Health Tips : उन्हाळ्यात दही खाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. एक तर ते तुमचे शरीर थंड ठेवते आणि त्यात प्रोबायोटिक्स असतात, ज्याला ‘गुड बॅक्टेरिया’ देखील म्हणतात. दही शरीरातील वाईट बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी उपयोगी ठरते. दही तुमचे पीएच देखील संतुलित करते. दह्याप्रमाणेच जवसचे देखील अनेक फायदे आहेत. यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते आणि त्यात ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते.  चला तर, जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी या दोन घटकांचा कसा वापर करू शकता...


वजन कमी करण्यास मदत करते : वजन कमी करण्यासाठी प्रथिनांचे चांगले स्त्रोत आहारात असणे आवश्यक आहे आणि यासाठी जवसापेक्षा उत्तम काहीही नाही. 100 ग्रॅम जवसामध्ये 18 ग्रॅम प्रथिने असतात. तसेच एक आवश्यक मॅक्रोन्यूट्रिएंट देखील असतो, जो पेशींची दुरुस्ती आणि स्नायू तयार करण्यास मदत करतो. त्यात म्युसिलेज नावाचे फायबर असते, जे भूक कमी करण्यास मदत करते आणि तुम्ही जास्त खाणे टाळता.


ओमेगा-3 फॅटी अॅसिडने परिपूर्ण : फ्लॅक्स सीड्स अर्थात जवसामध्ये ओमेगा-3 चेन फॅटी अॅसिड असतात. आळशी जळजळ कमी करण्यास मदत करू शकते आणि स्वयंप्रतिकार रोगांशी लढण्यास मदत करू शकते. ओमेगा-3 फॅटी अॅसिड हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. यासोबतच, हे तुम्हाला वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यातही खूप मदत करू शकते. यामध्ये जास्त प्रमाणात फायबर आणि लिग्नान असल्यामुळे हे शक्य आहे.


फायबरचा चांगला स्रोत : जवस हा फायबरचा चांगला स्रोत आहे. जेव्हा, तुम्ही भरपूर फायबर असलेले पदार्थ खाता, तेव्हा तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. जर, तुम्ही वजन कमी करण्यासाठी कॅलरी कमी करत असाल, तर यामुळे तुमची खाण्याची इच्छा कमी होऊ शकते. याशिवाय तुमची पचनसंस्था फायबर समृध्द पदार्थांमुळे उत्तेजित होते. तुमच्या आतड्यांमधून अन्न पचण्यासाठी फायबरयुक्त पदार्थ खाणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, ते रक्तातील साखर स्थिर करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत.


अशाप्रकारे खा आळशी आणि दही


भाजून खा


जवसचे दोन प्रकार आहेत. पिवळी आणि तपकिरी. दोन्ही तितकेच पौष्टिक आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. दररोजच्या आहारात 2 चमचे जवसाचा समावेश करा. तुम्ही भाजलेली आळशी देखील खाऊ शकता किंवा तुम्ही ती तुमच्या पेयांमध्ये, सॅलडमध्ये किंवा दह्यामध्ये मिसळून खाऊ शकता. याशिवाय, भाजलेली जवस बारीक करून त्याची पावडर बनवता येते. ही पावडर हवाबंद डब्यात साठवून, हवी तेव्हा एक चमचा पावडर तुमच्या सॅलड किंवा स्मूदीमध्ये घालुन खाऊ शकता.


दह्यासोबत मिसळून खा  


प्रथम एका पातेल्यात दोन चमचे जवस भाजून त्याची पावडर बनवा. यानंतर एका भांड्यात ४ चमचे लो फॅट दही घ्या आणि त्यात ही पावडर टाकून मिक्स करा. आता त्यावर चवीपुरते मीठ टाका आणि जेवणासोबत खा.


फळांसोबत खा  


4-5 स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरीचे तुकडे करून, भाजलेली जवस पावडर आणि दह्याचे मिश्रण तयार करून त्यात टाका. हे सलाड जेवणासोबत खाऊ शकता.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha