एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Beauty Tips : पाय सुंदर आणि मऊ बनवा, घर बसल्या पेडीक्योर करा

Crack Heels Problem : पायाची काळजी न घेतल्यास त्वचा कोरडी पडून टाचांना तडे जातात. अशा परिस्थितीत तुम्हाला पार्लरमध्ये जाता येत नसेल तर तुम्ही घरीही पेडीक्योर करू शकता. या सोप्या पद्धतीचे वापरून पाहा.

Crack Heels Problem : स्त्रिया त्यांच्या चेहऱ्यासोबतच हात आणि पाय यांचीही काळजी घेतात. पार्लरमध्ये तुम्हाला अनेक महिला पेडीक्योर आणि मॅनिक्युअर करून घेताना दिसतील. मात्र, कोरोनामुळे आजकाल अनेक महिलांना पार्लरमध्ये जाता येत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही घरीही सहज पेडीक्योर करू शकता. घरी पेडीक्योर आणि मॅनिक्युअर करणे खूप सोपे आहे. 

पेडीक्योर करण्याचे फायदे
पेडीक्योरमुळे पायांचे सौंदर्य वाढते. पायावर जमा झालेली मृत त्वचा काढून निघून जाते आणि फाटलेल्या टाचांना दुरुस्त होतात. नियमित पेडीक्योर केल्याने पाय चमकू लागतात. याशिवाय नखांची चमकही वाढते. पेडीक्योर करताना पायांना मसाज केले जाते, त्यामुळे शरीराला आराम मिळतो. त्याचबरोबर स्क्रब केल्याने रक्ताभिसरणही चांगले राहते.

घरीच बनवा स्क्रब
पेडीक्योर करण्यासाठी स्क्रबची गरज असते. बाजारात अनेक प्रकारचे स्क्रब उपलब्ध आहेत, परंतु तुम्ही घरी स्वस्तात आणि अगदी सहजतेने स्क्रब तयार करू शकता. 

1. मिल्क स्क्रब - एक कप कोमट दुधात 1 टेबलस्पून साखर आणि 1 टेबलस्पून मीठ टाका. आता त्यात 1 चमचा बेबी ऑईल घालून पेस्ट बनवा. तुम्ही ते थेट पायावर लावून स्क्रब करू शकता किंवा प्रथम कोमट पाण्यात पाय टाकून खाली बसू शकता. थोड्या वेळाने पायांना स्क्रब करा.

2. कॉफी स्क्रब - 1 टेबलस्पून कॉफी पावडरमध्ये 1 टेबलस्पून मीठ घालून मिक्स करा. आता त्यात अर्धा कप मध घाला आणि कोणत्याही इसेंशियल ऑईलचे दोन ते तीन थेंब घाला. पाय कोमट पाण्यात टाकू शकता किंवा या स्क्रबने भिजवलेल्या पायाची मालिश करू शकता.

पेडीक्योर कसे करावे

1. पेडीक्योर करणे खूप सोपे आहे, यासाठी प्रथम कोमट पाणी टबमध्ये ठेवा.
2. पाय 10-15 मिनिटे कोमट पाण्यात ठेवा.
3. भिजलेल्या पायांना स्क्रबिंग करा.
4. आता पाय प्युबिक स्टोन किंवा कोणत्याही फूटब्रशने चांगले घासून स्वच्छ करा.
5. यानंतर भिजलेल्या पायाची मृत त्वचा पूर्णपणे काढून टाका.
6. टाच आणि नखांच्या आजूबाजूला पूर्णपणे स्वच्छ करा.
7. आता पाय पुसल्यानंतर पायांना मॉईश्चरायझरने मसाज करा.
8. फाइलरच्या मदतीने तुमच्या नखांना चांगला आकार द्या.
9. तुमची कोणताही आवडता नेल पेंट लावा.
10. फक्त 20-25 मिनिटांत तुमच्या पायांचे सौंदर्य वाढेल आणि पाय चमकू लागतील.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Embed widget