Omega - 3 For Good Health : ओमेगा - 3 (Omega -3) हे खूप आपल्या शरीराकरीता अत्यंत आवश्यक असणारे फॅटी अॅसिड आहे. हे एक पोषक तत्व आहे, जे रोगांशी लढण्याची क्षमता विकसित करण्यास मदत करते. ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स हे शरीरातील अनेक कार्यांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. तसेच, त्यांचे पुरेसे सेवन हे आपल्या शरिराच्या अनेक सामान्य आणि गंभीर आरोग्य समस्यांपासून बचाव करू शकते.
ओमेगा-3 फॅटी अॅसिडमुळे हृदयाचे कार्य अधिक चांगले होते. ओमेगा-3 फॅटी अॅसिड हे महिलांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. ते महिलांच्या वाढत्या वयानुसार ऑस्टियोआर्थरायटिस आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करतात. तसेच मासिक पाळीत होणाऱ्या वेदना ही कमी करतात. हे तुमच्या मेंदचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते. तुमची स्मरणशक्ती, मूड आणि बुद्धिमत्ता सुधारण्याकरताही ओमेगा 3 फायदेशीर ठरते. सोबतच यामुळे तुमचे केस आणि डोळेही निरोगी राहतात. ओमेगा - 3 फॅटी अॅसिडमुळे कॅन्सरसारख्या (Cancer) आजारांचा धोकाही टळू शकतो.
'या' पदार्थांचा करा रोजच्या आहारात समावेश
माशाचे तेल (Fish Oil)
माशांच्या तेलात ओमेगा - 3 फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असते. हे तेल सहसा ट्यूना किंवा रावस माश्यापासून बनवले जाते. माश्यांचे तेल हृदयाकरिता फायदेशीर ठरते. तसेच शरीरातील कोलेस्ट्राॅलची पातळी नियंत्रीत ठेवण्याकरता याचा फायदा होऊ शकतो.
जवस (Flax Seeds)
जवसाच्या (Flax Seeds) तेलामध्ये अल्फा लिनोलिक अॅसिड (Alpha linolic acid) सापडतं, जे एक प्रकारे ओमेगा 3 फॅटी अॅसिड (Omega 3 fatty acid) असतं. त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म आपल्याला जळजळ कमी करण्यास आणि मेंदूचे संरक्षण करण्यास मदत करतात. फ्लॅक्ससीडमध्ये असलेल्या ओमेगा 3 फॅटी ऍसिडमुळे फ्लेक्ससीड तेलाचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. यासोबतच हे ब्लडप्रेशरची पातळी कमी करण्यासही मदत करते.
चिया सीड्स (Chia Seeds)
चिया सीड्सचा (Chia Seeds) शरीराला मोठ्या प्रमाणात फायदा होतो. याओमेगा 3 फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते. याचा समावेश रोजच्या आहारात केल्यास तुमचे अनेक आजार दूर होऊ शकतात.
आक्रोड (Walnut)
सुक्या मेव्यामध्ये ओमेगा- 3 (Omega-3) फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात आढळते. यापैकी, अक्रोड हे ओमेगा -3 फॅटी ऍसिडचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. तुम्ही अक्रोड कधीही खाऊ शकता.
1. ओमेगा 3 तुमच्या रक्तात असणारी ट्रायग्लिसराईड्ची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. शरीरातील ट्रायग्लिसराईड्ची पातळी वाढल्यास तुम्हाला हार्टटॅक येण्याचा धोका वाढू शकतो.
2. ओमेगा 3 च्या कमतरतेमुळे डोळे कोरडे पडण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो.
3. ओमेगा ३ अॅसिडच्ये सेवनामुळे ब्रेनला ऑक्सीजनचा व्यवस्थित पूरवठा होतो आणि त्यासाठी ओमेगा 3 फॅटी अॅसिड मेमरीला बूस्ट करण्याकरता फायदेशीर ठरतो.
इतर महत्वाच्या बातम्या
Health Tips : तुमच्या घरात लहान मुलं आहेत? पावसाळ्यात घ्या विशेष काळजी, वाचा सविस्तर