New Year 2023 : नवीन वर्षाचं स्वागत करताना आरोग्यसुद्धा जपा; 'या' गोष्टी फॉलो करा
New Year 2023 Health Benefits : आजकाल मेजवानीत जंक फूड आणि हेवी फूडचा ट्रेंड खूप वाढला आहे.
New Year 2023 Health Benefits : नवीन वर्ष सुरू व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. अशातच नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेकांचा उत्साह आणि जल्लोष वाढताना दिसतोय. नवीन वर्षाचं स्वागत करायचं म्हटलं की त्यात पार्टी आलीच. अशा परिस्थितीत, जर तुम्ही पार्टी करून नवीन वर्षाचं स्वागत करणार असाल तर लक्षात घ्या ही पार्टी हेल्दी असावी. तुमचा आनंद आणि तुमचं शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने पार्टीचा आनंद लुटू शकता.
New Year 2023 Health Benefits : हेल्दी मेनू निवडा
आजकाल पार्टीत उघडपणे जंक फूड आणि हेव्ही फूडचा वापर केला जातो. सकस आहार म्हणजे चवीशी तडजोड करणे असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र, तुमच्या चवीबरोबरच तुम्ही तुमच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी मेनू सेट करताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या.
- कोल्ड्रिंक्स, कॉकटेल इत्यादींमध्ये कॅलरीज जास्त असतात. या ऐवजी तुम्ही फ्रूट पंच, फळांचा रस, सूप, शेक किंवा मॉकटेल्स निवडू शकता.
- तळलेले पनीर, कबाब इत्यादींऐवजी स्टार्टर्स खा.
- मुख्य कोर्समध्ये खूप तेलकट आहार टाळा. मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पिठाच्या रोट्या, भाकरी खा.
- सॅलड आणि फळांचा अधिकाधिक वापर करा.
New Year 2023 Health Benefits : आनंदाबरोबरच फिटनेसही महत्त्वाचा
हिवाळ्यात उत्सव साजरा करण्यासाठी बोनफायरभोवती नृत्य आणि खेळ हा सर्वोत्तम पर्याय आहे. डान्समुळे पार्टीत एक वेगळी रंगत तर येतेच पण चांगला व्यायामही होतो. त्यामुळे पार्टीत डान्स नक्की करा. तसेच, शारीरिक हालचालींशी संबंधित खेळ निवडा.
New Year 2023 Health Benefits : हिवाळ्यात उबदार कपडे घालणे आवश्यक आहे
नवीन वर्ष साजरा करण्यासाठी मित्रांबरोबर पार्टी करत असाल तर उबदार कपड्यांची विशेष काळजी घ्या. हिवाळ्यातील ड्रेसमध्ये तुम्ही आणखी स्टायलिश आणि सुंदर दिसता. आजकाल फॅशनसाठी लोक हिवाळ्यातही उबदार कपड्यांशिवाय घराबाहेर पडतात, त्यामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. नवीन वर्षात उबदार कपडे न घालणे ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते. हिवाळ्यात तुम्हाला न्यूमोनियाचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही थंडीपासून स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे आहे. या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली तर तुम्ही नक्कीच निरोगी राहाल.
महत्त्वाच्या बातम्या :