(Source: ECI/ABP News/ABP Majha)
New Year Celebration Places: 'न्यू इयर सेलिब्रेशन' साठी 'ही' ठिकाणं सर्वात बेस्ट! सेलिब्रिटींचीही पसंती..आताच प्लॅनिंग करा..
New Year Celebration Places: तुमचा आवडता अभिनेता आणि अभिनेत्री कोणत्या डेस्टिनेशनला पसंती देतात हे तुम्हालाही माहित करून घ्यायचे असेल, तर जाणून घ्या..
New Year Celebration Places: 2024 वर्ष संपायला आता डिसेंबर महिनाच उरला आहे. अवघ्या काही दिवसांनी नववर्ष 2025 चे आगमन होणार आहे. सध्या थंडीचा ऋतू असल्याने अनेक जण विविध ठिकाणी जाण्याचा प्लॅन करत असतील, न्यू इअर सेलिब्रेशन अवघ्या काही दिवसांवर आहे. अशात तुम्हालाही एखाद्या छान ठिकाणी साजरा करायचा असेल तर जगातील ही ठिकाणं सर्वात बेस्ट मानली जातात. आज आम्ही जी ठिकाणं सांगणार आहोत, ती ठिकाणं तुमच्या आवडत्या सेलिब्रिटीजचेही आवडते डेस्टिनेशन आहेत. चला तर मग जाणून घेऊया...
'न्यू इयर सेलिब्रेशन' साठी 'ही' ठिकाणं सर्वात बेस्ट! सेलिब्रिटींचीही पसंती
देशातच काय अवघ्या जगभरात बॉलिवूडचे चाहते पाहायला मिळतील. काही लोक त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींसाठी इतके चाहते असतात की ते त्यांच्या प्रत्येक गोष्टीची कॉपी करत राहतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीची आवडती सेलिब्रिटी एखाद्या सुंदर ठिकाणी भेट देण्यासाठी जाते, तेव्हा अनेकवेळेस ती व्यक्ती देखील भेट देण्यासाठी त्याच ठिकाणी पोहोचते. 2024 मध्ये सेलिब्रिटींची पहिली पसंती कोणती ठिकाणं आहेत, हे तुम्हाला माहितीय का? आज आम्ही तुम्हाला अशाच काही आंतरराष्ट्रीय ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, ज्या भारतीय सेलिब्रिटींना खूप आवडतात. तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबतही या ठिकाणी पोहोचू शकता.
View this post on Instagram
इटली - बहुतेक भारतीय सेलिब्रिटींची पहिली पसंती
बहुतेक भारतीय सेलिब्रिटींची पहिली पसंती कोणते परदेशी ठिकाण आहे याबद्दल जर आपण बोललो तर बऱ्याच लोकांचे उत्तर इटली असेल. होय, दक्षिण युरोपमध्ये स्थित इटली हे जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. 2024 मध्ये इटलीला अनेक सेलिब्रिटींनी खूप पसंती दिली आहे. इटली एक असे ठिकाण आहे जिथे दररोज हजारो भारतीय भेट द्यायला येतात. भारतीय सेलिब्रिटींसाठी इटली हे एक सुंदर ठिकाण मानले जाते. अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पती झहीर इक्बालसोबत दिसली. दोघेही इटलीच्या रस्त्यांवर मस्ती करताना दिसले.
View this post on Instagram
मालदीव - मोहक आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध
हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर वसलेले मालदीव हे एक सुंदर आणि जगप्रसिद्ध ठिकाण मानले जाते. केवळ सेलिब्रिटीच नाही तर सामान्य भारतीयही मौजमजेसाठी मालदीवमध्ये येतात. 2024 मध्ये मालदीव अनेक सेलिब्रिटींनी पसंत केले आहे. मालदीव जसा त्याच्या मोहक आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखला जातो, त्याचप्रमाणे हे सेलिब्रिटी डेस्टिनेशन म्हणूनही ओळखले जाते. सारा अली खानपासून ते कतरिना कैफ आणि आलिया भट्टपर्यंत इथे मस्ती करताना दिसले आहे. काही दिवसांपूर्वीच सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान पतौडी आणि पलक तिवारी मालदीवमध्ये मस्ती करताना दिसले होते.
फ्रान्स - सेलिब्रिटींची विशेष पसंती
फ्रान्स हा पश्चिम युरोपमध्ये स्थित एक छोटा पण अतिशय सुंदर देश आहे. केवळ भारतीय सेलिब्रिटीच नाही तर परदेशी सेलिब्रिटीही फ्रान्समध्ये सुट्टी घालवण्यासाठी येतात. 2024 मध्ये अनेक भारतीय सेलिब्रिटींनी फ्रान्सला खूप पसंती दिली आहे. अनेक भारतीय सेलिब्रिटी फ्रान्सला भेट देताना दिसले आहेत. काही महिन्यांपूर्वी अर्जुन कपूर आणि मलिका अरोरा फ्रान्सच्या रस्त्यांवर मस्ती करताना दिसले होते. याशिवाय परिणीती चोपडा, कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर देखील फ्रान्समध्ये फिरताना दिसले आहेत.
View this post on Instagram
लंडन - टॉप डेस्टिनेशन्सपैकी एक
लंडन ही युनायटेड किंगडम आणि इंग्लंडची राजधानी आहे. लंडन हे जगातील एक असे ठिकाण आहे जिथे केवळ भारतीयच नाही तर परदेशी अभिनेते-अभिनेत्रीही भेटायला येतात. म्हणूनच लंडन हे जगातील टॉप डेस्टिनेशन्सपैकी एक मानले जाते. दर महिन्याला काही भारतीय सेलिब्रिटी लंडनला भेट देण्यासाठी येतात. आलिया भट्ट, करण जोहर आणि मनीष, रणवीर सिंग, करीना कपूर खान आणि शिल्पा शेट्टी यांसारखे अनेक भारतीय सेलिब्रिटी हिंडताना दिसले आहेत.
स्पेन - जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक
अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्राजवळ वसलेले स्पेन हे जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. 2024 मध्ये स्पेनला भारतीय सेलिब्रिटींनी खूप पसंती दिली आहे. बिपाशा बसूपासून विराट कोहली, अनुष्का शर्मा आणि वरुण धवनपर्यंत स्पेनमध्ये मस्ती करताना दिसले आहे.
'ही' ठिकाणंही सेलिब्रिटींची पहिली पसंती ठरतायत!
जगात अशी अनेक अद्भुत आणि सुंदर ठिकाणे आहेत, ज्यांना 2024 साली भारतीय सेलिब्रिटींनी पसंती दिली आहे. दुबईप्रमाणेच पोर्तुगाल, द हॅम्पटन, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलियालाही खूप पसंती मिळत आहे.
हेही वाचा>>>
Maharashtra Hidden Places: 'अरेच्चा..! महाराष्ट्रात लपलेले 'हे' सुंदर हिल स्टेशन माहितच नव्हते!' अनेकांच्या नजरेपासून दूर, एकदा बघाल तर प्रेमातच पडाल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )