Omega-3 : ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. हे एक पोषक तत्व आहे जे रोगांशी लढण्याची क्षमता विकसित करण्यास मदत करते. ओमेगा-३ फॅटी अॅसिड हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करते. ओमेगा-३ फॅटी ऍसिडमुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हाडांशी संबंधित आजार टाळण्यास मदत होते. यामुळे तुमचे डोळे आणि केसही निरोगी राहतात. ओमेगा-3 फॅटी अॅसिडमुळे कॅन्सरसारख्या आजारांचा धोकाही कमी होतो. या पदार्थांमधून तुम्ही ओमेगा-3 फॅटी अॅसिडची कमतरता भरून काढू शकता.


ओमेगा -3 फॅटी ऍसिडचा नैसर्गिक स्रोत 


अंडी - ओमेगा-३ ऍसिडसाठी आहारात अंड्यांचा समावेश करणे आवश्यक आहे. अंड्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि ओमेगा 3 ऍसिड असतात. 



फ्लेक्ससीड्स - फ्लॅक्ससीड्समध्येही भरपूर ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतात. फ्लेक्ससीडमध्ये व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियमसारखे इतर अनेक पोषक घटक असतात.


अक्रोड - अक्रोड हे ओमेगा-3 फॅटी अॅसिडचाही चांगला स्रोत आहे. तुम्ही आहारात अक्रोडाचा समावेश करू शकता. अक्रोडमध्ये तांबे, व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियमसारखे इतर अनेक पोषक घटक असतात.


सोयाबीन - सोयाबीनमध्ये ओमेगा-3 आणि ओमेगा-6 या दोन्ही मुबलक प्रमाणात असतात. सोयाबीनमध्ये प्रथिने, फोलेट, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम, फायबर आणि जीवनसत्त्वे असतात. 


मासे- सॅल्मन फिश हा ओमेगा 3 चा उत्तम स्रोत आहे. ओमेगा-3 मध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी 5, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते. टूना फिशमध्ये सर्वाधिक ओमेगा 3 असते.


ब्लूबेरी- ब्लूबेरीमध्ये कॅलरीज कमी आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स जास्त असतात. बेरीमध्ये अँथोसायनिन अँटीऑक्सिडेंट असते. त्यामुळे हृदयाचे आजार कमी होतात.


हिरव्या भाज्या- शाकाहार करणाऱ्यांसाठी हिरव्या भाज्या ओमेगा 3 फॅटी अॅसिडचा चांगला स्रोत आहेत. तुम्ही पालक आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करू शकता. या भाज्यांमध्ये अल्फा-लिनोलेनिक ऍसिड असते.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha