Health Care: संशोधकांनी 'मॅक्रोफेजेस' नावाच्या पांढऱ्या रक्त पेशींचा एक प्रकार शोधून काढला आहे, जो ट्यूमरला मुळापासून बरा करु शकतो. कॅन्सरला शरीरातील एखाद्या भागावर हल्ला करण्यापासून देखील या पांढऱ्या पेशी प्रतिबंधित करतात. स्तनाचा कॅन्सर, मेंदूचा कॅन्सर किंवा त्वचेच्या कॅन्सरवर उपचार करणं कठीण असतं. कॅन्सरशी लढणाऱ्या रुग्णांना शस्त्रक्रिया हाच पहिला पर्याय असतो. तरीही शस्त्रक्रिया कर्करोगाच्या सर्व पेशी काढून टाकू शकत नाही आणि त्यामुळे उरलेल्या पेशी वाढू शकतात आणि संपूर्ण शरीरात पसरू शकतात.


'मॅक्रोफेजेस' नावाच्या पांढऱ्या रक्त पेशी केवळ कर्करोगाच्या पेशी काढून टाकत नाही, तर रोगप्रतिकारक शक्तीला भविष्यात कर्करोगाच्या पेशींना ओळखण्यास आणि त्यांना मारण्यास देखील शिकवतात. तर याशिवाय ट्यूमरच्या वस्तुमानामध्ये प्रवेश करू शकतील असे रेणू तयार करणे आव्हानात्मक आहे, असे अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील प्राध्यापक डेनिस डिशर म्हणाले.


कॅन्सरवर मात करण्यासाठी नवीन रेणू तयार करण्याऐवजी, आम्ही रुग्णांना कॅन्सरच्या पेशी मारणाऱ्या मॅक्रोफेज पेशी वापरण्याचा सल्ला देतो, असे डिशर म्हणाले. मॅक्रोफेजेस ही एक प्रकारची पांढरी रक्त पेशी आहे, जी शरीरातून कॅन्सरचे जीवाणू, विषाणू काढून टाकण्यास मदत करते आणि कॅन्सर संक्रमित पेशींचं आक्रमण नष्ट करते. मॅक्रोफेज पेशी आपल्या शरीराला भविष्यात आक्रमण करणाऱ्या पेशी लक्षात ठेवायला आणि त्यांच्यावर हल्ला करुन त्या नष्ट करायला शिकवतात आणि प्रतिकारशक्ती कर्करोगाची लस तयार करण्यासाठी आवश्यक आहे.


तथापि, मॅक्रोफेज पेशी जे पाहू शकत नाही त्यावर हल्ला करू शकत नाही. मॅक्रोफेजेस कर्करोगाच्या पेशींना शरीराचा भाग म्हणूनच ओळखतात. शरीरावर आक्रमण करणाऱ्या पेशी म्हणून नाही, असे पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाचे पोस्ट डॉक्टरल सहकारी लॅरी डूलिंग यांनी सांगितले. या पांढऱ्या रक्त पेशींना कर्करोगाच्या पेशी पाहण्यासाठी आणि त्यांच्यावर हल्ला करण्याची परवानगी देण्यासाठी आम्हाला सेल-टू-सेल संप्रेषण नियंत्रित करणार्‍या आण्विक मार्गाची तपासणी करावी लागली, असे ते म्हणाले. कल्चर प्लेट्समधील माऊस मेलेनोमा पेशींच्या ट्यूमोरॉइड्स, समूहावर इंजिनीयर्ड मॅक्रोफेजची चाचणी घेण्यात आली. मॅक्रोफेजेस पेशींच्या सहकार्याने कर्करोगाच्या पेशींभोवती क्लस्टर करण्यात आले आणि हळूहळू ट्यूमर नष्ट करण्यात आले.


चाचणीदरम्यान, या पांढऱ्या पेशी 80 टक्के उंदरांमधील ट्यूमर काढून टाकण्यास सक्षम होत्या. त्यानंतर आठवड्यांनंतर, कर्करोगविरोधी लढणारी इम्युनोग्लोबुलिन अँटीबॉडी वाढली, असे संशोधकांनी सांगितले. ही मॅक्रोफेज थेरपी विद्यमान अँटीबॉडी थेरपीच्या संयोजनात उत्कृष्ट कार्य करते, असे संशोधकांनी सांगितले. भविष्यात कॅन्सर ट्यूमर दूर करण्यासाठी उपचार म्हणून रुग्ण या पेशींवर अवलंबून राहू शकतात. मॅक्रोफेज थेरपी ही कर्करोगाच्या लसीची गुरुकिल्ली असू शकते, ही कर्करोगाच्या पेशी नष्ट करते आणि भविष्यात कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यास शिकवते.


हेही वाचा:


Tips To Control Emotions: भावनांना कंट्रोल करावं तरी कसं ? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स