New Year 2024 : नवीन वर्षाची सुरुवात चांगली करण्यासाठी आपल्या प्रियजनांना द्या 'या' खास भेटवस्तू; हॅपी न्यू ईयर!
New Year 2024 : आपल्यापैकी अनेकजण नवीन वर्षाला आपल्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा संदेश देतात.
New Year 2024 : नवीन वर्षाची (Happy New Year) सुरुवात झाली आहे. हे नवीन वर्ष अनेकांच्या जीवनात आशेचा किरण घेऊन येतं. याबाबत सर्वांमध्ये एक वेगळाच आनंद आणि उत्साह आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने हा दिवस साजरा करतो. कोणी सहलीला जातो, कोणी सुट्टी घेऊन पूर्ण विश्रांती घेण्यावर विश्वास ठेवतो, तर काहींना पार्टी करायची असते. अशी प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते.
आपल्यापैकी अनेकजण नवीन वर्षाला आपल्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा संदेश (Message) देतात. परंतु, बदलत्या काळानुसार अनेकजण तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला, जवळच्या लोकांना, नातेवाईकांना काही भेटवस्तू देखील देऊ शकता. या माध्यमातून तुम्ही प्रियजनांना प्रेम आणि आपुलकीची भावना निर्माण करू शकता. तर, या नवीन वर्षानिमित्त तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला कोणते गिफ्ट देऊ शकता याचे काही ऑप्शन्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
फिटनेस गॅझेट्स
तुम्ही तुमच्या खास व्यक्तीला काही चांगले फिटनेस गॅजेट्स देऊ शकता. अनेक वेळा लोकांना फिटनेससाठी सतत सांगावे लागते. तुमची ही भेट नक्कीच उपयोगी येईल. मग ते स्मार्ट घड्याळ असो, स्किपिंग रोप, डंबेल्स, वजनाचे यंत्र, मेटाबॉलिझम ट्रॅकर ही प्रत्येक गोष्ट अतिशय उपयुक्त आहे.
ट्रॅव्हल एक्सेसरीज
तुमच्या नातेवाईक किंवा मित्रांपैकी एखाद्याला प्रवासाची खूप आवड असेल, तर तुम्ही त्यांना नवीन वर्षात काही उपयुक्त प्रवासाची एखादी वस्तू भेट म्हणून देऊ शकता. यामध्ये पोर्टेबल चार्जर, पॉवर अडॅप्टर, पोर्टेबल स्टीमर, ई-रीडर, नेक पिलो, पासपोर्ट होल्डर अशा अनेक उपयुक्त वस्तू तुम्ही देऊ शकता.
स्किन केअर प्रोडक्ट्स
जे लोक आपल्या त्वचेची खूप काळजी घेतात अशा लोकांना तुम्ही स्किन केअर प्रोडक्ट्स गिफ्ट म्हणून देऊ शकता. तुम्ही त्यांना स्किन केअर प्रोडक्ट दिल्यास ते नक्कीच त्याचा चांगला वापर करतील.
किचन प्रोडक्ट्स
अशा वेळी तुम्ही तुमच्या आईला, पत्नीला किंवा तुम्हाला स्वतःला स्वयंपाकाची आवड असल्यास काही उपयुक्त स्वयंपाकघरातील प्रोडक्ट्स देखील भेट देऊ शकता. जेणेकरून किचनचे काम लवकर आणि सहज पूर्ण करता येईल.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Skin Care Tips : हिवाळ्यात तुमचा चेहरा काळा पडतोय? फक्त 'हे' उपाय करा चेहऱ्याचा ग्लो टिकून राहील