Patanjali News: दिल्लीमध्ये होणार ‘आंतरराष्ट्रीय जनमंगल परिषद’, सुरू होणार ‘दर महिन्याला एक उपवास’ महाअभियान
दिल्लीतील ऐतिहासिक भारत मंडपम येथे 12 आणि 13 डिसेंबरला एक भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशातील अनेक नामांकित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

International Public Welfare Conference: देशाची राजधानी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये योगगुरू बाबा रामदेव महाराज आणि जैन संत अंतर्मना आचार्य प्रसन्न सागर महाराज यांच्या उपस्थितीत दोन दिवसीय ‘आंतरराष्ट्रीय जनमंगल संमेलन’ आयोजित केले जाणार आहे.(Patanjali)
या परिषदेमागील मुख्य उद्दिष्ट आहे “लोककल्याणाची योग्य दृष्टि, उपवास, ध्यान, योग आणि स्वदेशी विचार”. याच व्यासपीठावरून एक मोठे जनआंदोलन ‘दर महिन्याला एक उपवास’ या उपक्रमाची सुरुवात केली जाणार आहे.
दर महिन्याच्या 7 तारखेला उपवासाचा संकल्प
या महाअभियानांतर्गत नागरिकांना दर महिन्याच्या 7 तारखेला उपवास करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. भारतासह जगभरातील लाखो लोक आधीच या अभियानाशी जोडले गेले आहेत. हा उपक्रम केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे, तर मानसिक शांती आणि आत्मकल्याणासाठीही वरदान ठरणार आहे.
परिषदेत अनेक दिग्गजांची उपस्थिती
या भव्य कार्यक्रमात अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गजेंद्रसिंह शेखावत, भूपेंद्र यादव आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता विशेष उपस्थित राहतील.
याशिवाय दिल्लीचे कॅबिनेट मंत्री प्रवेश साहिब सिंह आणि कपिल मिश्रा, खासदार सुधांशु त्रिवेदी, खासदार योगेंद्र चंदोलिया, ज्येष्ठ लिव्हर तज्ज्ञ डॉ. एस. के. सरीन, भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष एन. पी. सिंह आणि पतंजलि रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. अनुराग वार्ष्णेय देखील आपले विचार मांडतील.
कार्यक्रमात पूज्य बागेश्वर सरकार धीरेंद्र शास्त्री ऑनलाईन पस्थिती लावणार आहेत. तसेच आचार्य बालकृष्ण महाराज, गीता मनीषी महामंडलेश्वर ज्ञानानंद महाराज आणि महंत बालकनाथ योगी महाराज यांच्या उपस्थितीने वातावरण आनंददायी होणार आहे.
योग आणि तपाचा अनोखा संगम
ज्या प्रकारे स्वामी रामदेव यांनी योगाला “हरिद्वार ते हरद्वार” पोहोचवून जगाला आरोग्याचा मार्ग दाखवला, त्याचप्रमाणे आचार्य प्रसन्न सागर महाराज यांनी कठोर तपस्येने एक अद्वितीय उदाहरण घालून दिले आहे. त्यांनी आजवर 3,500 हून अधिक उपवास केले आहेत आणि सलग 557 दिवसांचा उपवास करून ‘उपवास साधना शिरोमणि’ हा मान मिळवला आहे.
आता या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या संयुक्त प्रयत्नातून मानवकल्याणासाठी या महाअभियानाचा शुभारंभ होत आहे, जेणेकरून योग आणि उपवासाच्या माध्यमातून सर्वांच्या जीवनात कल्याण घडवता येईल.























