Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Bharat Jadhav: वडील टॅक्सी चालक होते, 'गोड गोजरी, लाज लाजरी' म्हणत गाजवली रंगभूमी; जाणून घ्या अभिनेता भरत जाधवबद्दल...


Bharat Jadhav:  नाटक मालिका आणि चित्रपट यांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या भरत जाधवनं (Bharat Jadhav) प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. भरत जाधवनं मराठी चित्रपटसृष्टीमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. भरत हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. जाणून घेऊयात भरतच्या बालपणाबद्दल तसेच त्याच्या चित्रपट आणि नाटकांबद्दल...








Prathamesh Laghate : आवडीच्या जेवणाचा बेत, हटके उखाणा; थाटात पार पडलं प्रथमेश लघाटेचं पहिलं केळवण


Prathamesh Laghate Mugdha Vaishampayan First Kelvan : 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' (Saregamapa Little Champs) या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) आणि मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत. आता प्रथमेश लघाटेने त्याच्या पहिल्या केळवणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 







Priya Bapat Umesh Kamat Love Story : प्रिया बापट आणि उमेश कामतची प्यारवाली लव्हस्टोरी; बारावीत असताना 'चॉकलेट बॉय'च्या पडलेली प्रेमात


Priya Bapat Umesh Kamat Love Story : मराठी मनोरंजनसृष्टीतील क्यूट जोडी अर्थात प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामतची (Umesh Kamat) लव्हस्टोरी खूपच खास आहे. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. 








Tuzech Mi Geet Gaat Aahe: 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा आषाढी एकादशी विशेष भाग; मल्हारला दिसणार मंजुळाचा चेहरा


Tuzech Mi Geet Gaat Aahe:  तुझेच मी गीत गात आहे  (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या छोट्या पडद्यावरील मालिकेमधील विविध ट्वीस्ट येत असतात. लवकरच या मालिकेमध्ये एक मोठा ट्वीटस्ट येणार आहे. या मालिकेचा आषाढी एकादशी विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  'तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेच्या आषाढी एकादशी विशेष एपिसोडमध्ये दिसणार आहे की, मल्हारला मंजुळाचा चेहरा दिसणार आहे. नुकताच  'तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मल्हार आणि मंजुळा हे समोरा-समोर येतात. 








Mrunal Dusanis:  'माझीया प्रियाला प्रित कळेना' ते 'तू तिथे मी', मृणाल दुसानिसनं हिट मालिकांमध्ये केलं काम, आता अभिनय क्षेत्रामधून ब्रेक घेऊन राहते परदेशात


Mrunal Dusanis:  मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री  मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) ही  सोशल मीडियावर तिच्या फॉरेन ट्रीप्सचे फोटो शेअर करत असते. मृणालनं अनेक हिट मालिकांमध्ये काम केलं आहे. पण मृणालनं सध्या अभिनय क्षेत्रामधून ब्रेक घेतला असून ती तिच्या मुलीसोबत वेळ घालवत आहे. मृणाल ही तिच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मृणालच्या मालिकांबद्दल आणि मृणालच्या मुलीबद्दल जाणून घेऊयात...