New Year In Pakistan : पाकिस्तानातील लोक कसं साजरं करतात नववर्ष? पाकिस्तानात नववर्षात सर्वाधिक विकली जाणारी वस्तू कोणती?
पाकिस्तानातील लोकही भारताप्रमाणे नववर्ष साजरे करतात. मात्र सेलिब्रेशनसाठी पाकिस्तानी आपल्या घरात एक गोष्ट नक्की बनवतात, ती गोष्ट काय आहे? पाहुयात...
New Year In Pakistan : 1 जानेवारीला जगभरातील लोक नववर्ष साजरे करणार आहेत. मात्र, प्रत्येकजण नववर्ष एकाच पद्धतीने साजरा करत नाही. युरोपमध्ये जिथे लोक या दिवशी जोरदार पार्टी करतात. तर भारतातील बहुतांश लोक हा दिवस आपल्या प्रियजनांसोबत घरीच साजरा करतात. भारताचा शेजारी देश पाकिस्तानबद्दल (Pakistan) बोलायचे झाले तर तिथले लोकही भारताप्रमाणेच काही प्रमाणात नववर्ष साजरे करतात. मात्र नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी बहुतांश पाकिस्तानी आपल्या घरात एक गोष्ट नक्की बनवतात, ती गोष्ट काय आहे ते तुम्हाला सांगणार आहोत.
सर्वात जास्त काय विकलं जातं?
पाकिस्तानात बहुतांश लोक नॉन व्हेज खातात. येथे कोणत्याही विशिष्ट दिवशी लोक नॉन व्हेज बनवतात, त्यामुळे नवीन वर्षाच्या सकाळी चिकन आणि मटणाच्या दुकानांवर बरीच गर्दी असते. कधी कधी ही गर्दी इतकी वाढते की लोकांना आपल्या वाट पहावी लागते. भारतातही या दिवशी नॉन व्हेज खाणारे लोक पहाटे मटणाच्या दुकानात पोहोचतात. विशेषत: नवीन वर्षाचा पहिला दिवस बुधवार किंवा रविवार असेल तर ही गर्दी आणखीनच वाढते. रिपोर्ट लिंकर या इंग्रजी संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, पाकिस्तानात दरवर्षी 37 लाख टन मांस खाल्ले जाते.
पाकिस्तानी लोक कसे साजरे करतात नववर्ष?
पाकिस्तान हा इस्लामी देश आहे. त्यामुळे युरोप किंवा इतर देशांमध्ये नववर्ष साजरे केले जाते तसे तेथे साजरे केले जात नाही. याशिवाय पाकिस्तानात अनेक जण नववर्ष 1 जानेवारीला नव्हे तर ज्या दिवशी त्यांनी आपल्या धर्मानुसार साजरे केले पाहिजे त्या दिवशी साजरे करतात. 2024 या वर्षाबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तानी लोकांसाठी 2024 या वर्षाचे नवे वर्ष 17 जुलैच्या आसपास सुरू होऊ शकते. खरं तर इस्लामला मानणारे लोक हिजरी कॅलेंडर पाळतात, ज्याला इस्लामिक कॅलेंडर देखील म्हणतात. याला चांद्र दिनदर्शिका असेही म्हणतात.
यंदा नवीन वर्ष साजरं न करण्याचा निर्णय
इ.स. 622 पासून या दिनदर्शिकेची सुरुवात झाली असून त्यानुसार इस्लाममध्ये नवीन वर्षाची सुरुवात मोहरमच्या पहिल्या दिवसापासून होते. मात्र, यावर्षी पाकिस्तानने नववर्षाचं सेलिब्रेशन न करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान अन्वारुल हक काकर यांनी नवीन वर्षाचं सेलिब्रेशन न करण्याचं आवाहन केलं आहे. गाझा आणि वेस्ट बँक येथे निष्पाप मुले आणि निशस्त्र पॅलेस्टिनी लोकांच्या हत्याकांडामुळे संपूर्ण पाकिस्तान अत्यंत दुःखात आहे. गाझामधील लोकांशी एकजूट व्यक्त करण्यासाठी देशात नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.
इतर महत्वाची बातमी-
Year Ender 2023 : इर्शाळवाडी, ढगफुटी, भूकंप 'या' नैसर्गिक आपत्तीमुळे ढवळून निघाले 2023 वर्ष