Peanut Side Effects : या लोकांनी भिजवलेले शेंगदाणे खाऊ नयेत; चुकीमुळे होऊ शकतं नुकसान
Peanut Side Effects : काही लोक हेल्दी राहण्यासाठी सकाळी लवकर भिजवलेले शेंगदाणे खातात. पण 'या' लोकांनी अशा प्रकारे भिजवलेले शेंगदाणे खाऊ नयेत. यामुळे आरोग्याचे अनेक प्रकारे नुकसान होते.
Peanut Side Effects : शेंगदाण्याचे (Peanut) सेवन आपल्या आरोग्यासाठी फार चांगले मानले जाते. शेंगदाण्यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. हे पोषक घटक तुमच्या शरीरासाठी फार फायदेशीर असतात. शेंगदाण्यात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी, लोह आणि फॉस्फरस यांसारख्या पोषक घटकांचा समावेश असतो. याबरोबरच शेंगदाण्यामध्ये प्रथिने चांगल्या प्रमाणात आढळतात. ज्यामुळे आपले स्नायू निरोगी राहतात. पण काही लोकांनी भिजवलेले शेंगदाणे खाऊ नयेत. यामुळे आरोग्याला हानी पोहोचू शकते.
'या' लोकांनी भिजवलेले शेंगदाणे खाणे टाळावे
संधिवात असलेले रूग्ण : ज्या लोकांना संधिवाताची समस्या आहे. अशा लोकांनी भिजवलेल्या शेंगदाण्याचे सेवन करू नये. यामुळे तुमच्या शरीराला वेदना होऊ शकतात. कारण शेंगदाण्यामध्ये लेक्टिन नावाचे तत्व असते, ज्यामुळे सांधेदुखीच्या रुग्णांच्या समस्या वाढू शकतात.
कावीळ आणि यकृत नुकसान : भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने शरीरातील अफलाटॉक्सिन वाढते. जे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुळे रुग्णाचे डोळे पिवळे पडतात आणि नंतर रुग्णाला भूक कमी लागते. जर तुमचे यकृत कमजोर असेल किंवा तुम्हाला यकृताशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर भिजवलेले शेंगदाणे खाणे टाळा. त्यामुळे तुम्हाला कावीळही होऊ शकते.
पोटाशी संबंधित समस्या असल्यास : ज्या व्यक्तींना पोटाशी संबंधित समस्या आहेत अशा व्यक्तींनी शेंगदाण्याचे सेवन करू नये. उदाहरणार्थ, बद्धकोष्ठता, अपचन इत्यादी समस्या असल्यास भिजवलेले शेंगदाणे खाणे टाळावे. यामुळे नुकसान होऊ शकते.
Phytic Acid : जर तुम्ही खूप भिजवलेले शेंगदाणे खाल्ले तर तुमच्या शरीरात Phytic acid वाढते. ज्यामुळे तुम्हाला अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.
शेंगदाणे खूप स्वस्त आणि हिवाळ्यासाठी चांगले आहेत. पण त्यात फॉस्फरस देखील चांगल्या प्रमाणात असते, म्हणूनच जर तुम्ही ते जास्त खाल्ले तर तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते. अनेकवेळा आपण पाहतो की आपल्या शरीराच्या अनेक भागांमध्ये ऍलर्जीप्रमाणे छोटे दाणे बाहेर पडतात, तर त्याचे कारण आपले शेंगदाणे देखील असू शकते. कारण शेंगदाण्यांचा प्रभाव उष्ण असतो. तुम्हालाही शरीरात अशीच काही चिन्हे दिसली तर शेंगदाणे खाणे थांबवू नका, तर त्याचे प्रमाण थोडे कमी करा. कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात खाल्ल्याने आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :