एक्स्प्लोर

Ram Navami 2022 : रामनवमीचा 'हा' आहे शुभमुहूर्त, जाणून घ्या पूजा, तिथी आणि धार्मिक महत्त्व

Ram Navami 2022 : धार्मिक पौराणिक कथेनुसार, चैत्र शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी, माता कौशल्याच्या पोटातून भगवान रामाचा जन्म झाला. रामनवमी दरवर्षी चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरी केली जाते.

Ram Navami 2022 : चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी 12 वाजता) रामजन्माचा सोहळा होतो. श्री रामांच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारांसमवेतच गाठीपण घालतात. श्री रामांची पूजा करताना त्यांना करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावतात. तसेच श्री रामांना हळद-कुंकू वाहताना. आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात. श्रीरामांना केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहतात. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात. रामजन्माच्या दिवशी साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवात रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो.

राम नवमी 2022 चा शुभ मुहूर्त :

राम नवमी तारीख - 10 एप्रिल 2022, रविवार
नवमी तिथी सुरू - 10 एप्रिल रोजी रात्री उशिरा 1:32 मिनिटांपासून सुरू
नवमी तिथी समाप्त - 11 एप्रिल रोजी पहाटे 03:15 पर्यंत
पूजेचा मुहूर्त - 10 एप्रिल सकाळी 11:10 ते 01:32 मिनिटे

राम नवमी पूजा पद्धत :

रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटोपल्यानंतर स्वच्छ कपडे घालावे. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी भगवान श्री राम, लक्ष्मण आणि माता सीता यांची विधिपूर्वक पूजा करावी. पूजेपूर्वी त्यांना कुंकुम, सिंदूर, रोळी, चंदन इत्यादींनी तिलक करावं आणि बांधावर तांदूळ आणि तुळस अर्पण करावी. रामनवमीच्या दिवशी भगवान विष्णूचा अवतार श्री राम यांना तुळशी अर्पण केल्याने ते लवकर प्रसन्न होतात. पूजेमध्ये देवतांना फुले अर्पण करावे. त्यानंतर तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावल्यानंतर श्री रामचरित मानस, रामरक्षा स्तोत्र किंवा रामायणाचे पठण करावे. श्री राम, लक्ष्मणजी आणि माता सीता यांना झुलवल्यानंतर त्यांची आरती करा आणि भक्तांमध्ये प्रसादाचे वाटप करावा.

महत्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूदAkshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget