Potato History : प्रत्येक भाज्यांमध्ये दिसणारा बटाटा मूळचा भारतातील नाहीच, 'या' देशातून आला भारतात
Potato History : पोर्तुगीज आणि डच व्यापाऱ्यांनी बटाटा पहिल्यांदा भारतामध्ये आणला. आधी बटाटा फक्त मलबार किनारपट्टी भागात उगवला जायचा, त्यानंतर तो बंगाल आणि उत्तर भारतात पोहोचला.
Potato Origin and History : भारतामध्ये (India) रोजच्या जेवणात (Food) हमखास बटाटा (Potato) वापरला जातो. असे खूप कमी लोक आहेत, ज्यांना बटाटा खायला आवडत नाही. कडधान्य असो किंवा पालेभाजी... भाजी कोणतीही असो त्यामध्ये दिसतोच दिसतो. भारतात प्रत्येक प्रकारच्या भाजीमध्ये बटाटा वापरला जातो. वडापाव, समोसा, पावभाजी, पाणीपुरी, मसाला डोसा किंवा मग पराठा हे सर्व पदार्थ बनवताना बटाट्याचा वापर केला जातो.
भारतामध्ये बटाटा जणू काही भाजांचा राजा आहे, कारण कोणतीही भाजी त्याच्याशिवाय पूर्ण होत नाही असेच म्हणावे लागेल. पण तुम्हाला माहीत आहे का प्रत्येक भाज्यांमध्ये दिसणारा बटाटा मूळचा भारतातील नाहीच. बटाटा परदेशातून भारतात आला आहे. बटाट्याचा इतिहास कसा आहे, वाचा सविस्तर...
बटाटा भारतात आला तरी कसा?
प्रचलित माहितीनुसार, 16 व्या शतकापर्यंत फक्त पेरूमधील लोकांच्या जीवनात बटाट्याचा समावेश होता. इतर संपूर्ण जगाला या पिकाबाबत माहिती नव्हती. पण खलाशी ख्रिस्तोफर कोलंबस (Christopher Columbus) जेव्हा जगाच्या प्रवासाला निघाला तेव्हा त्याने समुद्रमार्गे बटाटे जगातील सर्व खंडांमध्ये नेले. दरम्यान, पोर्तुगीज आणि डच व्यापार्यांनी बटाटा भारतात आणला, असेही म्हटले जाते. सर्वात आधी मलबार किनारपट्टीवर बटाट्याचं पीक घेतलं जायचे, त्यानंतर बटाटा बंगाल आणि उत्तर भारतामध्ये पोहोचला. आता तर कोणतीही भाजी असो, त्यामध्ये बटाट असतोच.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमुळे घरोघरी पोहोचला बटाटा
18 व्या शतकाच्या सुमारास, ईस्ट इंडिया कंपनीला भारतात बटाट्यांचा तुटवडा जाणवू लागला. कंपनी बटाटे युरोपमधून आयात करण्याऐवजी ते भारतातच उगवण्याचे ठरवले. यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने शेतकऱ्यांना स्वस्त दरात मोठ्या प्रमाणात बटाट्याची रोपे विकली, त्यानंतर हळूहळू बटाटा हे पीक घरोघरी घेतले जाणारे पीक बनले.
अंतराळातही उगवलेले बटाटे
बटाटा हे पृथ्वीवर घेतले जाणारे पहिले पीक आहे. पण याचे पीक अवकाशातदेखी घेतले गेले आहे. 1995 च्या सुरुवातीला चीन आणि नासा यांच्या संयुक्त मोहिमेत पृथ्वीच्या बाहेरील वातारणात बटाटा उगवण्यात आला. पहिल्यांदाच अंतराळात बटाट्याची लागवड करण्यात आली.
बटाट्याचे फायदे
बटाट पचनासाठी फार सोपा आहे. तसंच याच्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन A, B, C कॉम्प्लेक्स आणि कार्बोहायड्रेट्स आढळतात. हे हायपोग्लायसेमिक इंडेक्स कमी करतात, असं हेल्थलाइनने म्हटलं आहे