(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Relationship Tips : अरे संसार संसार...लग्नानंतर वाद वाढतायत? 'या दोन गोष्टींच्या मदतीने गोष्टी सहज मॅनेज करू शकता.
Relationship Tips : संसारात जोडीदारांनी एकमेकांची मनाची स्थिती समजून घेतली पाहिजे, अशा दोन गोष्टी आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही लग्नानंतर येणारी सर्व आव्हाने अगदी सहजपणे हाताळू शकता
Relationship Tips : अरे संसार संसार...जसा तवा चुल्ह्यावर...आधी हाताला चटके... कवयित्री बहिणाबाई चौधरींची ही कविता आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. ज्याप्रमाणे नात्याची सुरुवात करणं खूप सोप्प असतं... पण नातं शेवटपर्यंत निभावणं हे तितकच कठीण असतं. लग्न हे एक असे नाजूक बंधन आहे. जिथे वेगवेगळ्या विचारांची माणसं एकत्र येतात आणि मग समन्वय निर्माण करून संसाराचा गाडा पुढे सरकवतात, पण जर तुमच्या नात्यात समन्वयाचा अभाव असेल तर लग्नानंतर रोज वाद होतील आणि तोडगा निघाला नाही तर मग वेगळे होणे हा मार्ग अनेकजण निवडतात, मात्र जर संसारात जोडीदारांनी एकमेकांची परिस्थिती समजून घेतली तर सहजपणे ही परिस्थिती हाताळली जाऊ शकते.
लग्नानंतर येणारी सर्व आव्हाने अगदी सहजपणे हाताळू शकता
लग्नानंतरचा काळ असा असतो जेव्हा अनेक जोडप्यांमध्ये सर्वाधिक भांडणं-वाद होतात. एकमेकांच्या सवयी आणि गरजा समजून घेत असूनही, संघर्ष होत राहतात. ही अशी वेळ आहे जी काळजीपूर्वक हाताळली नाही तर नाती तुटू शकतात. मात्र अशा दोन गोष्टी आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही लग्नानंतर येणारी सर्व आव्हाने अगदी सहजपणे हाताळू शकता. लग्नात काही तडजोडी कराव्या लागतात हे अगदी खरं आहे, पण याची जबाबदारी फक्त महिलांवरच नसावी, तर पुरुषांनीही त्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. यााबाबत कोणत्याही एका व्यक्तीची हट्टी वृत्ती नातं तुटण्याचे कारण बनू शकते.
लग्नानंतर येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याचे मार्ग
शांत राहणे
प्रत्येक गोष्टीचे उत्तर देणे आवश्यक नाही. कधीकधी शांत राहणे हा परिस्थितीतून बाहेर पडण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. कधीकधी प्रत्युत्तर दिल्याने भांडण आणखी वाढू शकते आणि हाताळणे कठीण होऊ शकते. जर तुमचा जोडीदार तुमच्यासाठी चुकीचे शब्द वापरत असेल किंवा तुमच्या चारित्र्यावर बोट दाखवत असेल तर तुमचा बचाव करणं गरजेचं आहे, पण तुमच्या सवयींबद्दल बोललं जात असेल, ज्या रिलेशनशिपसाठी चांगल्या नाहीत, तर वाद घालण्याची गरज नाही फक्त स्वतःचे नुकसान होईल.
मॅच्युरिटीने वागा
जेव्हा एखाद्या गोष्टीवरून भांडण होते तेव्हा त्यात अहंकार आणू नका आणि मॅच्युरिटीने वागा. जे कधीकधी कठीण असते, परंतु तुम्ही त्याचा सराव करू शकता. गोष्टी बोलून सुटतात आणि न बोलल्याने गोष्टी बिघडतात. हे समजून घ्या. तुमच्या जोडीदाराच्या महत्त्वांच्या मुद्द्यांना प्रतिसाद द्या, परंतु निरर्थक मुद्द्यांवर भांडण करण्याऐवजी ते हुशारीने हाताळा. भांडण कमी झाल्यावर आरामात बसून विचार करा.
हेही वाचा>>>
Relationship Tips : आजकाल ब्रेकअपचा ट्रेंड वाढलाय! हसतं-खेळतं नातं तोडू शकतात तुमच्या 'या' चुका, ब्रेकअपची कारणं समजून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )