(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beauty Tips | Priyanka Chopra च्या सौंदर्याचं गुपित? स्वत: शेअर केल्या टिप्स!
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आपल्या सौंदर्यानं अनेक चाहत्यांना घायाळ करते. अशातच तिने आपल्या सौंदर्याचं गुपित शेअर केलं आहे. प्रियंकाने आपल्या ब्युटी टीप्स चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत.
मुंबई : प्रियंकाने आपल्या अभिनय कौशल्याने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे. प्रियंका चोप्रा लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. अशातच प्रियंका आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि सुंदर त्वचेसाठी आयुर्वेदिक आणि पारंपारिक अशा अनेक घरगुती उपायांचा वापर करते.
प्रियंका चोप्राने आतापर्यंत अनेक मुलाखतींमधून आपल्या ब्युटी टिप्स शेअर केल्या आहेत. अशातच तिने अनेकदा आपल्या सौंदर्यामागील गुपितही चाहत्यांशी शेअर केली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियंका चोप्रा अनेकदा आपलं सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी घरगुती आणि पारंपारिक उपायांचा वापर करते. आज आम्ही तुम्हाला प्रियंकाच्या काही ब्युटी सीक्रेट्सबाबत सांगणार आहोत.
पारंपारिक फेसपॅक
प्रियंका आपल्या चेहऱ्यासाठी एका घरगुती फेसपॅकचा वापर करते. हा फेसपॅक तयार करण्यासाठी ती दही, ओट्स आणि हळद एकत्र करुन त्याची पेस्ट तयार करते. ही पेस्ट चेहऱ्यावर लावते. अर्ध्या तास तसंच ठेवून त्यानंतर ती थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुते. प्रियंका आपल्या फेसपॅकबाबत सांगते की, "या फेसपॅकमुळे माझी त्वचा तजेलदार होण्यास मदत होते."
केसांची काळजी घेण्यासाठी प्रियंका खोबऱ्याच्या तेलाचाही वापर करते. ती तिच्या केसांचं सौंदर्य खुलवण्यासाठी नेहमी खोबऱ्याच्या तेलाचा वापर करते. खोबऱ्याच्या तेलाने प्रियंका आपल्या केसांना मसाज करते. याबाबत प्रियंका सांगते की, "आयुर्वेद हा माझ्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्टीत आयुर्वेदाचा समावेश आहे. तसेच मी प्रयत्न करत असते की, मी आयुर्वेदातील सर्व नियमांचं पालन करेन"
प्रियंका म्हणते की, नकारात्मकतेचा सौंदर्यावर आणि तब्येतीवर दोन्हीवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे तुमची काम करण्याच्या क्षमता कमी होत जाते. प्रियंकाला सोशल मीडियावर ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. पण प्रियंका त्याकडे लक्ष न देता तिला जे योग्य वाटतं तेच करत असते.
(टिप : सदर गोष्टी या केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- केसांसाठी तूप म्हणजे वरदान; जाणून घ्या फायदे
- Health Tips: योगासनं करताना करा या चार नियमांचे पालन
- Summer Skin Care Tips: उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी!