Pregnancy Tips : गर्भधारणेदरम्यान महिलांना वारंवार उलट्या होतायत? 'हे' तीन आहेत रामबाण उपाय
Pregnancy Tips : गर्भधारणेदरम्यान महिलांना मळमळ होत असेल तर घाबरण्याचे कारण नाही, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Pregnancy Tips : अनेक महिलांना गर्भधारणेदरम्यान (Pregnancy Tips) उलट्या होणं हे एक स्वाभाविक आणि सामान्य लक्षण मानलं जातं. जवळपास 70 टक्के महिलांना गर्भधारणे दरम्यान उलट्या होतात किंवा पोटात मळमळ होते. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, महिलांमध्ये ही समस्या साधारण 9 महिन्यांपर्यंत राहू शकते. महिलांमध्ये ज्या उलट्या होतात त्या समस्येला 'मॉर्निंग सिकनेस' असंही म्हणतात. महिलांमध्ये (Women) हा त्रास अनेकदा इतका वाढतो की त्यांना वेदना फार असह्य होतात.
गर्भधारणेदरम्यान महिलांना मळमळ होत असेल तर घाबरण्याचं काही कारण नाही, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच, गर्भधारणे दरम्यान महिलांना उलट्या नेमक्या कोणत्या कारणांमुळे होतात हे जरी अद्याप स्पष्ट नसलं तरी ही समस्या हार्मोनल बदलांमुळे होते असं तज्त्रांचं म्हणणं आहे. काही घरगुती उपाय करून ही समस्या बरी होऊ शकते.
काय कारणे असू शकतात
जर महिलांना जुळी मुलं होत असतील तर त्यांच्यामध्ये उलट्या होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. असंही आरोग्य तज्ज्ञ म्हणतात. याशिवाय महिलांमध्ये इस्ट्रोजेन हार्मोन वाढल्याने देखील त्यांना मळमळ होण्याचा त्रास वाढू शकतो. याबरोबर जर गर्भवती महिलांच्या कुटुंबात मायग्रेनची फॅमिली हिस्ट्री किंवा डोकेदुखीची समस्या असेल महिलांना उलट्या होऊ शकतात. महिलांच्या या उलट्या थांबवण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत.
संत्र्यांचं सेवन करा
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी तसेच सायट्रिक ऍसिड भरपूर प्रमाणात. संत्र्यांच्या सालीचा वास घेतल्याने मळमळ आणि अस्वस्थता दूर होते. तुम्ही संत्र्यांचा ज्यूस करून देखील पिऊ शकता.
आल्याचा चहा घ्या
आल्याचा चहा केवळ उलट्या थांबविण्याचे काम करत नाही तर अॅसिडिटी दूर करून पचनसंस्थाही निरोगी ठेवते. गर्भवती महिला आल्याचा तुकडा चघळू शकतात.
भरपूर पाणी प्या
गर्भधारणेदरम्यान डिहायड्रेट होण्यापासून स्वतःला दूर ठेवा. गरोदरपणात उलट्या होत असतील तर पाण्याचं भरपूर प्रमाणात सेवन करा. डिहायड्रेट टाळण्यासाठी, दररोज किमान 7 ते 8 ग्लास पाणी प्या.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.