Relationship: नववधूची हॅलिकॉप्टरने पैसे उडवायची इच्छा! बायकोच्या इच्छेपुढे हरला, पती झाला कर्जबाजारी! व्हिडीओ व्हायरल
Relationship: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे, नववधूच्या इच्छेखातर घरावर नोटा उडवण्यासाठी हेलिकॉप्टर बोलावले, याचा परिणाम नवऱ्या मुलावर झाला आहे.
Relationship: लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन...लग्न म्हणजे दोन जोडीदार आयुष्यभर एकमेकांचे जीवनसाथी असतात. असं म्हणतात लग्न केवळ दोघांचंच होत नाही, तर त्यासोबत दोन कुटुंबही एकत्र येतात. आजकालच्या बदलत्या काळानुसार लग्न म्हणजे एक एव्हेंट झाले आहे. प्रत्येकाला लग्नात मोठ्यातला मोठा खर्च करून दाखवायचे असते, तर काही लोक लग्न अगदी साध्या पद्धतीने करतात. लग्नात प्रत्येकाला काहीतरी खास करायचं असतं. वधू-वरांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक वेळा वराच्या किंवा वधूच्या विचित्र मागण्या ऐकून लोक आश्चर्यचकित होतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हेलिकॉप्टरमधून नोटांचा पाऊस पडताना दिसत आहे. यामागे नेमकं कारण जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल...
नववधूच्या घरावर हॅलिकॉप्टरने लाखो रुपयांच्या नोटांची उधळण...
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक विमान नववधूच्या घरावर उडत असून लाखो रुपयांच्या नोटांची उधळण करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. वधूच्या वडिलांच्या मागणीवरून वराच्या वडिलांनी हेलिकॉप्टर भाड्याने घेतले होते, ते पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते.
'आता नवरा मुलगा कर्ज फेडणार?
हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून वराच्या वडिलांनी मुलाच्या लग्नासाठी विमान भाड्याने घेतले आणि वधूच्या घरी लाखो रुपयांची उधळण केल्याचे लिहिले आहे. आता नवरा मुलगा वडिलांचे ऋण आयुष्यभर फेडत राहणार असे दिसते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, ही केवळ पैशाची उधळपट्टी आहे, दुसरे काही नाही. दुसऱ्याने लिहिले की, वधूच्या घरावर सत्ता दाखवण्यासाठी लोक कर्जही घेतात. एकाने लिहिले की वधू-वरांना बाजूला ठेवा, आज त्यांचे शेजारी सर्वात जास्त आनंदी असतील, कारण त्यांच्या घरावर नोटांचा पाऊस पडला आहे.
دلہن کے ابو کی فرماٸش۔۔۔
— 𝔸𝕞𝕒𝕝𝕢𝕒 (@amalqa_) December 24, 2024
دولہے کے باپ نے بیٹے کی شادی پر کراٸے کا جہاز لےکر دلہن کے گھر کے اوپر سے کروڑوں روپے نچھاور کر دیٸے
اب لگتا ہے دُولھا ساری زندگی باپ کا قرضہ ہی اتارتا رہیگا pic.twitter.com/9PqKUNhv6F
ही पहिलीच वेळ नाही..
लग्नात हेलिकॉप्टर वापरण्याची किंवा अशी विचित्र मागणी पूर्ण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. भारतात वधूच्या पाठवणीसाठी देखील अनेकदा हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यात आले आहे.
हेही वाचा>>>
Relationship: रिलेशनशिपमध्ये नवा ट्रेंड 'सिमर डेटिंग'! तरुणांमध्ये होतोय लोकप्रिय, नात्यासाठी एक सुरक्षित मार्ग? काय आहे हा डेटिंगचा प्रकार?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )