Parenting Tips : तुमचे मूल इतरांपेक्षा लाजाळू आहे का? मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी 'या' पद्धती फॉलो करा
Parenting Tips : कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक दृष्टिकोनातून पाहिले तर मुलांचा चांगला विकास करणे ही आपली जबाबदारी आहे.
Parenting Tips : प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे वेगळे व्यक्तिमत्व असते, काही खूप बोलके असतात, काही कमी बोलके असतात, काही जास्त शारीरिक क्रियाशील असतात, तर काही आळशी स्वभावाचे असतात. पण आपले विचार वेळेवर मांडता येत नाहीत. अशी मुलं फार लाजाळू असतात. असा मुलांना बोलतं करणं तसं तर फार कठीण असतं. पण, या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी काीही टिप्स घेऊन आलो आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही मुलांमधील हा स्वभाव कमी करू शकता. आणि मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकता. या टिप्सविषयी जाणून घेऊयात.
लाजाळू मुलांना आत्मविश्वास कसा बनवायचा?
कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक दृष्टिकोनातून पाहिले तर मुलांचा चांगला विकास करणे ही आपली जबाबदारी आहे. मुलांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करून त्यांचं वेळेत चांगले संगोपन करून त्यांचा आत्मविश्वास वाढवा.
तुमच्या मुलाचे चांगले मित्र व्हा
जर तुमचे मूल तुमच्याबरोबर आणि घरात इतर सदस्यांबरोबर सामान्यपणे राहत असेल. पण, घराबाहेर पडताच तो पूर्णपणे शांत झाला असेल, तर त्याला सर्वांसमोर ओरडू देऊ नका. त्यांच्या समसय्या समजून घ्या. थोडक्यात, आपल्या मुलांचे चांगले मित्र व्हा.
इतर मुलांशी तुलना करू नका
प्रत्येक मुलाची स्वतःची क्षमता असते, म्हणून एका मुलाची दुसऱ्या मुलाशी तुलना करू नका. तुलना केल्याने मुलांचा आत्मविश्वास कमी होतो.
मुलांचे ऐका
पालकांप्रमाणेच मुलांचंही एखाद्या गोष्टीत आपलं मत असू शकतं. अशा वेळी आपलं मत मुलांवर लादण्यापेक्षा मुलांची देखील बाजू ऐकून घ्या आणि मगच निर्णय घ्या.
तुमच्या मुलांचे आदर्श व्हा
प्रत्येक मूल हे आपल्या पालकांचं अनुकरण करत असते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये हव्या असलेल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात अंमलात आणाव्या लागतील, म्हणजेच तुम्ही स्वतःच त्यांचे आदर्श व्हा.
नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रेरणा द्या
तुमच्या मुलांना नवीन उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्या, हे त्यांना इतर मुलांच्या आसपास राहून त्यांची कौशल्ये विकसित करण्यास मदत करेल आणि तुमचे मूल इतर मुलांशी संवाद साधण्यास देखील शिकेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :