य नाही. समोरच्या व्यक्तीमध्ये अशी काही सवय असू शकते जी तुम्हाला आवडत नाही. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना बदलण्याचा प्रयत्न करू लागलात. यामुळे त्यांना नात्यात नकोसा दबाव जाणवू लागेल. म्हणून, त्यांना बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, तुमचा मुद्दा त्यांच्यासमोर प्रेमाने मांडा, जेणेकरून त्यांना तुमचा मुद्दा समजेल.
दोषाचा खेळ
प्रत्येक व्यक्ती चुका करतो. पण भूतकाळातील चुकांची सतत आठवण करून दिल्याने कोणत्याही नात्याचा पाया कमकुवत होऊ शकतो. चूक झाली असेल तर माफी मागून वाद संपवा. स्वतःचा बचाव करण्यासाठी, तुमच्या जोडीदाराच्या भूतकाळातील चुका मोजू नका किंवा तुमच्या चुकीसाठी त्याला दोष देण्याचा प्रयत्न करू नका.
एकमेकांना वेळ
आपल्या आयुष्यात काही जबाबदाऱ्या असोत, किंवा काही गोष्टींमुळे तुम्ही एकमेकांना कमी वेळ देता. हे करणे टाळा. एकमेकांशी बोलण्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करा. फिरायला जा आणि एकमेकांसोबत वेळ घालवा. एकमेकांना वेळ न दिल्याने नातं कमकुवत होऊ लागते.
वाद थांबवा
एखाद्या गोष्टीवरून जोडीदाराशी वाद होणे स्वाभाविक आहे. हे प्रत्येक नात्यात घडते. पण ही लढाई दीर्घकाळ सुरू राहिल्यास तुमचं नातं कमकुवत होऊ शकते. यामुळे तुमची एकमेकांबद्दलची नाराजी वाढेल. त्यामुळे हा वाद लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा.
हेही वाचा>>>
Relationship Tips : परफेक्ट जोडीदार होण्यासाठी फक्त 'एवढंच' करा! नातं इतकं बहरेल की प्रत्येकजण तुमचं उदाहरण देईल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )