Rani Laxmibai Jayanti: लहान वयातच दाखवले 'असे' धाडस, एक महान वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई! जाणून घ्या आयुष्याशी संबंधित गोष्टी
Rani Laxmibai Jayanti: अवघ्या ब्रम्हांडाला अभिमान वाटेल अशी झाशीची राणी वीरांगना लक्ष्मीबाई, त्यांची आज 194 वी जयंती आहे.
Rani Laxmibai Jayanti 2022 : जीवनातील खरे योद्धा येणाऱ्या कठीण परिस्थितीला कधीच घाबरत नाहीत. कोणतेही आकर्षण त्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून वेगळे करू शकत नाही. त्यांची ध्येये ठरलेली आहेत. त्यांचा प्रामाणिक हेतू साध्य करण्यासाठी ते नेहमी आत्मविश्वासू, कर्तव्यदक्ष, स्वाभिमानी आणि धार्मिक असतात. अवघ्या ब्रम्हांडाला अभिमान वाटेल अशी भारतीय वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई,(Rani Laxmibai Jayanti 2022) त्यांची आज 194 वी जयंती आहे.
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची जयंती दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी देशभरात साजरी केली जाते. राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी काशीतील असिघाट वाराणसी येथे एका मराठी कर्हाडे ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे आणि आईचे नाव भागीरथीबाई होते. राणी लक्ष्मीबाई यांचे बालपणी मणिकर्णिका असे नाव होते, पण मणिकर्णिका यांना मनु असे संबोधले जात असे. लक्ष्मीबाईच्या आईचे लहान वयातच निधन झाले, जेव्हा त्या फक्त चार वर्षांच्या होत्या. त्यांचे वडील बिथूर जिल्ह्यातील पेशवा बाजीराव द्वितीय यांच्याकडे काम करत होते. प्राथमिक शिक्षण घरीच झाले असले तरी लक्ष्मीबाईंना वाचन, लेखन, नेमबाजी, तलवारबाजी आणि मल्लखांबाचे प्रशिक्षण मिळाले. घोडेस्वारीत निपुण असलेल्या लक्ष्मीबाईंकडे सारंगी, बादल आणि पवन असे तीन घोडे होते.
राणी लक्ष्मीबाईचे वैयक्तिक आयुष्य
मे 1851 मध्ये झाशीचे महाराज गंगाधर राव नेवाळकर यांच्याशी मणिकर्णिकेचा विवाह झाला. त्यानंतर त्यांचे नाव बदलून लक्ष्मीमाई ठेवण्यात आले. लक्ष्मीबाईंनी 1952 मध्ये मुलगा दामोदर राव यांना जन्म दिला, पण 4 महिन्यांनी त्याचा मृत्यू झाला. या जोडप्याने नंतर गंगाधर राव यांच्या चुलत भावाला दत्तक घेतले, त्यांचे नाव दामोदर राव असे ठेवण्यात आले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून ब्रिटीश अधिकार्याच्या उपस्थितीत दत्तक घेण्यात आले. दत्तक घेतलेल्या मुलाला योग्य आदराने वागवण्याचे निर्देश देणारे महाराजांचे पत्र सुद्धा घेऊन गेले आणि झाशी आयुष्यभरासाठी लक्ष्मीबाईच्या ताब्यात देण्यात आली.
17 जून 1858 रोजी शहीद
नोव्हेंबर 1853 मध्ये महाराज गंगाधर राव नेवाळकरांच्या मृत्यूनंतर, ईस्ट इंडियन कंपनीने गव्हर्नर-जनरल लॉर्ड डलहौसीच्या राजवटीत डॉक्ट्रीन ऑफ लॅप्सचा वापर केला. त्यामुळे झाशीच्या गादीवरील दामोदररावांचा दावा रद्द करण्यात आला, त्यांना महाराज आणि लक्ष्मीबाई यांचे दत्तक मूल मानले गेले. मार्च 1854 पर्यंत, लक्ष्मीबाईंना झाशीचा राजवाडा सोडण्याची सूचना देण्यात आली आणि त्या बदल्यात त्यांना वार्षिक 60,000 रुपये देऊ करण्यात आले. मात्र, राणी लक्ष्मीबाई हिंमत हारल्या नाहीत. त्यांनी झाशीचे रक्षण करण्याचा निर्धार केला. 17 जून 1858 रोजी ग्वाल्हेरजवळ ब्रिटिश सैन्याविरुद्ध लढताना त्यांनी वीरगती प्राप्त केली.
ब्रिटिशांवर भारी
लक्ष्मीबाईंनी इंग्रजांविरुद्ध जोरदार लढा दिला. दोन्ही हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार होऊन आणि एका मुलाला पाठीवर बांधून झाशीच्या राणीने इंग्रजांशी त्या लढल्या. पण इंग्रजांच्या प्रचंड सैन्याच्या तुलनेत झाशीचे सैन्य जास्त काळ टिकले नाही. शेवटी इंग्रजांनी झाशी काबीज केली.
स्वातंत्र्यासाठी बलिदानाचा संदेश
इंग्रजांशी लढताना राणी लक्ष्मीबाई गंभीर जखमी झाल्या. ब्रिटिशांनी तिच्या शरीराला हात लावू नये, अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे काही सैनिक लक्ष्मीबाईंना बाबा गंगादास यांच्या कुटीत घेऊन गेले आणि त्या झोपडीतच 18 जून 1858 रोजी लक्ष्मीबाईंना वीरगती प्राप्त झाली. तिथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देऊन त्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदानाचा संदेश दिला.